Skip to content

Earthquake Essay in Marathi | Earthquake Mahiti Nibandh | भूकंप

Earthquake Marathi Mahiti

Earthquake Essay in Marathi

भूकंप – पृथ्वीचा रौद्रावतार

वक्त नावाचा एक सिनेमा होता.त्यात नवीन घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात गाणे बजावणे होतात.सर्व आनंदाचे वातावरण असते अन अचानक भूकंप होतो आणि सगळ तहस नहस होऊन जाते. सगळे विखुरले जातात. आणि सर्वात शेवटी एकत्र येतात.भूकंप, त्रेमार,भूस्खलन ह्य नावानी पृथ्वीच्या पोटातील उत्पात भयंकर रूप घेऊन बाहेर पडतात आणि वाटेत येणाऱ्या सर्व गोष्टींचा नाश करतात. माणसाने कितीही मंगळावर जाण्याच्या गप्पा केल्या तरी निसर्गापुढे तो कायम क्षुद्रच राहणार आहे हे निसर्ग त्याला दाखवून देतो. सूर्यापासून विलग झाल्यावर तप्त गोळा असलेली पृथ्वी हळू हळू थंड होत गेली आणि तापवलेल्या दुधावर जशी घट्ट साय येते तशी तिच्या पृष्ठभागावर जमीन तयार झाली आणि वायुंचा संयोग होऊन पाणी तयार झाले. त्यावर जीव जंतूंची उत्पत्ती होऊन मनुष्य प्राण्यापर्यंत विकसित विश्व निर्माण झाले.

भूकंप म्हणजे? :

तरीही त्या पृष्ठभागाखाली द्रवरूप लाव्हा आणि वायुरूप अग्नी आहेच. त्यामुळे आपल्या कातडीच्या रचनेप्रमाणे पृथ्वीच्या रचने चे चार भाग पडतात. अगदी वरचा म्हणजे अर्थ क्रस्ट.त्यात लिथोस्फ़िअर ,टेक्टोनिक प्लेन असतात. त्याखाली मॅन्टल नंतर आउटर कोअर, आणि इनर कोअर असे भाग पडतात. पोटात असलेल्या द्रवापायी भूगर्भात असंख्य आणि अविरत हालचाली सुरु असतात. त्यांना प्रवाह म्हणतात.त्यांचे पीवेव्ह आणि एस वेव्ह असे प्रकार आहेत. आणि त्यांच्या लाटांनी तेक्तोनिक लेयरवर परिणाम होऊन तेक्तोनिक प्लेट म्हणजे चकत्या एकमेकींना धडक देतात,एकावर एक चढतात किंवा एकमेकांपासून दूर जातात. त्यामुळे भांडे घुसळले तर साय कशी फाटते तशा त्या प्लेट फाटतात. त्यामुळे घट्ट आवरणावर ताण तणाव वाढतो आणि भूकंप होतो. तेक्टोनिक प्लेट ज्या तर्हेने एकमेकांशी घर्षण करतात त्याप्रमाणे भूकंपाचे प्रमाण ठरते. अशा प्लेतना फॉल्ट म्हणतात. हे जिथे सुरु होते ते भूकंपाचे एपिसेंटर असते. ह्याखाली हायपोसेंटर असते. सामान्यपणे प्लेट्स चे एकमेकांना घासणे कायम चालू असते पण जेंव्हा फॉल्ट लॉक होतो तेंव्हा स्ट्रेस वाढतो आणि प्रचंड स्ट्रेस मुळे इलास्तिक स्ट्रेन एनर्जी पैदा होते आणि फ्राक्चर झालेल्या प्लेट पुढे अजून तोडफोड सुरु करतात. त्याला सिज्मिक एनर्जी म्हणतात.

प्रकार :

तीन प्रकारचे फॉल्ट असतात. स्टाईक स्लीप,त्यामुळे 8 रिश्टर पेक्षा मोठा भूकंप होतो,रिव्हर्स स्लीप ज्यामुळे 8 रिश्टर पेक्षा कमी भूकंप होतो आणि नोर्मल स्लीप ज्यात 7 रिश्टर पेक्षा कमी तीव्रतेचा भूकंप होतो. ह्याशिवाय भूकंप होण्याची अजून करणे आहेत .ती म्हणजे खाली दिल्याप्रमाणे:
1. ज्वालामुखीचा स्फोट
2. तेक्तोनिक हालचाल,
3. भूगर्भीय हालचाल,
4. मानव निर्मित
5. किरकोळ तोडफोड.
ह्यामध्ये भूस्खलन, जमिनीला तडे जाणे,जमीन खचणे, समुद्राच्या तळाशी भूकंप होणे इत्यादी.पूर्वी ह्याला देव कोपला असे म्हणत किंवा देव दानवांचे युद्ध सुरु झाले असे म्हणत. आता सिज्मोलोजी म्हणून शाश्त्राच्या शाखेत याचा अभ्यास चालू आहे आणि प्राथमिक लक्षणांवरून आधी भूकंपाचा अंदाज येऊ शकतो.

जगातील सर्वात मोठे भूकंप :

तरीही जगभरात असंख्य भूकंप होऊन अतोनात मनुष्य हानी झाली आहे. त्यापैकी मोठे भूकंप खालीलप्रमाणे:

1.सर्वात मोठा भूकंप आलेप्पो शहरात 1138 ला झाला त्याची तीव्रता 9.8 रिश्टर होती आणि 2.30,000 माणसे मेली.
2.शेंसी चीन मध्ये 1956 साली 8.0 तीव्रतेचा भूकंप झाला त्यात 8,30,000 माणसे मेली.
3.दमघम इराण मध्ये 1856 मध्ये 2 लाख माणसे मेली.
4.हैयान निन्जक्षि ,चीन येथे 1920 मध्ये भूकम झाला त्यात 2 लाख माणसे मेली.
5. क्यांतो जपान मध्ये 1923 मध्ये भूकंपात 1,42,800 माणसे मेली.
6. सेंट हेलेन’स मध्ये ज्वालामुखीच्या स्फोटामुळे 1980 मध्ये भूकंप झाला
7. चीपास मेक्सिको 5.4 रिश्टर, लाओस6.1 रिश्टर, रशिया 6.3 रिश्टर परत चीपास मेक्सिको, 6.3 रिश्टर आर्जेन्टिना 5.8 रिश्टर कोबे, तोंगा, साउथ आफ्रिका इंडोनेशिया येथे पण 5 ते 6 रिश्टर चे भूकंप नोंदवले गेले.

भारतात मोठा भूकंप कोयना येथे झाला आणि त्यात आसपास ची सर्व खेड्यांची जलप्रलय आणि भूकंपामुळे वाताहत झाली. तो जवळपास 7 रिश्टर स्केल चा होता. त्यानंतर मालीण गावात भूस्खलन झाले आणि अख्खे गाव मातीच्या ढिगार्याखाली गेले. समुद्रात झालेल्या भूकंपामुळे दक्षिणेकडे सुनामी आली आणि केरळ, मद्रास, जावा सुमात्रा ,अंदमान निकोबार हि बेटे ह्यासार्वांना त्याचा तडाखा बसला. समुद्रात होणार्या भूकंपामुळे ज्यालाटा उसळतात त्या एका उंच इमारती एव्हड्या असतात. आणि त्यात काठावरची वस्ती गिळंकृत करण्याची ताकत असते.

भूकंप मानवनिर्मित सुद्धा असतो. कोयनेच्या धरणात पाण्याच्या दाबामुळे भूकंप झाला. तसेच ऑस्ट्रेलियात खाण कामामुळे भूकंप झाला. वारंवार होणार्या अणुचाचणी आणि रॉकेट उड्डाणामुळे पण जमिनीत घडामोड होऊन पुढे सरकत जाऊन दुसर्याच प्रदेशातील निष्पाप लोकांची भूकंप होऊन वाताहत होते. जसे हल्ली पालघर(ठाणे) परिसरात एका धरणामुळे वारंवार धक्के बसत आहेत आणि भिंतींना तडे जात आहेत. आता सिझ्मोग्राफ आणि टील्टमीटर ह्यांच्यामुळे जमिनीतील बारीक सारीक बदल नोंदवले जातात. आणि लोकांना जागे केले जाते.

भूकंप झाल्यावर घेण्याची काळजी :

घरात असाल तर बाहेर धावू नका, घरातच मोठ्या दणकट टेबलाखाली डोक्यावर उशी किवा जड पांघरून घेऊन बसावे. किंवा घराच्या कोपऱ्यात उभे रहावे. बाहेर असल्यास अग्निवहन होणार्या वाहनांजवळ, झाडांजवळ, इमारतीजवळ उभे राहू नये. भूकंपानंतर आलेल्या सुनामी साठी किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांनी शक्यतो किनाऱ्यापासून दूर पाळावे आणि जास्तीत जास्त उंच ठिकाणी जावे.

भूकंप हा परमेश्वरचा कोप आहे असे बऱ्याच दंतकथांमध्ये दिलेले आहे. एका दंतकथेत एका राक्षसाला परमेश्वराने शिक्षा केलेली होती .त्याला विषारी सापांच्या विळख्यात ठेवले होते आणि विष अंगावर/तोंडावर पडू नये म्हणून तो डोके हलवीत असे.त्याने डोके हलविले की भूकंप होतो असे म्हणतात.तसेच चिडलेला देव त्रिशूल आपटतो तेंव्हा भूकंप होतो असे म्हणतात. ह्या जरी कथा असल्या तरी पृथ्वीवर केलेल्या अन्यामुळे ती चिडणार आणि भूकंप होणार हे ठरलेले आहे.फक्त करे कोई,भरे कोई असे होते इतकच.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Composition – Earthquake Essay in Marathi Language Wikipedia

Earthquake Essay in Marathi

1 thought on “Earthquake Essay in Marathi | Earthquake Mahiti Nibandh | भूकंप”

  1. फार छान ओखवती भाषा, खुप महत्वाची माहिती देखील कव्हर केली आहे. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला ज्ञानात भर घालणारी असे निंबध आहेत. सैनिकांचे आत्मवृत्त अभिमान तसेच त्यांची शौर्यगाथा सांगते. फूल पाखरू किंवा मी पक्षी झालो तर हे निंबध खूप छान हलक्या फुलक्या वातावरणात मनाला घेऊन जातात व मन प्रसन्न करतात.
    खुप खुप धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *