Skip to content
Home » Tips Information in Marathi » Lotus Information in Marathi II कमळ फुलाची माहिती

Lotus Information in Marathi II कमळ फुलाची माहिती

information about lotus flower

Lotus Information in Marathi

Kamal Flower – कमळ फुलाची माहिती

  • दिसायला अतिशय सुंदर असे हे फुल पाणवनस्पती वर वाढते. जगभरात कमळाच्या सुमारे १०० हून अधिक प्रजाती आहेत.
  • कमळ हि वनस्पती मुळची भारत, चीन आणि जपान येथील आहे. भारतात जवळपास सर्व प्रदेशात कमळे सापडतात. कमळ हे भारताचे व व्हिएतनामचे राष्ट्रीय फुल आहे.
  • कमळ मुख्यतः गोड्या व उथळ पाण्यात वाढते. हे झाड सुमारे एक मीटर पर्यंत उंच वाढते व पाण्याच्या तळाशी पसरत वाढते.
  • पाने गोल असतात ज्यांचा व्यास सुमारे ६० ते ९० सेमी असतो आणि पाने मोठ्या देठाच्या सहाय्याने पाण्याच्या वर तरंगतात. कमळाची पाने कधीही ओली होत नाहीत आणि त्यावर पाण्याचे थेंब सुंदर मोत्यासारखे दिसतात.
  • कमळाची फुले देखील पाण्याच्या वर वाढतात. हि फुले मोठी, सुगंधी व सुंदर असतात. फुलांचा व्यास आठ इंच इतका असू शकतो.
  • कमळाची फुले पांढरी, गुलाबी, लाल, निळी, जांभळी आणि पिवळी असतात. भारतात मुख्यतः पांढरी व गुलाबी कमळे आढळतात.
  • कमळाच्या मुळांचा वापर खाण्यासाठी सुद्धा होतो व त्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे असतात. तसेच कमळाची फुले, पाने, बियादेखील खाण्यायोग्य आहेत. कमळात तंतुमय पदार्थ, विटामिन ब, लोह आणि जीवनसत्व खूप प्रमाणात असते.
  • आयुर्वेदीक औषधामध्ये कमळाच्या विविध भागांचा उपयोग केला जातो. वेदनाशामक आणि स्नायूंच्या दुखण्यावर उपाय म्हणून कमळ उपयोगी येते. तसेच हृदयरोगांमध्ये टॉनिक म्हणून कमळाचा उपयोग होतो.
  • चिखलात उगवून सुद्धा सौंदर्याचा उत्तम नमुना असलेल्या कमळाला प्राचीन संस्कृती तसेच काव्यामध्ये उच्च स्थान आहे.
  • कमळ विष्णू तसेच लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय आहे. तसेच ब्रम्हदेवाची उत्पती कमळातून झाली असे मानतात म्हणून कमळाला हिंदू तसेच बुद्ध संस्कृतीमध्ये पवित्र मानतात.
  • कमळाची फुले दिवसा उमलतात आणि रात्रीची बंद होतात म्हणूनच इजिप्शियन लोक कमळाचा आणि सूर्याचा संबध आहे असे मानतात. त्यांच्या मते सूर्याची उत्पती कमळापासून झाली. तसेच ते कमळाला पुनर्जन्म आणि उत्पत्तीचा प्रतिक मानतात.
  • कमळाच्या बिया अनेक वर्षानंतरही रुजू शकतात. चीनमध्ये सुकलेल्या तलावात सापडलेल्या एका प्रकारच्या कमळाच्या बिया १३००वर्षानंतर कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मधील जीवशास्त्रज्ञांनी सफलतापूर्वक रुजविल्या आहेत.
  • कमळाची फुले उबदार असतात. वैद्यानिक मानतात की या वैशिष्ट्यामुळे थंड रक्ताचे कीटक कमळाकडे जास्त आकर्षित होतात.
  • कमळ आणि पाणलिली हि फुले एकसारखी दिसतात परंतु भिन्न कुळातील आहेत.
  • कोरिया, चीन आणि जपान मध्ये कमळाच्या सौंदर्याची प्रशंसा करणारा लोटस फेस्टिव्हल साजरा केला जातो.

Lotus Flower Information in Marathi / Lotus Flowers Wikipedia Language

3 thoughts on “Lotus Information in Marathi II कमळ फुलाची माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *