Skip to content
Home » Tips Information in Marathi » Good Thoughts in Marathi | मराठी सुविचार

Good Thoughts in Marathi | मराठी सुविचार

Good Thoughts in Marathi

सुविचार :

  • तुम्ही कोणालाही बदलू शकत नसाल तर स्वत: बदला.
  • प्रत्येकजण स्वत:च्या आयुष्याची उभारणी स्वत:च करीत असतो
  • आत्मज्ञान ही आत्मप्रगतीची सुरुवात असते.
  • तुमची स्वप्न सत्यात यावी असं वाटत असेल तर आधी जागे व्हा.
  • संयम ही यशाची गुरूकिल्ली असते.
  • ज्ञान बोलते पण शहाणपण ऐकते.
  • ज्ञान हे खरे मत आहे. -प्लुटो
  • सगळ्यात उत्तम झोपेची गोळी म्हणजे स्वच्छ विवेक बुद्धी.
  • तक्रार बंद करा आणि विचार सुरु करा.
  • अपेक्षा हि सगळ्या डोकेदुखीचं मुख्य कारण आहे.-विल्यम शेक्सपियर
  • काळजी करणे म्हणजे पाऊस पडायची वाट बघत छत्री घेऊन चालणे.
  • जर तुम्ही सत्य बोललात तर तुम्हाला काहीच लक्षात ठेवण्याची गरज नाही.-मार्क ट्वेन .
  • आयुष्य म्हणजे ठसा उमटविणे, पैसा कमावणे नव्हे.-केविन क्रूस
  • जे माणूस ठरवतो आणि त्यावर विश्वास ठेवतो, ते तो मिळवतोच.
  • चांगला निर्णय हा ज्ञानावर अवलंबून असतो, संख्यांवर नाही.-प्लुटो
  • उद्याची बेगमी म्हणजे आज उत्कृष्ट काम करणे.
  • स्वप्न आणि त्यासाठी झोकून देणे हे अतिशय सुंदर मिश्रण आहे.
  • जगातील सर्वात मोठा तुरूंग म्हणजे लोक काय म्हणतील याची भीती.
  • तुमचा उत्तम शिक्षक म्हणजे तुमची शेवटची चूक.-अब्दुल कलाम.
  • काळजी उद्याचे त्रास घालवीत नाही तर आजची शांती घालवते.
  • शक्य आणि अशक्यतेमधील फरक म्हणजे माणसाचा ठाम निर्धार.
  • जगातील सर्वात दिवाळखोर मनुष्य म्हणजे ज्याचा उत्साह गेला आहे तो.
  • सकारात्मक वागणे हे सकारात्मक विचारांची साखळी तयार करतात.
  • इच्छा तेथे मार्ग.
  • सगळ्यात मोठी प्रार्थना म्हणजे संयम.
  • नेहमी उत्कृष्ट काम करा, तुम्ही जे पेराल तेच नंतर उगवेल.
  • अनुभव आपणास शिकवितो केव्हा थांबायचे आणि केव्हा पुढे जायचे.
  • खरा नेता म्हणजे असामान्य निर्धार असलेला सामान्य माणूस.
  • जिंकणाऱ्याकडे कार्यक्रम असतो तर हरणाऱ्याकडे सबब.
  • एकाच खिडकीतून दोन माणसे बघत असतील तर एक माती बघतो तर दुसरा तारे.
  • शंभर मतांपेक्षा एक कल्पना असणे केव्हाही चांगले.
  • चांगुलपणा हि अशी गुंतवणूक आहे जिची किंमत कधीच पडत नाही.
  • तुमच्या विचारांना जि‍भेची साथ देऊ नका.-विल्यम शेक्सपियर
  • आपण जे असतो ते आपल्या विचारांनी बनतो. -गौतम बुद्ध.
  • आपल्या भूतकाळाचे बंदीवान होऊ नका, तो फक्त एक धडा होता आजन्म कारावास नाही.
  • पर्वत छोट्या दगडांनी बनलेला असतो, समुद्र छोट्या थेंबानी बनलेला असतो. तसेच आपले आयुष्य पण अनंत छोट्या गोष्टीनी, कार्यांनी, संवादांनी, आणि विचारांनी बनलेले असते. आणि त्याचे परिणाम चांगले अथवा वाईट अगदी कमीत कमी असले तरी दूरवर परिणाम करतात. -स्वामी शिवानंद
  • आयुष्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला काय मिळाले ते शोधणे आणि आयुष्याचा हेतू म्हणजे ते बक्षीस देऊन टाकणे.-पाब्लो पिकासो.
  • तुम्ही किनार्‍यावरून नजर काढून घेण्याची हिम्मत ठेवल्याशिवाय समुद्र पार करू शकणार नाही.-ख्रिस्तोफर कोलंबस
  • जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी ठामपणे उभे नाही राहिलात तर कशासाठी पण पडाल .-जॉर्ज एडी.
  • जर तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीसाठी त्याग केला नाही तर हव्या असलेल्या गोष्टीचा त्याग करावा लागेल.
  • जर तुम्ही तुमच्या कर्तव्याला सलाम केला तर तुम्हाला कोणालाच सलाम करावा लागणार नाही.-अब्दुल कलाम.
  • औदार्य म्हणजे तुम्हाला देता येईल त्यापेक्षा जास्त देणे आणि गर्व म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणे.-खलील जिब्रान
  • शिक्षणाला पैसा लागतो हे खरे आहे, पण तो तर अज्ञानामुळेही लागतो.
  • तुम्हाला माहित आहे त्यापेक्षा कमी बोला आणि दाखवता त्यापेक्षा जास्त असू द्या. -विल्यम शेक्सपियर
  • मोठे ध्येय अपयशाची भीती निर्माण करते,पण अजिबातच ध्येयाचा अभाव ही अपयशाची खात्रीच असते.
  • कल्पनाशक्ती हे असे उर्जास्थान आहे जे तुमच्या योजनांना आकार देते आणि सत्यात उतरविते.
  • आनंदीपणाचे गुपित म्हणजे तुम्हाला आवडते ते करणे नव्हे तर तुम्ही करीत असलेले तुम्हाला आवडणे.
  • कुठलीही गोष्ट अशीच जात नाही. जोपर्यंत ती आपल्याला काहीतरी माहित असायला हवे ते शिकवून जात नाही.-पेमा चोद्रोन
  • अडचणींचे रस्ते नेहमी सुंदर मुक्कामाकडे जातात.
  • गोड शब्द नेहमी खरे असतात असे नाही आणि खरे शब्द नेहमी गोड असतात असे नाही.
  • जेंव्हा तुम्ही बोलता तेंव्हा तुम्ही फक्त तुम्हाला माहित असलेले बोलता पण जेंव्हा तुम्ही ऐकता तेंव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकता .-दलाई लामा.
  • काळ तुमच्या आयुष्यात कोणी भेटावे हे ठरवितो, तुमचे हृदय तुमच्या आयुष्यात कोण यावे हे ठरवितो आणि तुमची वागणूक तुमच्या आयुष्यात कोण राहावे हे ठरवितो.
  • आवाज चढवू नका, वाद घालण्याचे कसब वाढवा.
  • भिती लांडग्याला आहे त्यापेक्षा भयंकर बनविते. जर्मन म्हण.
  • तुमच्या चारित्र्याची खरी परीक्षा तुम्हाला न आवडणार्‍या माणसांना वागवितांना होते.
  • तुमच्यामध्ये आणि तुम्हाला काय व्हायचे आहे या मधला फरक म्हणजे तुम्ही काय करता ते.
  • जमावात सामील व्हायला काहीच लागत नाही, पण एकटे ठामपणे उभे राहण्यात खूप धैर्य लागते.
  • आत्मविश्वास वाढविण्याचा सोपा मार्ग म्हणजे तुम्हाला जे करायची भीती वाटते तेच करणे.
  • संवादातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपण समजून घेण्यासाठी ऐकण्यापेक्षा उत्तर देण्यासाठी ऐकतो.
  • बोलताना शब्द जपून वापरा कारण ते क्षमेला पात्र असले तरी विसरून जाण्यास नाही.
  • एखाद्या समस्येला उत्तर सापडलेच नाही तर हि समस्या नसून सत्य आहे असे समजावे आणि स्वीकारावे.
  • लोक तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटते ते कधीच दाखवित नाही तर वागून दाखवतात. तिकडे लक्ष द्या.
  • धैर्य म्हणजे भीतीवर मात नाही हे मी शिकलो, पण विजय भीतीवर मात करतो. -नेल्सन मंडेला.
  • आपण गोष्टी जशा आहेत तशा बघण्यापेक्षा आपण जसे आहोत तशा बघतो.
  • शिस्त म्हणजे अशा गोष्टी करण्याची जरूर असणे ज्या तुम्हाला कराव्याश्या वाटत नाही.
  • मी आज सकाळी दोन भेटवस्तू उघडल्या, माझे डोळे
  • तुमच्या आनंदाची गुरूकिल्ली दुसर्‍याच्या खिशात ठेवू नका.
  • स्वत:ला निवड बनवा, पर्याय नाही.
  • जेंव्हा आयुष्य खडतर व्हायला लागते तुम्ही आणखी ताकदवान बनायला लागा.
  • फक्त दोनच पर्याय आहेत. प्रगती करा अथवा सबबी द्या.
  • सन्मान मिळतो, प्रामाणिकपणाची प्रशंशा केली जाते, विश्वास मिळवावा लागतो आणि इमानदारी परत मिळते.
  • हृदयाच्या पाठीमागे जा, पण मेंदू बरोबर घेऊन जा.
  • तुमच्या निवडी तुमची भिती न दाखविता, तुमच्या आशा दाखवून द्या.
  • ज्ञान हे रोज काही तरी शिकणे आहे तर शहाणपणा हे रोज काहीतरी घालवणे आहे.
  • दोन गोष्टीनी तुमची ओळख होते, एक म्हणजे संयम जेंव्हा तुमच्याकडे काहीच नसते आणि वागणूक जेंव्हा तुमच्याकडे सर्व काही असते.
  • बोलताना विचार करून बोला, बोलून विचारात पडू नका.

Inspirational Thoughts in Marathi | Marathi Suvichar Good Thoughts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *