jogging tips in marathi

Running Tips in Marathi | Running Information in Marathi Language

  • धावणे सुरु करण्याआधी वार्म अप करायला विसरू नका. कमीत कमी ५ मिनिटे तरी वार्म अप करा.
  • धावणे सुरु करण्याआधी तुमचे ध्येय निश्चीत करा. तुम्ही किती किलोमीटर धावणार आहात आणि किती वेगाने धावणार आहात ते ठरवा.
  • पहिल्यांदा धावायला सुरवात करताना कमी वेगाचे आणि अंतराचे ध्येय ठेवा कारण तुमचा अंदाज चुकू शकतो. एकदा तुम्हाला तुमच्या वेगाचा आणि क्षमतेचा अंदाज आला कि नंतर ध्येय वाढवा.
  • तुमचा वेग आणि कापलेले अंतर मोजण्यासाठी तुम्ही मोबाईलवर एखादा अॅप डाऊनलोड करू शकता. त्यामुळे तुम्हाला धावलेले अंतर आणि त्यासाठी लागलेला वेळ याची नोंद ठेवता येईल.
  • तुम्ही धावत असताना तुम्ही मॅरेथॉनसाठी धावत असल्याचे समजून धावा. आभासी शर्यतीमुळे तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यास मदत होते.
  • एकदा तुम्हाला एक ठराविक अंतर धावायची सवय झाली कि, नंतरच्या आठवड्यात तुम्ही थोडे अजून अंतर वाढवा. पण लक्षात ठेवा कि हे अंतर पाहिल्या आठवड्याच्या अंतराच्या दहा टक्के पेक्षा जास्त असू नये.
  • सकाळी धावणे नेहमीच उत्तम असते पण सकाळचे न जमल्यास दिवसा किंवा संध्याकाळी सुद्धा धावू शकता. पण काहीही खाल्यानंतर दोन तास धावू नये नाहीतर पोटात दुखणे, उलटी होणे अश्या प्रकारचे त्रास होऊ शकतात.
  • धावायला सुरवात करताना एकदम जोरात धावणे सुरु करू नका त्याऐवजी सुरवातीला जोरात चाला किंवा हळूहळू पळा आणि १० मिनिटानंतर वेग वाढवा. थांबताना सुद्धा एकदम धावणे न थांबवता हळूहळू वेग कमी करा नाहीतर शिरा दुखणे, मळमळ किंवा चक्कर येणे असे त्रास होऊ शकतात.
  • जर धावताना वरीलप्रमाणे काही त्रास झाला तर दोन दिवस विश्रांती घेऊन नंतर धावायला सुरवात करावे.
  • जर सलग दोन दिवस आराम घेतल्यानंतर सुद्धा दुखत असेल तर मात्र तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
  • धावणे सुरु करायच्या आधी काही खाऊ किंवा पिऊ नये.
  • तुम्ही धावण्याचा व्यायाम करत असला तर इतर कठीण व्यायाम करणे टाळा.
  • हवा ज्या दिशेने वाहत आहे त्या दिशेने धावलात तर तुम्हाला लवकर दम लागणार नाही.
  • तसेच ज्या दिशेने वाहने येत आहेत त्याच्या विरुध्द दिशेने धावा त्यामुळे तुम्हाला समोरून येणारी वाहने दिसतील आणि अपघात होणे टळेल.
  • धावण्याचा वेग एक समानच ठेवला पाहिजे.
  • रात्री पुरेशी झोप घ्या.
  • जेवणात कर्बोदकांसोबत पुरेसे प्रोटीन्स सुद्धा घेतले गेले पाहिजेत.

Jogging tips in Marathi Language Wikipedia / How to Run Mahiti

2 thoughts on “Running Tips in Marathi | Running Information in Marathi Language”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *