नॉर्थ अमेरिकेमधील (यु एस ए आणि कॅनडा ) टॉप २० महाराष्ट्रीयन मंडळे.
- कल्पना करा तुमच्याकडे एक छान बंगला आहे, उत्तम नोकरी आहे, गाडी मस्त आहे आणि नुकताच तुम्हाला तुमच्या ऑफिस मध्ये पदोन्नती मिळालेली आहे. सगळं खूप छान छान चालू आहे. मग तुमच्या बायको मुलांनी ठरवलं कि आपण एक पार्टी देऊयात.
- आणि जेव्हा तुम्ही यादी करायला बसता तेव्हा तुम्हाला कळत कि आपला कौतुक बघायला, आपला प्रगती बघायला आशीर्वाद आणि सदिच्छा द्यायला तर आपले असे कुणीच नाहीये… कारण नोकरीसाठी आपण आपला गाव, देश आपली लोक सगळं सोडून परदेशात आलोय.
- मग काय करणार? नोकरी साठी, व्यापार उद्योगासाठी आणि अगदी शिक्षणासाठी देखील भारतातील अनेक लोकांना आपला गाव आपला देश सोडावा लागला. प्रगती करायची असेल तर स्थलांतर करावेच लागते हा नियम आहे.
- पण वर सांगितल्याप्रमाणे परिस्थिती आपल्यावर येऊ नये, आपल्यावर जे मराठी संस्कार झाले तेच आपल्या मुलांवर कायम राहावे, परदेशात देखील आपल्या मातीची नाळ टिकून राहावी, आपली माणसे सुख दुःखात आपल्या सोबत असावीत म्हणून महाराष्ट्रातून स्थलांतर केलेल्या लोकांनी मंडळांची स्थापना केली.
- इथे ख्रिसमस न्यू इयर प्रमाणे गुडीपाडवा देखील अगदी बघण्यासारखा असतो. गणपती विसर्जच्या मिरवणुकीतले ढोल ताशे, फेटे घातलेले स्वयंसेवक भगवा द्वज संपूर्ण अमेरिका डोळ्यात प्राण आणून अगदी आश्चर्यचकित नजरेने बघत असते.
- चला तर मग बघुयात कि कोणते आहेत ते २० महाराष्ट्रीयन मंडळे ज्यांनी अटकेच्या खूप पुढे आपल्या संस्कृतीचे पातके फडकावले आहेत.
१. बृहण महाराष्ट्र मंडळ :
- बृहण महाराष्ट्र मंडळ ही नॉर्थ अमेरिका मधील एक मुख्य संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत बाकी मराठी मंडळे येतात. थोडक्यात अनेक मराठी संस्थांची मिळून बनलेली ही एक संस्था आहे या अंतर्गत मराठी भाषेसाठी आणि मराठी संस्कृतीसाठी अनेक उत्तम उपक्रम राबवले जातात.
- मराठी भाषेच्या अनेक लेखकांना येथे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाते. मराठा तितुका मेळवावा असे याचे ब्रीदवाक्य आहे.
- ४० वर्षांपेक्षा जुने ही मंडळ परदेशात आपली मातृभाषा टिकवण्यासाठी ग्रेसर आहे. अनेक मराठी कलाकारांना त्यांच्या नाटक कलाकृती सादर केन्यासाठी खास आमंत्रित केले जाते. गायकांची तर विशेष पर्वणीच येथे असते.
- दर २ वर्षांनी या संस्थेचे आणि त्या अंतर्गत असणाऱ्या इतर मंडळाचे नॉर्थ अमेरिकेतल्या विविध शहरांध्ये ४ दिवसीय अधिवेशन बोलावले जाते. ज्यामध्ये सर्व मराठी भाषिक एकत्र येतात, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतात, अस्सल मराठी पदार्थांची यावेळी रेलचेल असते.
- महिलांचा या संस्थेत अग्रेसर आहेत. लॉस अँजलिस, बोस्टन, शिकागो अशा अनेक ठिकाणी यांच्या शाखा आहेत. या मंडळाची शाळा देखील आहे जिथे मुलांना फावल्या वेळात अनेक उपक्रमांमधून मराठी संस्कृतीबद्दल माहिती दिली जाते.
- लिहायला आणि वाचायला शिकवली जाते, मराठी खेळ गाणी यांबद्दल देखील सांगितले जाते. या मंडळाचे सर्व कार्यकर्ते एकमेकांना व्यवसायात मदत तर करतातच आणि घरगुती समारंभात देखील ते मागे नसतात.
२. महाराष्ट्र मंडळ शिकागो :
- १९६९ मध्ये महाराष्ट्रातून स्थलांतर केलेल्या मराठी लोकांनी आपल्या संस्कृतीच्या जपणुकीसाठी या मंडळाची स्थापना केली.
- नॉर्थ अमेरिकेत स्थापन झालेले ही पहिले मराठी मंडळ आहे. २०१९ मध्ये या मंडळाला ५० वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी वर्षातून एकदा ३ तासांचं एक मराठी नाटक सर्वांसाठी आयोजित करण्याची या मंडळाची परंपरा आहे.
- तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळाचे हे मंडळ संस्थापक देखील आहे. २०२० चा पहिलाच संक्रांत सण यांनी देखील मस्त साजरा केला, अस्सल मराठी तिळगुळ लाडू, मोहन थाळ आणि गूळपोळीवे यांनी यथेच्च ताव मारला आहे. तसेच संक्रांतीच्या कार्यक्रमाला त्यांनी खास अनिरुद्ध जोशी आणि शमिका भिडे यांच्या गायनाचा आनंद लुटला. मराठी शाळेतल्या.
- लहानग्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य करून कार्यक्रमाची रंगात वाढवली. परदेशात मराठी संस्कृती टिकवण्यात महाराष्ट्र मंडळ शिकागो चा खूप मोठा वाट आहे.
३. महाराष्ट्र मंडळ अटलांटा :
- या संस्थे अंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात ज्यातून आपली स्वतःची तसेच व्यापाराची देखील प्रगती होईल. या मंडळाच्या अधीकृत संकेत स्थळावर तुम्ही तुमच्या व्यवसायाशी निगडित जाहिरात टाकू शकता. मग तुमचा व्यवसाय अगदी घर खरेदी विक्री असो अथवा उकडीचे मोदक बनवण्याचा असो.
- तरुणांसाठी येथे जास्त उपक्रम आणि मिटींग्स घेतल्या जातात. हल्ली झालेल्या संक्रातीचा सण यांनी अगदी उत्साहात साजरा केला. मायबोली हे यांची खास वेबसाइट आहे ज्यावरती मराठी मध्ये असलेले अनेक विषयांचे अगदी सुंदर लेख असतात.
- आरोग्यविषयक माहिती, गुंतवणूक, ताज्या घडामोडी, पाककला अशा अनेक विषयांची माहिती येथे दिली जाते.
४. न्यू इंग्लंड मराठी मंडळ :
- नाव जरी इंग्लंड असला तरीही हे मंडळ नॉर्थ अमेरिकेतील न्यू इंग्लंड बोस्टन येथील आहे. या मंडळाच्या स्थापनेला आता ४१ वर्षे झाले आहेत आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाचे हे एक मोठे सदस्य आहेत.
- दरवर्षी सर्व मराठी सण सामूहिक रित्या अत्यंत उत्साहाने येथे साजरे केले जातात. अनेक मराठी नाट्य प्रेमींसाठी मराठी नाटके अत्यंत वाजवी दारात इथे उपलब्ध करून दिले जात आहेत ज्यामुळे मराठी संस्कृती बद्दलची आपुलकी सर्वाना जपता येते.
- अनुबंध हा त्यांचा वार्षिक अंक आहे, यामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या कविता, लेख, लघु कथा सर्वच या मंडळाच्या सदस्यांकडून मागवल्या जातात. यामध्ये वयाची अशी काहीही अट नाही अगदी लहानग्यांपासून ते थोरांपर्यंत सर्वच आपला साहित्य प्रसीद्ध करू शकतात.
५. बाल्टिमोर मराठी मंडळ :
- एका ऑर्कुट ग्रुप च्या मदतीने १ फेब्रुवारी २००९ साली या मंडळाची स्थापना झाली. या मंडळाने ११ वर्षे आता पूर्ण केलेली आहेत. आपल्या जवळपास राहणाऱ्या सर्व मराठी कुटुंबांनी एकत्र यावे, संस्कृतीचे विचारांचे आदानप्रदान करावे, मैत्री वाढावी या दृष्टीने या मंडळाची स्थापना करण्यात अली.
- मुलांमध्ये लहानपनीच मराठी संस्कृतीचे बीज रुजावे आपल्या संस्कृतीची ओढ निर्माण होणे हा मंडळाचा मुख्य हेतू होता.
- या मंडळातर्फे देखील अनेक नाटकांचे आयोजन केले जाते. सेवाभावी, पर्यावर्णिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात नागरिकांना एकत्र आणण्याचे यांचे ध्येय आहे.
- महाराष्ट्रीयन संस्कृती शिकण्यास, जपण्यास आणि टिकवण्यात इच्छूक असणाऱ्या सर्वांचे या मंडळात नेहमी स्वागत केले जाते. विविध संघटनांच्या माध्यमातून यांनी संस्कृती टिकवण्याचे काम केले आहे आणि करत आहेत.
६. बफेलो मराठी मित्र परिवार :
- लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे म्हणत महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकाला अगदी अभिमानाने नायगारा धबधबा दाखवणारे हे बफेलो मराठी मित्र मंडळ.
- अगदी साधे बोरन्हाण देखील मोठ्या उत्साहात साजरा करणाऱ्या मंडळाबद्दल काय सांगावे ? आजपर्यंत अनेक दिग्गजांचा स्नेह या मंडळाला लाभला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर असोत आयुष्यावर काही बोलणारे सलील संदीप असोत, नाहीतर आरती अंकलीकर- टिकेकर असोत वा शिरीष कणेकर.
- सर्वांचाच अगदी आनंदाने स्वागत या मंडळाने केलेला आहे. या मंडळाद्वारे एक डिजिटल दिवाळी अंक देखील सादर केला जातो. ज्यामध्ये काही संपादकीय मजकूर असतो, मंडळाची आतापर्यँतची आणि पुढील वाटचाल असते, दिग्गजांचे लेख तर मंडळाच्या काही हौशी लेखकांचे लेख असतात.
- महाराष्ट्रातील दुर्ग किल्ले, महाराष्ट्राची संत परंपरा असे अनेक लेख यात असतात.
७. कॅलगरी मराठी असोसिएशन :
- मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी स्थापन झालेले हे अजून एक मंडळ आहे. कॅलगरी आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या मराठी कुटुंबाना एकत्रित आणण्यासाठी या मंडळाची स्थापना झाली आहे. हे मंडळ २६ वर्षांपेक्षा अधिक जुने आहे.
- मराठी कुटुंबांच्या गरज समजून यांनी विविध वयोगटातील लोकांसाठी विविध उपक्रम सुरु केले. पालवी हा युथ डेव्हलोपमेंट प्रोग्राम सुरु केला. जेथे तरुण एकमेकाना भेटू शकतील त्यांच्या इडिअस आणि इंनोवाशन्स एकमेकांसमोर मांडू शकतील.
- नवीन प्रेरणा देण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून केले गेले आहे. दूरपर्यंत टिकणारी मैत्री निर्माण करणे हा या प्रोग्राम चा उद्देश आहे. तसेच आयुष्याची ६० वर्षे पूर्ण केलेल्यांसाठी यांनी समाधान हा प्रोग्राम सुरु केला आहे. यामध्ये जेष्ठांच्या गरज जाणून त्यावर उपाय केले जातात.
- तसेच यांची पिकनिक अरेंज करणे, गाण्याच्या मैफिली घेणे, मेडिकल कॅम्प घेणे असा आहे. याचे २५० पेक्षा जास्त सदस्य आहेत. तसेच या संस्थेची मराठी शाळा देखील आहे ज्याचा मुख्य उद्देश मराठी मुलांना किमान मराठी लिहता वाचता यावा असा आहे. या शाळेची स्थापना २००३ मध्ये करण्यात अली.
८. महाराष्ट्र मंडळ डेट्रॉईट :
- आपले मंडळ म्हणत सगळ्या मराठी कुटुंबाला हे मंडळ आपलेसे करत आहे. १९७७ मध्ये अतिशय थोड्या सभासदांसोबत या मंडळाची डेट्रॉईट येथे स्थापना झाली होती आता या मंडळांनी विशेष प्रगती केलेली आहे आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाचा हा एक अभिमानी सदस्य आहे.
- लोकप्रिय कर्यक्रमातून व्यवसाय निर्मिती करणे आणि व्यवसायाला पाठिंबा देणे हे यांचे मुख्य काम आहे. तरुणांसाठी हे मंडळ विशेष कार्यरत आहे.
- डेट्रॉईट मध्ये होण्याऱ्या अनेक कार्यक्रमांना आता हे मंडळ स्पॉन्सर करत असते. आणि मराठी तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांचे प्रोमोशन करणे हे याचे मुख्य ध्येय आहे.
- स्नेहबंध हे यांचे मासिक आहे जे वर्षाच्या काही खास सणांना प्रकाशित केले जाते, जसे स्नेहबंध पाडवा एडिशन, स्नेहबंध दिवाळी एडिशन, स्नेहबंध गणपती एडिशन.
- ज्यामध्ये त्या सणाची माहित किंवा मंडळाच्या सदस्यांनी पाठवलेले काही खास किस्से प्रसिद्ध केले जातात. या मंडळाद्वारे माझी शाळा चालवली जाते आणि मुलांना मराठी लिहायला वाचायला शिकवले जाते.
९. ईस्ट बे मराठी मंडळ कॅलिफोर्निया :
- मराठी संस्कृती प्रदेशात देखील टिकावी या सामूहिक हेतूने हे मंडळ २००६ मध्ये स्थापन करण्यात आले. रेशीमगाठी हा यांचा जेष्ठ नागरिकांसाठी ग्रुप आहे.
- ज्यामध्ये करमणुकीचे कर्यक्रम घेतले जात, जेष्ठांसाठी इंग्लिश स्पीकिंग, ड्रायविंग शिकवले जाते. आरोग्य विषयक व्याख्याने आयोजित केली जातात. फ्रॉड टाळण्यासाठी काही सूचना दिल्या जातात.
- तसेच महिलांसाठी हळदीकुंकू आणि वाणाचे कार्यक्रम आयोजित होतात. अगदी मंगळागौरी सुद्धा असतात. तसेच पतंगोत्सव देखील साजरा होतो. माझी शाळा हा उपक्रम या मंडळात देखील चालवला जातो.
- निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी येथे हाइकिंगचा उपक्रमी राबवला जातो. मंडळाच्या सभासदांसाठी हार्ट टू हार्ट असे संवत विना मुले आयोजित केले जात आहेत.
१०. ह्यूस्टन महाराष्ट मंडळ :
- १९७६ साली ह्यूस्टन, टेक्सास येथे राहणाऱ्या काही मराठी कुटुंबांनी या मंडळाची स्थापना केली. १९९५ मध्ये झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचे यांनी नेतृत्व केले होते तेव्हा २७०० लोक उपस्थित होते.
- ह्यूस्टन येथे राहणाऱ्या मूळ लोकांपर्यंत मराठी संस्कृती पोहचवण्याचे मुख्य काम हे संस्था करते. महाराष्ट्रीयन संस्कृती, खाद्यपदार्थ, साहित्य सर्वाना कळावे यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
- तसेच गुडी पाडवा, संक्रांत हे मराठी सण अति उत्साहात साजरे होतात. जनता राजा या नाटकाचे प्रयोग आयोजित केले होते. तसेच घर बांधताना वस्तू शात्राची मदत किंवा आहे त्या घरातले प्रॉब्लेम दूर करण्यासाठी लागणारे उपाय यावर या म्हांडालाच वास्तु नामक उपक्रम आहे.
- तसेच काही खास उत्सवांसाठी ढोल ताशा पथक देखील आहे. जे हळू हळू वाढत आहे.
११. महाराष्ट्र मंडळ लॉस अँजलिस :
- आमची बोली आमचा बाणा … जय महाराष्ट्र असा म्हणत आता या मंडळाचे ३० वर्षे पूर्ण केली आहेत. लॉस अँजलिस भागात मराठी संस्कृती टिकवण्याचे मोठे काम यांनी केले आहे.
- यासाठी अनेक उपक्रम येथे आयोजित केले जातात. मंडळातर्फे येथे एक मराठी पुस्तक आणि कॅसेट यांची लायब्ररी चालवली जाते.
- तसेच संस्कृती वाढवण्यासाठी आणि भाषेची गोडी वाढवण्यासाठी यांनी एक पॉडकास्ट सुरु केले आहे. यामध्ये मंडळाच्या सदस्यांनी लिहिलेले लेख, कविता, गाणी प्रदर्शित केली जातात.
- माझी शाळा या प्रकल्पात या मंडळाचा सक्रिय सहभाग आहे. अनेक मुलामध्ये मराठीची गोडी निर्माण करण्याचे यांचे यशस्वी प्रयत्न आहेत.
१२. महाराष्ट्र मंडळ कॅन्सस सिटी :
- मराठी भाषेच्या प्रेमाखातर सुरु झालेले हे आणखी एक मंडळ आहे. १९९५ मध्ये याची स्थापना झाली आहे. संस्कृती टिकवण्यासाठी अनेक स्तुत्य उपक्रम या मंडळातर्फे आयोजित केले जातात.
- या मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कोणतीही निवडणूक घेतली जात नाही हे विशेष. सर्व सदस्य मिळून कोणताही निर्णय घेतात. सदस्य असो वा स्वयंसेवक सर्व सामान मेहनत करतात आणि कार्यक्रम आयोजित करून अतिशय छान प्रकारे पार पडतात.
- या मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात देखील करू शकता. प्रायोजक तत्वावर चालणारे हे मंडळ आहे. तसेच हौशी सदस्यांचे लेख आता त्यांच्या संकेतस्थळावर प्रदर्शित होत आहेत आणि वाचकांसाठी विविध विषयांच्या वाचनाची हे पर्वणीच टर्की आहे.
१३. मराठी विश्व न्यू जर्सी :
- १९७८ मध्ये ६ मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली. मराठी कला, साहित्य आणि भाषा टिकवण्यासाठी आणि तिचा प्रसार करण्यासाठी या मंडळाची स्थापना झाली.
- आता या मंडल मध्ये ६५० कुटूंब आहेत. यांच्या अंतर्गत अनेक उपक्रम घेतले जातात आणि सर्व सण एकत्रित रित्या उत्साहात साजरे होतात. यांच्या संकेतस्थळ द्वारे यांच्या सदस्यांच्या व्यवसायाचे जाहिरातीद्वारे प्रोमोशन केले जाते. मायबोली या संकेतस्थळाचे हे मंडळ अदस्य आहेत.
- ज्यावरती अनेक प्रकारचे लेख आणि चर्चा होत असते. तसेच व्याख्यान माला, वादविवाद आणि लेखन स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.
१४. ओरलँडो मराठी मंडळ :
- मराठी कलाकारांना प्रोत्साहित करणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि व्यवसाय वाढीला मदत करणे हे या मंडळाचा मुख्य उद्देश आहे.
- महिलांचा यातील सहभाग उल्लेखनीय आहे. वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या द्वारे घेतले जातात. जसे नाटक, संगीत रजनी इत्यादी.
- लहानमुलांसाठी चित्रकला सपर्धा, रंगकाम, बालनाट्य यांचे आयोजन केले जाते. काही छोट्या पिकनिक देखील मोट्या उत्साहाने आयोजित होत असतात.
- सर्वत महत्वाचे म्हणजे या मंडळाच्या कार्यकारिणीवरती सर्व महिलाच आहे. सर्व प्रोग्रॅम सण येथे अगदी एकत्रितपणे साजरे होतात.
१५. फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळ :
- मराठी अस्मिता आणि परंपरा जपण्याच्या दृष्टीने या मंडळाची स्थापना करण्यात अली आहे. यासाठी अनेक उपक्रम आणि कार्यक्रम ते वर्षभर घेत असतात.
- मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या लोकांचे हे मंडळ आहे म्हणूनच ते म्हणत असतात माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन.
- अनेक प्रसिद्ध नाटकांचे प्रयोग येथे होत असतात. तसेच छोट्या मोठ्या ट्रिप्स पण नेहमी आयोजित केल्या जातात. मराठी संस्कृती जपणे, टिकवणे, तसेच मराठी लोकांच्या व्यवसायात मदत करणे हे यांचे उद्देश आहे.
- मराठी कुटुंबाना एकत्र आणून सण वर हौशेने साजरे करणे, दिवाळी दसऱ्याला मैफिली रंगवणे हे यांचे आवडीचे काम आहे.
१६. महाराष्ट्र मंडळ बे एरिया:
- बे एरिया मध्ये स्परतन हे एकमेव ढोलपथक असणारे हे मंडळ आहे. गणेश उत्सवात उत्साह वाढवण्याचे काम हे पथक करत असते. तरुणांना ढोल ताशा शिकवणे, लेझीम शिकवणे असे काम स्वयंसेवकांकडून केले जाते.
- तसेच जेष्ठांसाठी देखील विविध उपक्रम राबवले जातात. स्नेहबंध सारख्या उपक्रमांमधून काव्य वाचन घेतले जाते, वाढदिवस साजरे केले जातात.
- मराठी शाळा या उपक्रमाद्वारे मराठी मुलांमध्ये लहानपणापासूनच संस्कृती चे बीज रोवायचे काम हे करतात. एक उनाड दिवस म्हणत मित्रांच्या सहवासात निसर्गाच्या सानिध्यात सहली देखील आयोजित केल्या जातात.
- कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांच्यावर आधारित एक खास कार्यक्रमाचे आयोजन अशातच केले गेले होते. व्यवसाय वाढीसाठी अनेक उद्योजकांना आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी यांची वेबसाइट नेहमी सर्वांसाठी खुली असते.
१७. सॅन दिएगो महाराष्ट्र मंडळ :
- मराठी सण उत्सव आनंदाने आणि एकत्रितपणे साजरे करता यावेत, मराठी भाषिकांमध्ये मैत्री वाढावी या हेतूने या मंडळाची स्थापना झाली आहे.
- सर्व सण अगदी आनंदाने येथे साजरे होतात. प्रत्येक सणाच्या तयारीची माहिती यांच्या संकेत स्थळावरून दिली जाते. गुडी पाडवा , संक्रांत, गणेश चतुर्थी अति उत्साहाने येथे साजरी होते.
- मराठी आमुची मातृभाषा असा म्हणत यांनी देखील माझी शाळा या उपक्रमात सहभाग घेतला आहे. अगदी शिशु वर्गापासून ते पाचवीच्या मुलांपर्यंत सर्वानाच मराठीची गोडी लावायचे काम हे शाळा करत आहे.
- या मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे फोटो यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
१८. सिएटल महाराष्ट्र मंडळ :
- महाराष्ट्रातून स्थलांतर करणार्यांना आपल्या लोकांची कमी जाणवू नये म्हणून या मंडळांची खरे तर स्थापना होत असते. विविध कार्यक्रमातून हे आपली संस्कृती परदेशातही जपत आहेत.
- सारथी हा या मंडळाचं सारथी म्हणजेच विशेष दिवाणी अंक आहे. अर्थात डिजिटल दिवाळी अंक म्हणता येईल. नवरात्रीचे, दिवाळीचे यांचे आयोजन बघण्यासारखे असते.
- १९९५ मध्ये यांनी युवा मंडळाची स्थापना केली, या युवा मंडल मध्ये ९ वि पासून ते १२ वि पर्यंतच्या तरुणांची एक कमेटी बनवली जाते, हे कमेटीच आपला अध्यक्ष निवडते.
- मोठ्यांच्या सिएटल महाराष्ट्र मंडळामध्ये वर्षभर होणाऱ्या अनेक कार्यक्रमांध्ये हे छोट्यांचे मंडळ अतिशय उत्साहाने भाग घेते आणि मोठ्या मोठ्या जवाबदाऱ्या पार पडत असते.
- मुलांमध्ये स्वयंशिस्त यावी, व्यवस्थापनाचे आणि पैशाचे व्यवस्थापन यावे यासाठी या युवा मंडळाची स्थापना केली गेली आहे.
१९. मराठी कला मंडळ, वॉशिंग्टन डी सी :
- मराठी कला, संस्कृत सभ्यता जपणे हा या मंडळाचा ध्यास आहे. १९७५ साली स्थापन झालेल्या या मंडळाचे कार्य आजपर्यंत उचलू आहे.
- ५०० पेक्षा जास्त अधिकृत सदस्य असणाऱ्या या मंडळाचे सदस्य होण्यासाठी कोणत्याही देशाचा नागरिक असण्याची किंवा जात पात धर्म याची बंधन नाही.
- येथे अनेक मराठी कार्यक्रम होत असतात, अनेक कलाकारांच्या मैफिली आणि जुगलबंदी रंगात असतात. वॉशिंग्टन डी सी आणि परिसरात मराठीचे जतन करण्याचे काम या मंडळाने केले आहे.
२०. मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो :
- लास्ट बट नॉट द लीस्ट असे हे मंडळ १९६८ मध्ये कॅनडा मधील टोरोंटो येथे स्थापन झाले. मराठी भाषेची ओढ मनात ठेऊन त्यासाठी काहीतरी करण्याच्या हेतूने या मंडळाची स्थापना झाली आहे.
- उत्तर अमेरिकेमधील सर्वात जुने मंडळ असे याला म्हणता येतील. आजपर्यंत यांनी अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत ज्यातून मराठी भाषेला अधिक प्रोत्सहन मिळालेला आहे.
- तरुणांना मराठी बद्दल जागरूक करणे हा यांचा महत्वाचा हेतू आहे. स्नेहबंध हे यांचे वार्षिक अंक आहे. यामधून ते मंडळाचे सदस्य असलेले आणि उत्स्फूर्त लेखक कवी असलेल्या मराठी लोकांना प्रोत्साहन देतात आणि त्यांचे साहित्य यामध्ये प्रसिद्ध करतात.
माणूस कुठे हे गेला तरीही तो त्याच्या माणसांशिवाय आणि कितीही मोठा झाला तर कौतुकाच्या शाब्बासकीशिवाय अपूर्ण आहे. या मंडळांची महती वाचून वाटते कित्ती लोक आहेत ज्यांचे आपल्या भाषेवर प्रेम आहे, आपली मराठी संस्कृती बद्दल आपुलकी आहे आणि ती जपावी टिकून ठेवावी यासाठी ते आपल्या मायदेशापासून दूर राहूनसुद्धा काम करत आहे. तरुणांना किमान मराठी वाचता बोलता यावे यासाठी देखील ते अनेक प्रयन्त करत आहेत. अनेक दिवाळी अंक, पॉडकास्ट, लायब्ररी असे सर्व जुने नवे मार्ग ते वापरात आहेत. हे सर्व मंडळे ना नफा तत्वावर चालतात, यातून कोणतेही उत्पन्न अपेक्षित नाहीये. आपली कामे सांभाळून स्वयंसेवक हे काम करतात. म्हणतात ना मातीपासून दूर राहून माणूस आपल्या मातीच्या आपल्या माणसांच्या अजून जवळ येत असतो ते खरेच….
सलाम आहे या सर्व मंडळांना ज्यांनी परदेशात असून सुद्धा आपल्या मातीशी नाळ तुटू दिलेली नाही.