Skip to content
Home » Actrices » Top 10 Marathi Movies | Best Marathi Film Information in Marathi language

Top 10 Marathi Movies | Best Marathi Film Information in Marathi language

top 10 Marathi movies

Top 10 Marathi Movies Information in Marathi

टॉप 10 मराठी चित्रपटांची माहिती

१. अशी ही बनवाबनवी (1988) :

  • चित्रपटाला प्रदर्शित होऊन बरेच वर्ष झाले असले तरी अजून हि ह्या चित्रपटाची जादू तशीच आहे.
  • त्या काळात ह्या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला होता.चित्रपटाबद्दल वैशिष्ठ अस काही सांगूच शकत नाही कारण हा पूर्ण चित्रपटच एक वैशिष्टपूर्ण आहे.
  • चित्रपट विनोदी आहे, अस वाटत की पूर्ण चित्रपट म्हणजेच विनोद आहे.कलाकारांचा उत्तम अभिनय लक्षात राहणारे गीत आणि दिग्दर्शन हे चित्रपटाचे शोभा वाढवते.
  • चित्रपटात अशे काही संवाद आहे की जे  आजही आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो.
  • हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटाचा दागिना आहे.जर हा तुम्ही चित्रपट अजूनही पहिला नसेल तर ‘ हा हलकटपणा आहे माने ‘ जा पटकन बघा.

२. कोर्ट (2015) :

  • मराठी भाषिक आहत आणि ह्या चित्रपटाबद्दल ऐकलं नाही असं होऊच शकत नाही.
  • म्हणतात ना शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधीच चढू नये हे का तर न्यायव्यवस्थेच्या चुकांमुळे सामान्य माणसांना कश्याप्रकारे त्रास सहन करावा लागतो हे सर्व ह्या चित्रपटात दाखवले गेले आहे.
  • आपणच ही यंत्रणा बनवतो आणि त्याला दोष देण्याचे ही काम आपणच करतो. चित्रपटाची कथा ही एक वयेरुद्ध लोक गायकाच्या न्यायालयीन खटल्याची आहे.
  • चित्रपटाची कथा साधी सरळ सोपी आणि आपल्याला शेवटपर्यंत जुळवत ठेवते.
  • दिग्दर्शकाने बाकीच्या गोष्टींना फोकस करण्यापेक्षा मूळ पात्राला आधिक महत्त्व दिलं आहे आणि कॅमेरा ने सुद्धा जास्तीत जास्त पात्राला महत्त्व देऊन कथा आधिकच बोलकी केली आहे.

३. हरिश्चंद्राची फॅक्टरी (2009) :

  • इथे का आलात? चित्रपटाची आवड आहे म्हणूनच ना? ह्या चित्रपटाच्या कथा पण एका चित्रपट वेड्याची आहे ते म्हणजे दादासाहेब फाळके – भारतीय चित्रटसृष्टीचे जनक.
  • हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला आत्मचरित्र वर आधारित चित्रपट आहे.
  • दादासाहेबांनी आपला पहिला चित्रपट ‘ राजा हरिश्चंद्र ‘ कसा बनवला? आणि त्यांना हा चित्रपट बनवताना आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींवर त्यांनी कशाप्रकारे मात केली हेच सर्व ह्या  चित्रपटामध्ये मांडण्यात आले आहे.
  • चित्रपट हा उत्तम प्रकारे सादर करण्यात आला आहे. जर ‘ राजा हरिश्चंद्र ‘ चित्रपट बनलाच नसता तर आज आपले भारतीय चित्रपट खूप मागे असते.हाच चित्रपट कसा बनला ते आपण नक्कीच जाणून घेतले पाहिजे.

४. नटसम्राट (2016) :

  • विश्वास,प्रेम,राग,दुःख,आश्चर्य ह्या सर्वांचा मिश्रण म्हणजे नटसम्राट चित्रपटाची कथा.
  • चित्रपटाची कथा वी.वा. शिरवाडकर यांच्या गाजलेल्या नटसम्राट नाटकातील असली तरी चित्रपटाने ह्या सर्वाला योग्य प्रकारे न्याय दिला आहे.
  • चित्रपटाची कथा एका सेवानिवृत्त अभिनेत्याची असून त्याच्या जीवनात आलेल्या वेगवेगळ्या कृत्यांबरोबर समांतर आहे.
  • नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांचा अभिनय चांगलाच लक्षात राहतो. कलाकारांचा अभिनय, कथा,दिग्दर्शन,सवांद खूपच छान आहे त्यामुळे हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आणि आधी प्रखर वाटतो.मराठी चित्रपट काय असतो? याच उत्तर नटसम्राट आहे.

५. कट्यार काळजात घुसली (2015) :

  • आपल्या जीवनात संगीत हा एक महत्त्वाचा घटक आहे.
  • संगीताशी निगडित चित्रपट म्हणजे बळच कथेशी तडजोड करून त्यामध्ये बसवलेली गीत असा आपला सहसा समज असतो. पण हा चित्रपट त्याच्या कोणत्याही पैलूवर तडजोड न करता कथेची सत्यता जपतो.
  • ब्रिटिश काळात संगीत हाच एक मनोरंजनाचा मुख्य पर्याय कसा होता. ब्रिटिश राजकारण्यांनी याचा उपयोग करून फूट पडण्याचा प्रयत्न कसा केला ह्या गोष्टींचा ह्या चित्रपटात उल्लेख होतो.
  • संगीत क्षेत्रातील नामांकित घराणे त्यांच्यातील आप – आपसांतील स्पर्धा भांडण यांवर प्रामुख्याने चित्रपटाची कथा आहे. कलाकार आणि गीतकार यांनी चित्रपटात आपले रंग ओतून चांगलाच रंगवला आहे.

६. मी शिवाीराजे भोसले बोलतोय (2009) :

  • चित्रपट हा एक सामान्य मराठी माणूस ‘ दिनकर भोसले ‘ ह्या भोवती फिरतो.
  • जो आपल्या रुढी परंपरांवर ठाम असतो आणि  आपले  रोजचे काम आदर्शपूर्वक आणि सत्तेच्या मार्गाने करत असतो आणि इतरपन तोच मार्ग वापरतात असा त्याला विश्वास वाटत असतो.
  • लोक त्याच्या ह्या चांगुलपणा चा फायदा घ्यायला चालू करतात.आणि पुढे अश्या काही घडामोडी घडतात की त्याने त्याला त्रास होऊ लागतो.
  • मग छत्रपतींच्या विचाराने त्यातील सामान्य मराठी माणूस जागा होतो आणि आपल्या भोवताली घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीं विरुद्ध लढा द्यायला चालू करतो.
  • तो ह्या सर्व अडचणींवर कसा मत करतो आणि आपला लढा कसा चालू ठेवतो ह्या बद्दल संपूर्ण कथा आहे.
  • तुमच्यातील सामान्य मराठी माणूस जागा करायचा असल्यास हा चित्रपट पाहायलाच हवा.

७. मुंबई पुणे मुंबई (2010) :

  • मुंबई आणि पुणे म्हटलं की एक प्रकारची स्पर्धा आली.
  • आणि त्यात कोण पुढे जाईल हे ही आलच इथे तर चित्रपटाच्या नावातच मुंबई पुणे आहे.
  • हा चित्रपट संपूर्णपणे दोन पत्रांभोवाती फिरतो.त्यांतील दोन आप-आपल्या शहरांविषयी होणाऱ्या चर्चा आणि मुंबई – पुणे यांतील भाषिक स्पर्ध्येमुळे हा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत त्याच्या कथेशी जोडत ठेवतो.हा एक सर्वोत्तम बनलेला चित्रपट असून सतीश राजवाडे नी उत्तम प्रकारे दिग्दर्शित केलेला आहे.
  • कलाकारांनी त्यांच्या पत्राला योग्य तो न्याय दिला आहे. चित्रपटाची कथा एवढी सुंदर आहे की चित्रपट संपल्या नंतरही पुढे काय होईल आणि संपायला नको होता अस वाटायला लागत.
  • प्रत्येक चित्रपट प्रेमींनी पहावा असा हा चित्रपट आहे.

८. अगबाई अरेच्चा (2004) :

  • कथेची संकल्पना हॉलिवूड चा चित्रपट ‘ व्हॉट वुमेन वॉन्ट ‘ ची असली तरी चित्रपट पुढे जाऊन वेगळा रंग घेतो आणि त्याच रंगात आपल्याला रंगवण्याचा प्रयत्न करतो.
  • चित्रपट हा एक वेगळा धाटणीचा असून ह्या मध्ये एक वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. आपल्या प्रत्येकाला वाटतच की ‘ जर मला लोकांच्या मनातील कळलं असतं तर किती बरं झालं असत ‘आणि तेच जर स्त्रीच्या मनातील कळल तर आणखीच चांगलं. हाच विषय ह्या चित्रपटात मांडला गेला आहे.
  • चित्रपट हा एक कौंटुबिक चित्रपट  आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच वर्ष झाले असले तरी चित्रपटाची कथा ही नवीन वाटते आणि आपल्याला बांधून ठेवण्यात यशस्वी होते.

९. सैराट (2016) :

  • गावाकडील निस्वार्थ प्रेमाचा विषय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘ सैराट ‘ मधून उत्तम प्रकारे मांडला आहे,त्यामुळे हा चित्रपट प्रत्येकाला आपल्या जवळचा वाटतो,म्हणूनच तर ‘ सैराट ‘ ने मराठी चित्रपटसृष्टीत चांगलाच गाजावाजा केला.
  • हा चित्रपट गावकडील प्रेम त्यामध्ये येणाऱ्या अडचणी यांवर भाष्य करतो.दिग्दर्शन, कथा, संगीत, अभिनय कौशल्य हे सर्व आपल्याला ह्या चित्रपटाबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतात.
  • आपल्या कॉलेज जीवनातील आठवणी जाग्या करण्याचे काम ‘ सैराट ‘ ने केले आहे.त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी सैराट नक्की पाहावा.

१०. दुनियादारी (2013) :

  •  “तेरी मेरी यारी मग  **त गेली दुनियादारी” सद्द्या कोणाच्या न कोणाच्या तोंडातून हे शब्द नक्कीच ऐकायला मिळतात.
  • कॉलेज जीवन त्यातील हॉस्टेल जीवन त्यात आपल्याला मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे मित्र – शत्रू आणि त्यातच होणारे प्रेम….आणि प्रेमच मग ते पाहिलं आसू दुसर आणि किंवा मग शेवटच.
  • त्याच प्रेम+मित्र+आणि मित्रांचं प्रेम म्हणजेच दुनियादारी.जीवनात काही शिकल नाही तरी चालेल पण दुनियादारी माणसाने नक्कीच शिकली पाहिजे.
  • संवाद लेखन,गीत, दिग्दर्शन, आणि महत्त्वाचं म्हणजे कलाकारांचा अभिनय ह्या मुळे हा चित्रपट इतर चित्रपटांवर उजवा ठरतो.

Top 10 Marathi Movies Information in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *