Skip to content
Home » Articles » Top 5 Marathi Books Novels | Best Marathi Books to Read | टॉप 5 पुस्तके

Top 5 Marathi Books Novels | Best Marathi Books to Read | टॉप 5 पुस्तके

marathi books must read

Top 5 Marathi Books Must Read

टॉप 5 मराठी पुस्तके

१. छावा, मृत्युंजय :
लेखक – शिवाजी सावंत :

  • खरं तर दोन्ही पैकी कोणती आधी असावी याचा क्रमच लावू शकत.दोन्ही ही कादंबरी ऐतिहासिक प्रकारात मोडतात दोन्ही मधील पात्र कथानक त्यांचा काळ ह्या गोष्टी वेगळ्या असल्या तरी सारांश जवळपास एकच आहे.
  • दोन्ही कथेत समान असलेली गोष्ट म्हणजे विश्वास,मैत्री,प्रेम आणि स्वाभिमान. संभाजी महाराज आणि कर्ण हे कसे स्वाभिमानी, आणि आपली मैत्री कश्याप्रकारे जपणारे होते याचे पुरेपूर आणि उत्तम सादरीकरण लेखक ‘ श्री. शिवाजी सावंत ‘ यांनी केले आहे.
  • छावा ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर तर मृत्युंजय ही कुंतीपुत्र क्षत्रिय कर्ण यांच्या जीवनावर आहे.
  • दोन्हींवर ही समाजात काही समाज कंठकानी चुकीची माहिती पसरवली होती.त्यांचं खरं जीवन लेखकाने ह्या कादंबरीच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहचवले.
  • हा एक थरारक प्रवास आहे : इतिहास आणि गूढतेतून! पुस्तकाचा सर्वात मोहक पैलू म्हणजे त्याची संवेदनशीलता आणि ती जवळची वाटणारी कथा.
  • ह्या दोन्ही कादंबरीचे वैशिष्ठ म्हणजे ते सुरुवातीच्या ओळीपासूनच आपल्याला पुस्तकावर चिकटवून ठेवते.
  • ह्या कादंबरीचे पैलू म्हणजे कर्नाचे आणि संभाजी महाराजांचे अंतर्गत विचार सांगण्यासाठी त्यांनी वापरलेल्या तुलना आणि उपमा.
  • ते इतके हृदयस्पर्शी आहेत, की तुम्हाला प्रत्येक वाक्यातून शहारे आल्यासारखे वाटेल आणि तुमच्या डोळ्यासमोर याचे चित्रण उभा राहील.
  • दोन्ही ही कादंबरी  वर मालिका बनल्या असून त्यांच्या वरील नाटके ही खूप गाजली. मराठीला प्रथमच लाभलेला ‘ १२ वा मुर्तिदेवी पुरस्कार ‘ ही लेखकाला ह्याच कादंबरी मुळे मिळाला.
  • प्रत्येकाने वाचावी अश्या ह्या दोन कादंबऱ्या आहेत. कथेला चांगलच अस वजन लेखकाने त्यांच्या शब्दातून दिलेले आहे. मराठी साहित्यातील हे सर्वोत्तम अस साहित्य आहे.

२. व्यक्ती आणि वल्ली :
लेखक – पु. ल. देशपांडे :

  • निरक्षण आणि फक्त चपखल निरक्षण हे तर जीवनात खूप महत्त्वाचं आहे. लेखकाच हे पुस्तक म्हणजे त्यांच्या भोवतालील व्यक्ती आणि लेखकाने  केलेलं त्यांचं निरीक्षण आहे.
  • अतिशय उत्तम पुस्तक.सर्व वयोगटातील व्यक्तीला चटकन आवडेल असं आकर्षित करणार लेखन. ह्या पुस्तकातून शिकण्यासारखं ही खूप काही आहे – ते म्हणजे एखाद्याच निरक्षण कस करायच त्यातून काय शिकायचं आणि काय सोडायचं.
  • वेगवेगळ्या व्यक्तीचं असलेला समावेश त्यामुळे पुस्तकाला अस एक अंग नसून पुस्तकात त्या व्यक्तींचे लेखक ‘ पू. ल. देशपांडे ‘ यांनी विविध रंग भरले आहेत.
  • प्रत्येक पात्रचं केलेलं वर्णन खूपच अद्वितीनिय  आहे आणि अतिशय मनोरंजक पद्धतीने वर्णन केले आहे. काही आपल्याला हसवतात, काहीं आश्चर्यचकित करतात, काही आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवतात तर काही आपल्या डोळ्यात पाणी आणतात.
  • ह्या सर्व व्यक्तीचं केलेल्या वर्णानाचे वाचन करताना आपल्यातील त्या प्रकारचे व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात, त्यामुळे हे एकदम जवळचे वाटते.
  • ‘ पू. ल. ‘ ह्यांच्या ह्या पुस्तकावरील नाटक गाजली आणि त्यांनी त्यांच्या ह्या पुस्तकातून मराठी साहित्याला अजरामर पात्र दिली.
  • हे पुस्तक आपल्याला एक चांगला मनुष्य बनवायला शिकवते. नक्कीच प्रत्येकाने जीवनात हे एकदा तरी वाचावे आणि आदर्श बनण्याचा प्रयत्न करावा.

३. शाळा :
लेखक – मिलिंद बोकील :

‘‘पहिल्या प्रेमाची आठवण असते शाळा,
तिची ओढ लावते ती असते शाळा
आणि मनात बसते तीही शाळाच.’’

  • एकदा मोठे झालो की आपल्याला लहानपण हवंहवंसं वाटू लागत आणि त्यात जास्त आठवू लागतात ते म्हणजे शाळेतील दिवस.लेखकाने ह्या कथेत तेच शाळेतील दिवसांना उजाळा दिला आहे.
  • शाळा म्हणजे फक्त चार भिंत आणि त्यामधील विद्यार्थी आणि शिक्षक  त्यांनी सांगितलेला आभ्यास नसून जी गम्मत आहे त्याच गमतीच लेखकांनी चित्र योग्य पद्धतीने रेखटल आहे.
  • शाळेत वर्ग असतात, बाक असतात, शिक्षक असतात, विद्यार्थी असतात पण ती शाळा नसते पण त्याच शाळेत बसून आपल्या मनात एक वेगळीच शाळा चालू असते आणि त्याच शाळेतील शिक्षण खूप सुंदर असते.
  • कथा आहे चौदा वर्षाच्या नववीत शिकणाऱ्या मुलाची,त्याच्या जीवनाची,त्याच्या कायम सोबत असणाऱ्या मित्रांची आणि जपल्या जाणाऱ्या मैत्रीची, त्याच्या त्या वयाची आणि त्या वयात खेळल्या जाणाऱ्या त्याच्या विचार आणि भावनांची.
  • ह्या पुस्तकावर मराठी चित्रपट आला असून तो चित्रपट गृहातही चांगलाच चालला. पुस्तक संपतं पण जोशा, सुऱ्या, चित्र्या, शिरोडकर, ’चिमण्या,’ फावड्या, भाईशेट्टे आपल्या मनात घर करून राहतात.. कायमचे!! 
  • शाळेत  गेलेल्या सर्वांसाठी हे पुस्तक आहे. जर शाळेचे जीवन पुन्हा जिवंत करायचे असेल तर लवकर हे पुस्तक हातात घ्या आणि पूर्ण करा.

४. श्यामची आई :
लेखक – साने गुरुजी :

  • शाळेत परीक्षेत माझे आवडते पुस्तक निबंध आला की आपण सर्वच जण श्यामची आई विषयी लिहायचो.
  • आपल्याला लिहायला वाचायला जेव्हा येऊ लागते तेव्हा आपल्याला माहीत असलेलं पाहिलं पुस्तक म्हणजे श्यामची आई .
  • श्यामची आई हे मराठी साहित्यातील सर्वोत्तम आणि प्रसिद्ध अस पुस्तक आहे.
  • आई म्हणजे माणसाचं पाहिलं प्रेम, निसर्गसृष्टी ला पडलेलं सुंदर स्वप्न तसच एक स्वप्न साहित्यसृष्टी ला पडल ते म्हणजे श्यामची आई. देवाला सगळीकडे पोहचता येऊ शकत नाही म्हणून त्यांनी आईला पाठवलं.
  • आईच्या प्रेमाच कधीच कशाची तुलना करू शकत नाही त्याच आईच वर्णन करणार जगप्रसिद्ध पुस्तक म्हणजे श्यामची आई.
  • पुस्तकाचं नाव ‘ श्यामची आई ‘ असली तरी पुस्तकाची नायिका ही आईच आहे. साधी सरळ सोपी भाषा हे कथेची आश्चर्यचकित करणारी गोष्ट कारण इतकी साधी सोपी भाषा असूनही शेवट पर्यंत आपल्याला कथेशी जुळवत ठेवते.
  • श्यामची आई मध्ये आपल्याला आपली आई दिसू लागते आणि श्यामची आईने दिलेले उपदेश जणू आपली आईच देत आहे याचा भास होऊ लागतो.
  • ह्या पुस्तकाची भुरळ सिनेसृष्टीला ही पडली आणि ‘ श्यामची आई ‘ चित्रपटगृहात अवतरला. ह्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला ही पहिलीच वेळ होती.
  • श्यामची आई म्हणजे मराठी साहित्यातील एक दागिना आहे जो प्रत्येक मराठी माणूस आपल्या घरात ठेवतो, त्यामुळे क्वचितच तुम्ही ह्या पुस्तकाबद्दल ऐकल नसेल, आणि जर नसेल वाचलं तर संधी गेलीली नाही. जा आणि वाचून काढा.

५. कोसला :
लेखक – भालचंद्र नेमाडे :

  • निराशता, अस्वस्थता जीवनात अनेक प्रकारचे बदल घडवून आणतात मग त्यातले काही चांगले असतात तर काही वाईट.
  • प्रत्येकजण कधीतरी ह्या गोष्टींचा सामना करतोच, काही बोलून दाखवतात व काहींना ह्यावर गप बसनच आवडते ह्याच गोष्टीवर हे पुस्तक भाष्य करते.
  • आपल्या साहित्यातून जनमानस ढवळून काढणारे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मश्री भालचंद्र नेमाडे यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी ही कादंबरी अवघ्या ४०-४१ दिवसात पूर्ण केली.
  • कथेचा नायक खेड्यातून पुण्यात शिकायला आलेला पांडुरंग सांगवीकर हा मुलगा आहे. महाविद्यालयीन काळ म्हणजे मग वसतिगृह आलच आणि त्यातील गमती जमती, निरीक्षण, अंगाशी आलेलं प्रकरण, यश – अपयश आणि त्यातून नायकाची झालेली अस्वस्थता ह्यावर हे पुस्तक पुढे चालते.
  • कोसला प्रत्येक मध्यमवर्गीय घराचं आणि कथेचा नायक प्रत्येक मध्यमवर्गीय तरुणाच नेतृत्व करतो.
  • लेखकाने केलेल्या प्रसंगाचे वर्णन आपल्या जीवनात घडलेल्या प्रसंगाशी साम्य दाखवू शकेल त्यामुळे कथेतील नायक दुसरा तिसरा कोणी नसून आपणच आहोत की काय याचा भास आपल्याला होत राहील.
  • पुस्तकातील मधला भाग डायरी पद्धतीने लिहिला गेला आहे त्यामुळे कथेची रुची वाढते.कथेत ‘ उदाहरणार्थ ‘ शब्दाद्वारे थेट कथेशी जोडून ठेवायचे काम लेखकाने केले आहे.
  • बोलकी भाषा, आत्मचरित्रात्मक मांडणी आणि समस्येवर काढलेल्या वाटा हे पुस्तकाचे वैशिष्ठ आहे.
  • अपयश, अस्वस्थता ह्यावर मार्ग काढायला हे पुस्तक उपयोगी ठरते आणि आपल्यात एक नवी ऊर्जा निर्माण करते. मराठीतील हे आगळवेगळ साहित्य अनुभवण्यासाठी तुम्ही एकदा तरी ‘कोसला’ वाचायलाच हवं.

Top 5 Marathi Books Must Read | Top Novels of Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *