Dr. Jagannath Dixit Information in Marathi Language

Personal life :

 • नाव – डॉ. जगन्नाथ दिक्षित
 • जन्म दिनांक – २५ जानेवारी १९६५
 • गाव – आकोला
 • शिक्षण – M.B.B.S. , P.G.D.H.A , P.G.D.H.R.M
 • व्यवसाय/नोकरी – प्राध्यापक
 • पत्नी – डॉ. अंजली दिक्षित
 • मुले – ऋत्विक दिक्षित, श्रिया दिक्षित

डॉ जगन्नाथ दीक्षितची – माहिती

 • डॉ जगन्नाथ दिक्षित यांचा जन्म २५ जानेवारी १९६५ रोजी आकोल्या तालुक्यातील गरीब आणि संस्कारी घरात झाला.
 • त्यांना ५ भाऊ आहेत. डॉ दिक्षित हे लहानपणाासूनच हुशार होते. १९७९ सालच्या  दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून त्यांनी मिरिटमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता.
 • त्यांच्या पत्नी ही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
 • मुलगा ऋत्विक याने एन.आय. टी. सुरत मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतले आहे आणि तो एक उत्तम प्रकारचा लेखक सुद्धा आहे.
 • मुलगी श्रिया ही उत्तम प्रकारची कथ्थक डान्सर आहे.

कामाचा इतिहास

 • डॉ. दिक्षित हे महाराष्ट्र सरकारी मेडिकल कॉलेज लातूर येते कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक आहेत. २०१८ साली चालू झालेला ‘ महाराष्ट्र लठ्ठपणा हटवा ‘ ह्या संकल्प योजनेचे ते ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होते.
 • WHO आणि UNISEF ह्या सारख्या मोठ्या संस्थेच्या सल्लागार म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे.त्यांनी मधुमेह आणि लठ्ठपणा हटवण्यासाठी ADORE ह्या असोशिअन ची स्थापना केली , त्या असोशीअन चे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात.
 • डॉ दिक्षित हे अनुभवी प्राध्यापक आहे, त्यांच्याकडे २४ वर्षापेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव आहे.त्यांच्या नेत्रदीपक कामगिरी बद्दल त्यांना ३ राष्ट्रीय व ५ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 • २०१५-१६  सालचा महाराष्ट्र विश्व विद्यालय स्वास्थ विज्ञान द्वारा देण्यात आलेला सर्वश्रेष्ठ शिक्षक हा पुरस्कार ही मिळाला आहे. त्यांनी ‘principle and practice of biostatistics’ पुस्तक लिहिले आहे त्याच बरोबर त्यांनी ४० पेक्षा जास्त शोध लेखही लिहिले आहेत.
 • लठ्ठपणा आणि मधुमेह दूर करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत.

आहार योजनेसाठी प्रसिद्ध

 • डॉ दिक्षित हे दिवसातून ‘दोन वेळा जेवण करा आणि लठ्ठपणा दूर करा’ ह्या त्यांच्या डाएट प्लॅन साठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा हा डाएट प्लॅन जगप्रसिद्ध आहे.

संकल्पना कुठून आली

 • डॉ दिक्षित यांचे वजन वाढले होते. त्यांनी प्रत्येक प्रकारचे डाएट करून पाहिले पण तरी काही फरक पडत नव्हता,मग त्यांनी एक दिवस डॉ. श्रीकांत जिचकर यांचा कार्बो इंजिीअरिंग थेअरिवर आधारित वेट लॉस डाएट प्लॅन चा व्हिडिओ पहिला आणि त्यांना आश्चर्य वाटल की यात कोणत्याच प्रकारची जास्त मेहनत घ्यावी लागत नाही, त्यांनी तो डाएट प्लॅन अंबलात आणला.
 • त्यांनी तीन महिन्यातच ८ किलो वजन आणि २ इंच पोटाचा ठेरा कमी केला. आणि त्यांना वाटू लागले की सर्व सामान्यांनाही ह्या विषयी माहिती असावी त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीचा सर्वत्र प्रसार केला.

काय आहे हा डाएट प्लॅन?

 •  कोणत्याही प्रकारची विशेष मेहनत न घेता सर्व सामान्य लोकांना परवडेल असा हा डाएट प्लॅन आहे.
 • आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या अतिरिक्त इन्सुलिन मुळे लठ्ठपणा येतो हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला शरीरात निर्माण होणारे अतिरिक्त इन्सुलिन च प्रमाण कमी करावे लागेल.
 • जेवणाच्या वेळा कमी करून आपण ते निर्माण होणारे अतिरिक्त इन्सुलिन च प्रमाण थांबवू शकतो. त्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहावर  मात करू शकतो.
 • म्हणजेच सोप्पे सांगायचे झाल्यास दिवसातून फक्त दोनच वेळा जेवण करायचे.
 • ह्या मध्ये आपण कोणतेही प्रकारचे पदार्थ खाऊ शकतो अगदी गोड आणि चिकन सुद्धा पण ह्या वेळा व्यतिरिक्त काहीच खायचे नाही.
 • डॉ दिक्षित म्हणतात ह्या वितिरिक्त तोंड उघडायचे ते फक्त बोलायला आणि पाणी प्यायलाच. अस जर केल्यास नक्कीच आपल्यातला लठ्ठपणा दूर होऊ शकतो.

डाएट प्लॅन चे वैशिष्ट्ये

 • वजन कमी करणे
 • चरबी कमी करणे
 • सर्वसामान्य लोकांना परवडेल असा प्लॅन
 • अनुसरण करण्यास सुलभ

Dr. Jagannath Dixit Bio in Marathi Language Wikipedia : Essay Biography