Skip to content
Home » Tips Information in Marathi » Lokmanya Tilak Information in Marathi, Biography & EssayII लोकमान्य टिळक निबंध

Lokmanya Tilak Information in Marathi, Biography & EssayII लोकमान्य टिळक निबंध

lokmanya tilak biography marathi

Lokmanya Tilak Information in Marathi

Bal Gangadhar Tilak Information in Marathi Language

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” असा नारा देणारे लोकमान्य टिळक एक स्वातंत्र्य सैनिकच नव्हते तर ते शिक्षक, समाज सुधारक आणि वकील सुद्धा होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांची मोलाची कामगिरी होती.

सुरुवातीचे आयुष्य :

  • लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ साली, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांचे जन्मनाव केशव गंगाधर टिळक असे होते परंतु त्यांना त्यांच्या ‘बाळ’ या टोपण नावाने ओळखले जाई. टिळक लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते आणि गणित हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांच्या कुशाग्र बुद्धी मुळे त्यांचे शिक्षक त्यांना ‘सूर्याचे पिल्लू’ म्हणत. लहानपणापासूनच टिळकांना अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांचा कणखर बाणा आणि बंडखोर वृत्ती लहानपणापासूनच दिसत होती.
  • टिळकांच्या लहान वयातच आईचे छत्र हरवले व सोळाव्या वर्षी वडिलांचाही मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे काका गोविंदपंत यांनी टिळकांचा सांभाळ केला. त्यांनी नेहमीच टिळकांना शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी मृत्युपूर्वी टिळकांचा विवाह सत्यभामाबाई उर्फ तापीबाई यांच्यासोबत लावून दिला. त्यावेळी टिळक अतिशय कृश शरीरयष्टीचे होते व तापीबाई सुदृढ होत्या. यावरून त्यांचे मित्र त्यांना चिडवत असत म्हणून टिळकांनी नियमित कसरत आणि व्यायाम करून एका वर्षात उत्तम शरीरयष्टी कमावली. त्यावर्षी प्रथम वर्षाच्या परीक्षेत ते नापास झाले परंतु टिळकांच्या मते ते वर्ष फुकट गेले नसून पुढील आयुष्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होण्यासाठी कामी आले.

शिक्षण :

  • वयाच्या दहाव्या वर्षानंतरचे त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले. त्यांनी पुण्यातील एका एंग्लो-वर्नाक्युलर शाळेत प्रवेश घेतला. येथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली, ज्याचा त्यांच्या आयुष्यावर खूप प्रभाव पडला. १८७७ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. संस्कुत धर्मग्रंथ, राजनीती आणि अति-भौतिक शास्त्रावरील अनेक पुस्तकांचे वाचन केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी एल.एल.बी. च्या शाखेची निवड केली. जी सर्वांसाठी खूप आश्चर्यकारक होती.

राजकीय जीवनाची सुरुवात :

  • १८८० मध्ये, टिळक यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांच्या सोबतीने पुण्याला ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली व १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेज चालू केले. तसेच आगरकरांच्या मदतीने ‘मराठा’ आणि ‘केसरी’ ही दोन वृत्तपत्रे सुद्धा चालू केली. लोकांना एकत्र आणून त्यांच्या मनामध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरु केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पहिला शिवजयंती उत्सव १८९६मध्ये रायगडावर साजरा केला गेला.
  • १८९७ साली महाराष्ट्रात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. तेव्हा रँड प्रशासनाने लोकांची निर्जंतुकीकरणाच्या नावाखाली अत्यंत छळवणूक केली. रँड व त्यांच्या सहकाऱ्याच्या हत्येनंतर पुण्यात कर्फ्यू लावण्यात आला व संशयितांची धरपकड सुरु झाली. तेव्हा टिळकांनी केसरी या वृत्तपत्रात ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ आणि ‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे’ हे अग्रलेख लिहिले. त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचे दोन खटले भरले व त्यांना दोषी घोषित करून अठरा महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

तुरुंगवास :

  • १९०८ मध्ये सुद्धा त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला व सहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. या काळात त्यांना ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. हा तुरुंगवास भोगत असतानाही त्यांनी ‘गीतारहस्य’ आणि ‘ओरायन, द आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ हे महत्वपूर्ण ग्रंथ लिहिले. टिळकांनी निर्भीडपणे लिहिलेले लेख आणि ब्रिटीश सरकार कडून सामान्य जनतेवर होणाऱ्या अत्याचारावर वेळोवेळी उठवलेली टीकेची झोड यातून टिळकांनी ब्रिटीश साम्राज्याला कठोर प्रतिकार केला. भारतीयांमध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी उभे आयुष्य खर्ची केले. म्हणूनच टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते.

शेवटचे दिवस :

  • टिळकांच्या आयुष्याची शेवटची वर्षे मात्र आजारपणात गेली. तरुणपणातील केलेल्या धकाधकीचा व मधुमेहाचा परिणाम शरीरावर झाला तरीही करारी बाणा मात्र तसाच होता. परंतु १९२० मध्ये मात्र या भारताच्या महान नेत्याचे निर्वाण झाले. त्यावेळी मुंबईतील सर्व लोकांनी बंद पाळून आपले दुःख व्यक्त केले. पंडित जवाहरलाल नेहरुंना हि बातमी कळताच त्यांनी ‘भारतातील एका तेजस्वी सूर्याचा आज अस्त झाला’ असे उद्गार काढले. मुंबईतील चौपाटीवर त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्या अंत्यसंस्काराला अनेक पुढाऱ्यांसोबत प्रचंड जनसमुदाय लोटला. असे हे थोर व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभले याचा सर्व महाराष्ट्रीयन लोकांना अभिमान आहे.

Lokmanya Tilak Biography in Marathi – Wikipedia Language / Speech Bhashan Marathi

13 thoughts on “Lokmanya Tilak Information in Marathi, Biography & EssayII लोकमान्य टिळक निबंध”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *