Skip to content

Labrador Information in Marathi | लॅब्राडोर माहिती, Information Dog

labrador information mahiti

Labrador Information in Marathi

लॅब्राडोर- माणसाचा एक सच्चा साथी

एक बातमी नुकतीच ऐकली होती. मिशिगन येथील कुटुंबातील लॅब्राडोर तीन वर्षांपूर्वी हरवला होता. त्यांनी खूप शोधला, सगळ्या संस्थांची मदत घेतली पण सापडला नाही, तो तीन वर्षांनी त्यांना चीप मुळे सापडला. आणि त्यांचे भेटणे इतके हृदयस्पर्शी होते की,सगळ्यांचे डोळे पाणावले.जसे कांही त्यांचा हरवलेला मुलगाच सापडला. खरोखर लॅब्राडोर हा कुत्रा तुमच्या कुटुंबातील एक सदस्यच होतो. तो इतका तुमच्यामध्ये गुंततो, तुमची काळजी घेतो, तुमच्या मुलांशी खेळतो. म्हणून ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये लॅब्राडोर हा अपंगांना आणि आंधळ्यांना मदतनीस आणि इलाज करणारा तसेच ड्रग,बॉम्ब, किंवा गुन्हे शोधण्यासाठी हुंगणारा म्हणून पोलीस, लष्करात कामास येणारा, मासेमारीसाठी मदत करणारा कुत्रा म्हणून ह्याला प्रथम पसंती आहे. कारगिलच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतांना लष्करातील ह्या कुत्र्यांनी देखील सलामी दिली. इतके शिस्तीत पुढचे पाय टेकवून बसले होते की माणसे काय सलामी देतील! हि कुत्री कुठल्याही प्रशिक्षण घेण्यास आणि पाळण्यात अत्यंत हुशार आणि समंजस आहेत.म्हणून ब्रिटनने ह्यांची खास पैदास विकसित केली आहे. अमेरिकन केनेल क्लबने देखील ह्या कुत्र्यांवर संशोधन केले आहे.

इसवी सन 1800 साली ह्या कुत्र्याचा शोध लागला.ह्याचा न्यूफाउंडलंडला मासेमारीसाठी उपयोग होत असे. हा जाळी ओढणे, मासे पकडणे आणि जाळ्यातून सुटलेल्या माशांना बर्फात सूर मारून परत जाळ्यात ढकलणे असे काम करीत असे. इसवी सन 1830 मध्ये कॅनडा मधून ह्या जातीचे कुत्रे ब्रिटन मध्ये आणून विकसित केले गेले. तेंव्हापासून हा माणसाचा मित्र म्हणून काम करतो. ब्रिटन अमेरिकेत ह्याला विशेष पसंती आहे ते त्याची हुशारी आणि प्रशिक्षणाची तयारी म्हणून. त्याच्या बुद्ध्यांक इतर कुत्र्यांपेक्षा जास्त आहे.

लॅब्राडोर हा मध्यम उंचीचा, धष्टपुष्ट होणारा आणि केसाळ शेपटीचा कुत्रा आहे.त्यात पण दोन प्रकार आहेत. ते म्हणजे फिल्ड आणि शो. फिल्ड हा प्रत्यक्ष कामवर असणारा म्हणजे पोलिसात,लष्करात भरती झालेला असतो त्याचे पाय लांब असतात आणि तो चपळ असतो. शो डॉग म्हणजे हुंगणारा आणि घरगुती पाळीव प्राणी असतो.तो बुटका आणि दणकट असतो.व शेपटी केसाळ असते. एकूण सर्व लॅब्राडोर तीन रंगाचे असतात. क्रीम ते पिवळा, चॉकलेटी आणि काळा. त्याची विशेषता म्हणजे त्याच्या अंगावर दुहेरी कातडी आहे आणि वरची कातडी व केस जलरोधक असल्याने तो पाण्यात चांगला पोहू शकतो तसेच त्याचे पंजे बदक व बेडकासारखे पारदर्शक कातडीने बांधलेले असतात, त्यामुळे त्यात पाणी शिरून राहत नाही. आणि त्याला जंतू संसर्ग होत नाही.लॅब्राडोरचे आयुष्मान 10-12 वर्षे इतकेच असते. नर लॅब्राडोर 57 ते 62 सें.मी उंच आणि 29 ते 36 किलो इतक्या वजनाचे असतात. मादी 55 ते 60 सें.मी. उंच आणि 25 ते 32 किलो इतक्या वजनाची असते.

लाब्राडोरला प्रशिक्षण दिले तर तो आजाऱ्याची रुग्णसेवा, मुलांबरोबर खेळणे, वस्तू शोधणे, गुन्हेगार, आरडीएक्स शोधणे, युद्धकाळात मदत करणे अशी महत्वाची कामे जबाबदारीने पार पडतो. फक्त त्याला भयंकर कुतुहूल असते त्यामुळे तो कुटुंबापासून लहान मुलासारखा चुकतो.त्याची खूप काळजी घ्यावी लागते कारण इतर कुत्र्यांपेक्षा त्याला संसर्ग लवकर होतो. त्याला होणारे रोग म्हणजे कांही अनुवांशिक आणि कांही परिस्थितीने होणारे असतात. उदा. ब्लोट, यकृताचे रोग, हिमोफिलिया, अनेमिया, दिस्प्लासिया, OCD [ सांध्यांचे रोग] डायबीटीस, एलर्जी, एपिलेप्सी, हृदयविकार कॅन्सर, व्यायाम करतांना कोलप्स होणे इत्यादी. तसेच त्याचे केस गळणे पण जास्त होते.

1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात जंजीर नावाच्या कुत्र्याने प्रचंड प्रमाणत आरडीएक्स शोधून दिले आणि त्यानंतर पण त्याने पोलीस खात्यात अतुलनीय कामगिरी केली. पोलिसात आणि लष्करात ह्या कुत्र्यांना मानाचे पदक मिळते आणि ऑफिसरची पदवी पण मिळते.

कुत्र्याच्या जन्मात येउनसुद्धा असे जीवन सार्थकी लावणारा हा प्राणी म्हणजे माणसाला आदर्श आहे.

Information of Labrador Dog in Marathi / Labrador Dog Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *