Skip to content

Umesh Kamat Wiki, Height, Wedding, Biography, Age

umesh kamat Marathi actor
Name Umesh Kamat | उमेश कामत

Also known as Umesh Kaamat

Age / How old / Birthday / Date of Birth / DOB 12th December 1978. As of 2024, she is around 46 years old.

Marital Status / Wedding & Marriage / Wife Married to Priya Bapat since 2011.

Wikipedia Bio / Profile Background

मराठी रंगभूमी आणि सिने सृष्टी चे कलाकार त्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांवर मोहिनी घालतात. काळाप्रमाणे
सिनेमाचे विषय बदलले तसे नायकाचा चेहरा ही बदलला. पूर्वीच्या रांगड्या गड्याची जागा आता च्या काळात गोड चेहर्याच्या नायकांनी घेतली. सिनेमाची, नाटकांची कथानकं हि वास्तववादी होत गेली. उमेश कामत हा असाच एक गोड चेहऱ्याचा नायक.
१२ डिसेंबर १९७८ साली बंगलोर ला उमेश चा जन्म झाला.

सिने कारकीर्द

२००६ साली कायद्याचं बोला या चित्रपटापासून उमेशने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचा नायक मकरंद अनासपुरे असला तरी उमेश ने रसिकांचे लक्ष न घेतले. यापुढे आले समर..एक संघर्ष ; क्षणोक्षणी ; अजब लग्नाची गजब गोष्ट; धागेदोरे ; मणी मंगळसूत्र ; थोडी खट्टी थोडी हत्ती; टाईम प्लीज ;लेक लाडकी ; परीस ; माय डियर यश ; लग्न पाहावे करून ; पुणे वाया बिहार …हे त्याचे काही महत्वपूर्ण भूमिका असलेले चित्रपट.

दूरचित्रवाणीवरील कारकीर्द

अभिनयाच्या दृष्टीने चित्रपट सृष्टीतील यश महत्वाचे असले तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारासाठी दूरचित्रवाणी चे माध्यम खूपच पूरक ठरते. उमेश च्या बाबतीतही असेच झाले. दूरचित्रवाणी वरील मालिकांनी त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्याच्या काही मालिका तर इतक्या लोकप्रिय झाल्या कि लोकांनी त्यांचे रेकॉर्डिंग करून आपल्या संग्रही ठेवले.
शुभंकरोती ; सारीपाट संसाराचा ; वादळवात ; ऋणानुबंध ; पडघम ; या गोजिरवाण्या घरात ; आभाळ माया ; असंभव ; एका लग्नाची दुसरी गोष्ट ; एका लग्नाची तिसरी गोष्ट. वरील मालिकांपैकी आभाळमाया, असंभव, व एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिका उमेशच्या मराठी मालिकांमधील सर्वाधिक यशस्वी मालिका आहेत असे म्हणता येतील.

त्यातही असंभव या मालिकेचा गूढ रम्य विषय…पुनर्जन्म असल्याने प्रेक्षकांना ती विशेष भावली. या शिवाय उमेश कामत ची भूमिका २ काळातली होती .आजचा आधुनिक नायक व १०० वर्षांपूर्वीचा तरुण नायक अशा २ प्रकारची वेशभूषा, बोलण्या चालण्यातील अंतर सर्वच अप्रतिम होते. त्याने रंगवलेला जुन्या व नव्या काळातला हा नायक रसिकांना खूपच भावला.

नाटकं

चित्रपट व दूरचित्रवाणी प्रमाणेच किंबहूना या दोन्ही पेक्षा कलाकाराला अभिनयाचा सर्वोच्च आनंद रंगभूमी वरील कारकिर्दीत मिळतो. रंगमंचावर प्रेक्षकांशी होणारा थेट संवाद अभिनेत्याला समृद्ध करत जातो …अनुभवाने.

रंगमंचावरच्या अभिनयाची चव चाखलेले कलाकार सतत तो अनुभव पुन्हा पुन्हा मिळवू इच्छितात .उमेश कामत ने चित्रपटांबरोबर अनेक नाटकातून ही अभिनय केला .किंबहूना महाविद्यालयीन काळातील त्याने नाटकातून केलेल्या अभिनयानेच त्याला अभिनयाच्या क्षेत्राकडे आकर्षित केले असावे. त्यातील काही निवडक नाटकं खालील प्रमाणे. मन उधाण वाऱ्याचे ; नवा गडी नव राज्य ; ह्यांच हे असंच असत ; कस ग बाई झालं ; सोनचाफा ; स्वामी ; रणांगण ; गांधी आडवा येतो अशा या गुणी कलावंताला अभिनयाची अनेक पारितोषिके मिळाली त्यात नवल ते काय ?
उमेशला त्याच्या महाविद्यालयीन जीवनात ही त्याने भाग घेतलेल्या अनेक नाट्य स्पर्धांत पारितोषिके मिळाली आहेत. त्याच बरोबर व्यावसायिक रित्या अभिनय क्षेत्रात आल्यावरही उमेशला पारितोषिके मिळतच गेली.

पारितोषिके

समर एक संघर्ष साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता…महाराष्ट्र राज्य पुरस्कार
झी गौरव पुरस्कार
म. टा. सन्मान पुरस्कार
इनवेस्टमेंट या नाटकासाठी २००२ साली डॉ. श्रीराम लागू पारितोषिक
अर्थ निरर्थ या एकांकिके साठी मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार
एंड दे लिव्ड हॅप्पीली एवर आफ्टर या एकांकिके साठी मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिच्याशी उमेश कामत याचा विवाह झाला असून हे जोडपे मराठी प्रेक्षकांचे लाडके जोडपे आहे.

Career Span 2005 – Present

TV Serials & Shows Acted
 • Abhalmaya
 • Ya Gojirvanya Gharat
 • Padgham
 • Runanubandh
 • Wadalvaat as Soham
 • Saripat Sansaracha
 • Eka Lagnachi Dusri Goshta
 • Eka Lagnachi Teesri Goshta
Chitrapat / Films / Movies Acted
 • Pune Via Bihar (Abhijeet Bhosle) (2014)
 • Lagna Pahave Karun (Nishant Barve) (2013)
 • My Dear Yash (Anshuman Karnik (2013)
 • Time Please (Hrishikesh Deshpande) (2013)
 • Parees (2013)
 • Lek Ladki (2013)
 • Daagedore (Prasad Karnik) (2012)
 • Thodi Khatti Thodi Hatti (Mihir) (2012)
 • Mani Mangalsutra (Shantanu) (2010)
 • Ajab Lagnachi Gajab Gosht (Rajeeev Phansalkar) (2010)
 • Kshanokshani (2010)
 • Samar – Ek Sangharsha (2007)
 • Kaydyacha Bola (Abhijit) (2006)
Natak / Plays Acted
 • Gandhi Aadva Yeto
 • Ranangan
 • Swami
 • Sonchapha
 • Kasa Ga Baai Zaala
 • Hyancha Hey Asach Asta
 • Nava Gadi Nava Rajya
 • Mann Udhan Varyache
Most Memorable Role Too many to name one!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *