Skip to content
Home » Tips Information in Marathi » APJ Abdul Kalam Information in Marathi, Essay, Nibandh & Biography

APJ Abdul Kalam Information in Marathi, Essay, Nibandh & Biography

apj abdul kalam mahiti

Abdul Kalam Mahiti Marathi Language

Biography Essay : एपीजे अब्दुल कलाम माहिती

  • वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि भारताचे राष्ट्रपती ह्या सर्व पदांवर कार्य केलेले एक थोर भारतीय म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. त्यांच्या इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करण्याच्या सवयीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून प्रसिद्ध झाले. राष्ट्रपती पदाच्या पाच वर्षाच्या काळात त्यांनी भारतीयांच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले.

Childhood and Early Life : बालपण

  • अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ओक्टोंबर, १९३१ रोजी, तामिळनाडू मधील रामेश्वर येथे एका कनिष्ट मध्यमवर्गात झाला. त्यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे होते.
  • त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाबदिन अब्दुल होते. वडील यात्रेकरूंना होडीतून नेण्याचे-आणण्याचे काम करीत. लहान वयातच त्यांच्या वडिलांचे छत्र हरविले. त्यानंतर त्यांनी वर्तमान पत्रे विकून, तसेच इतर छोटी मोठी कामे करून घरी हातभार लावला.
    त्यांचे लहानपण खूप हलाखीत गेले.

Education : शिक्षण

  • अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शालेय शिक्षण रामनाथपुरमला झाले. शाळेत असताना त्यांना गणितात विशेष रुची होती. नंतर ते तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेज मध्ये दाखल झाले.
  • त्यांनी भौतिकशास्त्रात बी.एस्सी. पूर्ण केल्यानंतर चेन्नई मधील इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलोजी मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांच्या बहिणीने दागिने गहाण ठवून त्यांना पैसा पुरवला.
  • या संस्थेतून एरोनोटीक्सचा डिप्लोमा पूर्ण करून नासा मध्ये एरोस्पेस टेक्नोलोजीचे शिक्षण घेतले. कलाम यांना भारतीय हवाई दलात लढाऊ विमानाचे वैमानिक होण्याची आशा होती. ते निवडणूक परीक्षेत नवव्या क्रमांकावर आले परंतु आठच जागा असल्याने त्यांना नाकारले गेले.

Work : कार्य

  • १९५८ ते १९६३ मध्ये संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी अब्दुल कलाम यांचा संबध आला. तिथे त्यांनी भारतीय सेनेसाठी छोटे हेलीकॉप्टर बनविण्यास सुरुवात केली. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यात सहभागी होऊ लागले. इंदिरा गांधींच्या काळात क्षेपणास्त्र विकासासाठी पुन्हा संरक्षण संशोधन व विकास संस्थेत आले. तेव्हा पासुनच त्यांनी स्वदेशात क्षेपणास्त्र बनविण्याचा ध्यास घेतला. इस्त्रो मध्ये असताना ते सॅटेलाईट लाँन्चींग व्हेईकल ३ प्रकल्पाचे प्रमुख झाले.
  • त्यांचा पुढाकार असलेला हा प्रयोग यशस्वी झाला आणि १९८० साली रोहिणी हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करू लागला. या प्रकल्पासोबत ते ध्रुवीय सॅटेलाईट लाँन्च व्हेईकल प्रकल्पावरही काम करत होते जो अजूनच जास्त यशस्वी ठरला. साराभाईंनी त्यांची कामगिरी पाहून त्यांचे खूप कौतुक केले. पुढे कलाम, साराभाईंचे नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्र’चे प्रमुख झाले.
  • १९७० मध्ये कलाम यांना क्षेपणास्त्र सामर्थ्य विकासावर काम करण्याची इच्छा होती, ज्याला केंद्रीय मंडळाने नकार दिला परंतु प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी मात्र वॅलीयंट प्रकल्प आणि डेविल प्रकल्पासाठी गुप्त निधी पुरवला. दोन्ही प्रकल्प अयशस्वी ठरले परंतु त्यातूनच पृथ्वी क्षेपणास्त्राची बीजे रोवली गेली.
  • त्यांनी नेहमीच वैयक्तिक कामगिरीपेक्षा सर्वांच्या सांघिक कामगिरीला महत्व दिले. ते सहकाऱ्यांना जाणून घेऊन त्यांच्यातील गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेत असत. कलामांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या अग्नी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर त्यांचे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कौतुक झाले.
  • काही काळ त्यांनी पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागारचे कामही केले. देशाच्या सुरक्षेसाठी अनेक प्रभावी योजना आखल्या. संरक्षण मंत्र्याच्या सल्लागाराचे काम करताना अर्जुन हा मेन बॅटल टँक आणि लाईट काँबॅट एअरक्राफ्टची निर्मिती केली.
  • १० जून, २००२ मध्ये राष्ट्रपती पदासाठी त्यांचे नाव सुचविण्यात आले. कॉंग्रेस व समाजवादी पक्षाच्या पाठीब्यांमुळे ते राष्टपती झाले. ते देशाचे अकरावे राष्ट्रपती होते आणि हे पद त्यांनी २५ जुलै, २००२ पासून २५ जुलै २००७ पर्यंत निभावले.
  • त्यांनी त्यांच्या जीवन कालावधीत अनेक पुरस्कार मिळवले. १९८१ साली पद्मभूषण, १९९० मध्ये पद्मविभूषण आणि १९९८मध्ये भारतातील सर्व्वोच्च पुरस्कार भारतरत्न ही मिळवला. स्वित्झर्लंडनेही त्यांच्या वैज्ञानिक कामगिरीची दखल घेवून ज्या दिवशी त्यांनी स्वित्झर्लंडला भेट दिली तो दिवस ‘विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला.

Final Years : अखेरचे क्षण

  • कलाम यांचे निधन २७ जुलै, २०१५ मध्ये शिलॉंग मध्ये झाले. ‘राहण्यायोग्य पृथ्वी निर्माण करणे’ या विषयावर इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे व्याख्यान देत असताना ते अचानक कोसळले. बेथनी येथील हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनाने भारतातच नव्हे तर सर्व जगातील विज्ञान प्रेमींवर शोककळा पसरली.
  • कलाम यांनी आपल्या भरीव कामगिरीने, उत्तम बुद्धिमत्तेने आणि विनम्र स्वभावाने देशातील आजच्या व भावी पिढीसाठी उत्तम आदर्श ठेवला आहे. त्यांची कमतरता भारताला सदैव जाणवत राहील.

9 thoughts on “APJ Abdul Kalam Information in Marathi, Essay, Nibandh & Biography”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *