Skip to content
Home » Tips Information in Marathi » Congratulation Letter in Marathi, अभिनंदन पत्राचे स्वरूप Format

Congratulation Letter in Marathi, अभिनंदन पत्राचे स्वरूप Format

Abhinandan Patra Letter Marathi

Congratulation Letter in Marathi

पत्र लेखन : उदा.१ – लग्नाच्या शुभेच्या देणारे पत्र

श्री. पद्माकर ल. देशपांडे
‘चैतन्य निवास’,
४०२, श्री सोसायटी,
कऱ्हाड – ४३११०७,
२४.०२.२०२०.

प्रिय राजेश,

अनेक अनेक आशीर्वाद,

सर्वात प्रथम तर तुझे आणि आमच्या सुनबाईचे खूप खूप अभिनंदन, तुमच्या वैवाहिक जीवनासाठी अनेक सदिच्छा आणि शुभाशीर्वाद. तुमच्या आयुष्यातल्या या अतिमहत्वाच्या प्रसंगी हजेरी लावू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. मला माहित आहे कि तू माझ्यावर रागावला आहेस, अरे तो तर तुझा हक्क आहे. पण आपल्या लाडक्या पुतण्याच्या लग्नाला कोणाला यावे वाटणार नाही? तुला घोड्यावर बसल्याचे स्वप्न मी दिवसाढवळ्या सुद्धा बघत होतो, पण तुला माहित आहे ना माझी नोकरी कशी आहे ते? काही अतिमहत्वाच्या सरकारी कामामुळे जमले नाही रे बाळा.

तुझे लग्न ठरल्याचे कळल्यापासून मी आणि तुझ्या काकूने कित्ती तयारी केली होती, लग्नात काय काय करायचे याचे आमचे सर्व नियोजन कधीपासून चालू होते. वरातीमध्ये जोडीने नाचायचे सुद्धा आम्ही ठरवले होते. लग्नाची पत्रिका आल्यापासून तर आमच्या आनंदाला पारावर उरलेला नव्हता. “काका काका” म्हणत सतत मागे मागे हट्ट करणाऱ्या राजेशचे लग्न आहे यावर कितीतरी वेळ विश्वास बसत नव्हता. तू इतका मोठा कधी झालास कळलेच नाही. कपडे, साड्या सर्व तयारी अगदी धुमधडाक्यात झाली होती. पण मला लग्नाला येता आले नाही, असो.

आम्ही तुझ्या लग्नामुळे खूप आनंदात आहोत, अरे दादा वाहिनी तर केवढे खुश असतील. सुनेच्या स्वागतासाठी तर काय करू आणि काय नको असे झाले असेल त्यांना. या पिढीमधला तू सर्वात मोठा आणि सर्वात लाडका, सर्वांचा दादा.

लग्न म्हणजे दोन कुटुंबाचा मेळ असतो, आपला आनंद द्विगुणित करणारा आयुष्यातील सर्वात महत्वाचा हा प्रसंग. तू लहानपणापासूनच समंजस आणि समजदार आहेस, पण आता तुझी जवाबदारी वाढली आहे. तुझे लग्न झाले आहे, सुनबाईंची सगळी जवाबदारी आता तुझ्यावर आहे, तिला खुश ठेव, काय हवे नको याकडे लक्ष देत जा. ती तिचे घर आई-वडील सोडून आपल्या घरी आली आहे, सुरवातीला अनेक भावनांनी तिच्या मनात गोंधळ घातला असेल अशा वेळेस तिला समजून घे, आपल्या घरातील ती आता एक सदस्य आहे याची जाणीव तिला करून दे.

लवकरच आम्ही तुला भेटायला येऊ, तेव्हा निवांत गप्पा मारू, लग्नातील गमती जमती ऐकायला मी खूपच आतुर झालो आहे आणि हो तोवर लग्नाचे फोटो येतील, असे बघशील का? म्हणजे आपण सर्व मिळून तुझ्या लग्नाच्या आठवणी परत जागवू. तोवर तुझा माझ्यावरचा राग निवळला असेल अशी आशा करतो.

सुनबाईंना आणि तुला दाम्पत्य जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद, तुमचे यापुढील आयुष्य सुख आणि समाधानाचे जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

दादा आणि वहिनींना माझा नमस्कार सांग.

तुझा प्रिय, पद्माकर काका.

Example 2 – Abhinandan Patra Format

अमोल द. किरपेकर
‘यशवंत निवास’
३०२, भाग्य नगर,
पिंपळवाडी – ४११०६८९.
१२.०२.२०२०.

प्रिय अक्षय,

सप्रेम नमस्कार,

आज सकाळी मुख्याध्यापकांकडून तुझ्या यशाबद्दल कळले, राज्यस्तरीय परीक्षेमध्ये तू आपल्या शाळेचे नाव अव्वल आणले त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. याबद्दल तुझे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. शाळेमध्ये सर्व अतिशय खुश आहेत, तुझ्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, आणि हे सर्व बघून आज माझा उर अभिमानाने भरून आला आहे. वृत्तपत्रामध्ये आज तुझा फोटो आला आहे आणि मोठ्या अक्षरात तुझे नाव छापून आले आहे. आपल्या शाळेसाठी तर आज खूप मोठा दिवस आहे.

सकाळी मुख्याध्यापक सरानी सर्वाना तुला मिळालेल्या यशाबद्दल सांगितले, तू केलेली मेहनत सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. आम्ही सर्वानी तुझा आदर्श घ्यावा आई ते यावेळी म्हणले, हि परीक्षा किती कठीण आणि कसोटीचे असते, परीक्षा पद्धत कशी असते हे सर्व त्यांनी सांगितले. त्यानंतर तुझ्या बद्दल मला वाटणारा आदर अजूनच वाढला आहे.

तुझी मेहनत, तुझी चिकाटी, अभ्यास या सर्वांचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले आहे. कित्ती कठीण परिश्रम घेतलेस तू हे यश मिळवण्यासाठी, सततचा अभ्यास, एकाग्रता आणि ध्येयाचा पाठलाग करून तू हे सर्व मिळवलेस. तुझ्याकडे बघताना मला पक्ष्याच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित केलेल्या अर्जुनाची गोष्ट आठवते. तू तुझे ध्येय पूर्ण केले आणि आज सर्वाना तुझा अभिमान आहे. अतिशय बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीतून मिळवलेले हे तुझे यश अगदी असामान्य आहे.

लहानपणापासूनच तू अतिशय हुशार आहेस, तुझी चिकाटी कमालीची आहे. तुझ्या या यशात तुझ्या आई बाबांचा खूप मोठा हात आहे हे विसरू नकोस. त्यांनी वेळोवेळी तुला पाठिंबा दिला आणि योग्य मार्गदर्शन केले म्हणूनच आज हे यश शक्य झाले, म्हणून त्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. त्यांच्यासाठी सुद्धा आज खूप मोठा दिवस आहे, नक्कीच त्यांना आज तुझा गर्व आहे. ते नेहमी म्हणतात कि आमचा अक्षय खूप मोठा होणार आहे, एक सरकारी अधिकारी म्हणून तुला बघायचे त्यांचे स्वप्न आहे आणि ते तू नक्की पूर्ण करणार असा आम्हाला विश्वास आहे, त्या दिशेने आज तू तुझे पहिले पाऊल टाकले आहे. त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे याची मला खात्री आहे.

आपल्या शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा तुझा खूप अभिमान वाटत आहे, बाकी सर्व विद्यार्थी तुझ्या या यशाने भारावून गेले आहेत आणि तुझी प्रेरणा त्यांनी घेतली आहे. आज तू अनेकांसाठी त्यांची आशा बनला आहेस, इच्छा तेथे मार्ग या म्हणीचा खरा अर्थ आज तू सर्वाना सांगितला आहेस. माझा आनंद मी शब्दात मांडू शकत नाही, मी तुला मेहनत करताना बघितले आहे आणि तुझ्या कष्टानं तू खरंच न्याय मिळवून दिला आहेस.

आपल्या गावामध्ये तुझ्या या यशाबद्दल तुझा सत्कार करण्याचे ठरवले जात आहे. सर्वजण अगदी जोरात तयारीला लागले आहेत आणि तुझ्या स्वागतासाठी इकडे तयारी चालू आहे. एवढे मोठे यश मिळवणारा तू आपल्या शाळेतला आणि तालुक्यातला एकमेव विद्यार्थी आहेस.

आता तुला कधी भेटतो असे मला झाले आहे, लवकर ये माझ्यासह सर्वजण तझ्या स्वागतासाठी आतुर आहेत.

तुझा प्रिय मित्र, आमोल.

➤➤ Read More Marathi Letters Format Here!

Congratulation Letter Format

2 thoughts on “Congratulation Letter in Marathi, अभिनंदन पत्राचे स्वरूप Format”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *