Name Girish Kulkarni (गिरीश कुलकर्णी)
Also Known as / Real Name Girish Pandurang Kulkarni
Age / How old / Birthday / Date of Birth / DOB 19th May 1977. As of 2025, he is around 48 years old.
Marital Status / Wedding & Marriage / Wife His Wife Name Is married and has a daughter Sharavi.
Career Span 2008 – Present
TV Serials & Shows Acted Chitrapat / Films / Movies Acted- Valu (2008)
- Gabhricha Paus (2009)
- Gandha (2009)
- Vihir (2009)
- Deool (2011)
- Masala (2012)
- Pune 52 (2013)
- Ugly (2013)
- Postcard (2013)
- Aanandbhog
- EK DIWAS MATHA KADE
Most Memorable Role As Amar Apte in Pune 52 / As Keshya in Deool
Biography & Wiki
‘गिरीश पांडुरंग कुलकर्णी’ मराठी अभिनेत्यांच्या यादीतील एक महत्वाचे नाव.
व्यक्तिगत आयुष्य :
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा या तालुक्यात गिरीश पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म झाला. पण यांचे लहानपण व शिक्षण पुणे येथेच झाले. गिरीश कुलकर्णी यांनी लातूर येथून मेकानिकल इंजिनियरिंग चा डिप्लोमा केला. सुरुवातीस काही काळ त्यांनी इंजिनियरिंग कंपनीत नोकरी ही केली परंतु त्यात त्यांचे मन रमले नाही. लातूर ला असतानाच नाट्य क्षेत्राशी त्यांचा संबंध आला व पुढे नाट्य लेखनातच आपण करियर करावे असे त्यांना प्रकर्षाने जाणवले व त्यांनी अभियांत्रिकी जगाशी आपले नाते तोडून टाकले.
करियर :
अभियांत्रिकी जगाशी नाते तोडल्यावर गीरीशजीनी रेडियो मिरची वर क्लस्टर प्रोग्रामिंग हेड म्हणून काही काळ काम केले. त्यांना समाजातील विविध स्तरांवरील व्यक्तीच्या निरीक्षणाची आवड आहे व त्यांच्या या निरीक्षणातून प्रेरणा घेऊन त्यांनी अनेक पात्र व त्यांच्या अनेक कथा रचल्या आहेत .
मराठी चित्रपट सृष्टीतील कामगिरी
वळू हि कथा अशीच जन्मली. यातील सर्व पात्र कोणत्याही एका भारतीय गावात सहज सापडतील अशी आहेत. हि एक अतिशय मनोरंजक अशी कथा आहे जी गावातील एका बैलाच्या भोवती गुंफली गेली आहे. गावातील हा मोकाट सुटलेला बैल व त्याला पकडण्यासाठी गावकऱ्यांची चाललेली तारांबळ अशी काहीशी विनोदी अंगाने जाणारी अशी हि कथा यात नाट्य, प्रणय आणि गूढ असे सर्व रंग आहेत. गिरीश कुलकर्णी हे या चित्रपटाचे कथाकार, संहिता कार, संवाद लेखक आणि निर्माता आहेत .
२००९ साली गिरीश कुलकर्णी यांनी गाभरिचा पाउस हा एक अतिशय संवेदनशील विषयावरचा चित्रपट आला. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी यांनी विदर्भातील एका गरीब शेतकऱ्याची भूमिका केली आहे. या चित्रपटात शेतकर्यांच्या भेडसावणारे प्रश्न मांडले आहेत. कमी पडणारा पाऊस, डोक्यावर असलेले सावकाराचे कर्ज, शासनाचे या बाबतीतले दुर्लक्ष आणि यावर तोडगा म्हणून नैराश्यातून केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अशा समस्या या चित्रपटात मांडल्या आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीने त्यांच्या बरोबर नायिकेची भूमिका केली आहे.
२००९ मधेच विहीर हा त्यांची कथा, संहिता व संवाद असलेला आणखी एक चित्रपट आला. हि कथा आहे एका किशोरवयीन मुलाची ज्याचा नातलग असलेला जिवलग मित्र मृत्युमुखी पडतो. आणि त्याच्या मृत्यूने सैर भैर झालेला हा मुलगा मृत्युचे रहस्य जाणून घेण्यासाठी धडपडतो .हा चित्रपट थोडा गूढ थोडा अनाकलनीय अशी कोडी मांडणारा असा आहे. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.
हा चित्रपट बर्लिन च्या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला व या चित्रपटाला समीक्षकांची जगभरातून दाद मिळाली.
२०११ मध्ये गिरीश कुलकर्णी यांचा देऊळ हा चित्रपट आला. या चित्रपटाची कथा, संहिता आणि संवाद यांचे लेखन गिरीश कुलकर्णी यांचे आहे. यात सामान्य जनतेच्या धार्मिक भावनांचा फायदा राजकारणी लोक कसा घेतात याचे चित्रण आहे. यात स्वतः गिरीश कुलकर्णी यांच्या बरोबर नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी यांचा दमदार अभिनय बघायला मिळतो. या चित्रपटासाठी त्यांना अभिनय व संवाद्लेखना करता राष्ट्रीय पुरस्कार हि मिळाले.
२०१२ मध्ये गिरीश कुलकर्णी यांची कथा असलेला आणखी एक चित्रपट आला मसाला. यात त्यांच्या बरोबर अमृता सुभाष या अभिनेत्रीने मध्यवर्ती भूमिका केली आहे. एका सामान्य गरीब माणसाने चरितार्थासाठी केलेल्या धडपडीचे मार्मिक चित्रण या चित्रपटातून दिसते.
या शिवाय त्यांचे इतर हि अनेक उल्लेखनीय चित्रपट आहेत. रहस्यपट पुणे ५२, जाऊन द्या न बाळासाहेब, पोस्ट कार्ड आणि सचिन कुंडल्कारचा गंध, हे चित्रपट हि गिरीश कुलकर्णी यांच्या विशेष अभिनयाने नटलेले आहेत. यानंतर त्यांच्या आगामी मराठी चित्रपटांच्या यादीत हायवे हे नाव आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील कामगिरी
त्या नंतर गिरीश कुलकर्णी याने हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलेले दिसते. अनुराग कश्यप यांच्या अग्ली या चित्रपटात त्याने केलेली एका पोलिसाची भूमिका हि अतिशय वेगळी अशी भूमिका म्हणता येईल. लोकांना टी विशेष आवडली देखील.
या गुणी कलाकाराला त्याच्या पुढील वाटचालीकरता अनेक शुभेच्छा.