Home » Tips Information in Marathi » Shop Opening Invitation in Marathi | Invitation Card Text, Open Invite

Shop Opening Invitation in Marathi | Invitation Card Text, Open Invite

General_store

Shop Opening Invitation in Marathi

जनरल स्टोर्स चे उद्घाटन समारंभ

|| ॐ श्री गणेशाय नम: || || श्री कुलदेवता प्रसन्न || || श्री स्वामी समर्थ||

|| वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभम् | निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा ||

–: वैशाली जनरल स्टोर्स च्या उद्घाटनाचा भव्य सोहळा :–

रविवार, दिनांक 12 डिसेंबर 2020.
वेळ:- सकाळी 11 वाजता.

प्रसाद आणि अल्पोपहार संध्याकाळी ६ ते रात्री 10 वाजेपर्यंत
स्थळ :-वैशाली जनरल स्टोर्स, महात्मा गांधी रोड, चरई, ठाणे (पश्चिम) ठाणे.

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

सविनय प्रणाम ,
कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आमच्या नवीन “वैशाली जनरल स्टोर्स “ चे उद्घाटन रविवार, दिनांक 12 डिसेंबर 2020, सकाळी 11 वाजता माननीय नगरसेवक श्री बाळासाहेब पाटील ह्यांच्या शुभ हस्ते करण्याचे ठरविले आहे. त्यानिमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा पण संपन्न होणार आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या इष्ट मित्रांसह ह्या कार्यक्रमास हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि प्रसाद व अल्पोपहार ह्यांचा लाभ घ्यावा आणि आमचा आनंद द्विगुणीत करावा हि विनंती. आपण हे आग्रहाचे निमंत्रण स्वीकारून आम्हास तसे कळवावे म्हणजे आम्हाला तशी व्यवस्था करता येईल.

आपले स्नेहांकित,

श्री. अनंत रत्नाकर पाटील. सौ. रुपाली अनंत पाटील.
श्री गिरीश रत्नाकर पाटील. सौ. मीनाक्षी गिरीश पाटील.

वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे हि विनंती.
सुलभा, अरुण, अर्जुन, सोनाली आणि पिंकू.

स्वागतोत्स्तुक:-

धर्माजी तुकाराम पाटील माजी आमदार,
सौ. संगीता शरद जाधव, अध्यक्ष, महिला शाखा, जनता पार्टी.
श्री लक्ष्मीचंद गुजराथी, अध्यक्ष व्यापारी संघटना, ठाणे.
श्री. बाबुभाई कपाडिया, सेक्रेटरी, ठाणे उद्योग महामंडळ.
श्री सदानंद जाधव, ठाणे चेंबर ऑफ कॉमर्स.
वैशाली जनरल स्टोर्स . आमचे येथे सर्व प्रकारचे स्टेशनरी ,कटलरी, गिफ्ट, अलंकार, कापड इत्यादी उपयोगी वस्तू रास्त भावात मिळतील. एकदा अवश्य भेट द्या.

Invitation Letter Format

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *