Skip to content
Home » Recipe » Puran Poli Recipe in Marathi | पुरण पोळी

Puran Poli Recipe in Marathi | पुरण पोळी

पुरण पोळी RECIPE / पाककृती 

 

  • पुरणाचे साहित्य
  1. चणा डाळ ………………………………………………………१ १/४ कप (सव्वा)
  2. गूळ ………………………………………………………………..१ १/२ कप (दीड)
  3. केशर …………………………………………………………….१ चिमुट
  4. हिरव्या वेलचीची पूड ………………………………………….१/४ चमचा (पाव)
  5. जायफळ पूड …………………………………………………..१ चिमुट

 

  • कणकेचे साहित्य 
  1. मैदा ……………………………………………………दीड कप
  2. मीठ …………………………………………………..१ चिमुट
  3. साजूक तूप ………………………………………….अर्धा कप

कृती 

  • डाळ धुवून कुकर मध्ये मऊ शिजवून घ्यावी. चाळणीवर घालून त्यातील पाणी निथळून घ्यावे. मिक्सर मध्ये ही डाळ जाडसर दळून घ्यावी. ही वाटलेली डाळ व गूळ एका पॅन मध्ये घ्यावे व त्यात केशर व इलायची पूड, जायफळ पूड घालावी व मिश्रण चांगले मिसळावे.
  • हे मिश्रण सतत ढवळत सुकेपर्यंत शिजवावे. मिश्रण पातेल्याच्या कडा सोडू लागताच मिश्रण गॅसवरून उतरवावे व ते थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर मिश्रणाचे १६ भाग करून घ्या व त्याचे गोल गोळे बनवा.
  • मैदा व मीठ यात तूप व पुरेसे पाणी घालून मऊ पीठ / कणिक भिजवून घ्यावी.व  ओल्या कापडात गुंडाळून तासभर बाजूला ठेवावे.
  • या कणकेत चे ही १६ भाग करावेत. हातावर थापून प्रत्येक भागात पुरणाचा एक एक गोळा भरावा व कडा जुळवून गोल उंडा बनवावा.
  • मैदा भूभूरून प्रत्येक उंड्याची हलक्या हातानी पोळी लाटावी. पुरण कणकेच्या बाहेर येत कामा नये. साधारण पाने ५ इंच व्यासाची मध्यम जाडीची पोळी तयार होईल. ही पोळी गरम तव्यावर दोन्ही बाजूने खरपूस भाजावी. अशा तर्हेने सर्व पोळ्या तयार कराव्या व थंड झाल्या कि पोळीच्या डब्यात भराव्या. झाकण घट्ट लावू नये.
  • खायला देताना पोळीवर साजूक तुपाची धार सोडावी. बरोबर वाटीत थंड दूध ही द्यावे.

Recipe / रेसिपी  आवडली तर  जरूर  SHARE करा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *