Skip to content
Home » Recipe » Shankarpali Recipe in Marathi | शंकरपाळे

Shankarpali Recipe in Marathi | शंकरपाळे

shankarpali marathi recipe

शंकरपाळे RECIPE / पाककृती

 

(Sweet / God Shankarpali) गोड शंकरपाळे हे दिवाळीतबनवले जाणारे खास महाराष्ट्रीय पक्वान्न आहे.

 

साहित्य

( इथे १ कप हा अमेरिकन प्रमाणाप्रमाणे २५० ग्रॅम/मी ली  धरला आहे याची कृपया नोंद घावी)

  • मैदा ………………………..५०० ग्रॅम
  • रवा ………………………….२५० ग्रॅम
  • दूध …………………………अर्धा कप
  • डालडा(वनस्पती)/तूप/तेल …………….१ कप
  • पिठी साखर ………………..३०० ग्रॅम
  • मीठ …………………………….१ चिमुट
  • तेल ………………………………तळण्याकरता

महत्वाच्या सूचना / कृती

  • थोडा डालडा आधी गरम करून घ्यावा. वाटल्यास मायक्रोवेव मध्ये ही गरम करता येईल.
  • आता मैदा चाळून घ्या व त्यात रवा, पिठीसाखर आणि मीठ घालून त्यात गरम डालडा मिसळावा व हातानी चांगला कुस्करावा. सर्व मिश्रण रवाळ होईल.
  • आता यात दूध मिसळावे व मऊ अशी कणिक भिजवावी.
  • ही कानी चांगली १५ ते २० मिनिटे तिंबावी. यावर चांगलीच मेहनत अपेक्षित आहे.
  • ही कणिक दमात कापडाने झाकून १५ ते २० मिनिटे ठेवावी.
  • आता या कणकेचे मोठे गोळे करून त्याच्या मोठ्या पण जाडसर पोळ्या लाटाव्या .लाटताना सुका मैदा भूरभूरावा म्हणजे कणिक पोळपाटाला चिकटणार नाही.
  • या पोळ्यांचे सुरी अथवा शंकरपाळे कातर च्या सहाय्याने लांबट चौकोनी तुकडे कातरावे.
  • कढईत तेल तापवावे. तेल तापल्यावर मंद आंचेवर हे शंकरपाळे सोनेरी रंगावर तळून घ्यावे. अशा तर्हेने सर्व शंकरपाळे तळून घ्यावे.
  • गार झाले कि हवाबंद डब्यात भरून ठेवावे. हे १० दिवस छान टिकतात.
  • दिवाळीत छानशा ताटात हे शंकरपाळे सजवून पाहुण्यांना खुश करा.

Recipe / रेसिपी  आवडली तर  जरूर  SHARE करा !

2 thoughts on “Shankarpali Recipe in Marathi | शंकरपाळे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *