Skip to content
Home » Essay in Marathi Language » NASA Information in Marathi Essay | नासा, NASA Essay in Marathi

NASA Information in Marathi Essay | नासा, NASA Essay in Marathi

NASA Mahiti Marathi

NASA Essay in Marathi

नासा – अंतराळ युगाकडे यशस्वी वाटचाल

नासा (NASA) हे नाव ऐकले की अंतराळात भ्रमण करणारे अवकाशयान, अंतराळवीरांचे पोशाख, विश्वाचा गूढ अंध:कार आणि ज्या ग्रहांना आपण घाबरतो त्यांच्यावर पाय ठेऊ पाहणारे अंतराळवीर हे सर्व डोळ्यापुढून जाते.

अवकाशाचे कुतूहल :

वाढते प्रदूषण व जनसंख्या ह्यामुळे पृथ्वीवर वर्षात दिवसात राहणे मुश्कील होईल म्हणून सगळे देश आता सूर्यमालेतील इतर ग्रहांवर राहणे शक्य आहे का याचा शोध घेत आहेत असे म्हंटले जाते. पण नुसते सरकारच नाही तर सामान्य जनतेलाही तारे आणि ग्रहांबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. विश्वाचे प्रसारण आकुंचन म्हणजे काय, ‘बिग बँग थिअरी (big bang theory)’ म्हणजे काय, तसेच ‘ब्लॅक होल (black hole)’ म्हणजे काय याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. आपल्या ग्रहासारखा दुसरा ग्रह असेल का, त्यात आपल्या सारखी मनसे प्राणी असतील का वेगळे असतील, अशा अनुत्तरीत गूढ प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अंतराळात प्रवास केल्यावाचून गत्यंतर नाही हे माणसाला कळले. इंटरस्टिल्लार, स्टार ट्रेक, स्टार वार अशा सिनेमांनी आपले कुतुहूल आणखी चाळवले गेले आहे.

पाश्चात्य देश अवकाश संशोधनात आपल्यापेक्षा बरेच वर्षे पुढे आहेत. आणि त्यांनी लावलेले शोध हे थक्क करण्यासारखेच आहेत. अमेरिकेच्या स्पेस संशोधनाचे मुख्य दावेदार, नासा (NASA) ह्याबद्दल माहिती घेऊ.

नासाचा इतिहास :

नासा हि अमेरिका सरकारची अंतराळाशी संबंधित सायन्स आणि टेक्नोलॉजी ने शोध लावणारी संघटना आहे. ती सरकारी नसून त्याच्या अधिपत्त्याखाली स्वायत्त संस्था आहे. त्याला फंड अमेरिकन सरकार सिनेटच्या संमतीने पुरविते. या आधी अंतराळा ची माहिती घेणारी ‘नॅशनल अॅडव्हायझरी कमिटी फॉर एरोनोटीक्स (NACA)’ हि कामिटी होती. नंतर जेंव्हा १९५७ ला रशियाचे स्पुतनिक अंतराळात गेले म्हणून तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष प्रेसिडेंट आयसेनहोव्हर ह्यांनी ‘नॅशनल एरोनॅटीक्स अँड स्पेस अॅडमिनीस्ट्रेशन (NASA)’ हि US सरकारच्या अधिपत्याखाली २९/०७/१९५८ ला ही नवीन संस्था सुरु केली.

नासाचे मुख्य कार्यालय वॉशिंग्टनमध्ये आहे. नासा ला नाकाच्या (NACA) तीन प्रयोगशाळा मिळाल्या. लांगले एरोनॅटीक्स लॅब, अमेस एरोनॅटीकल लॅब आणि लेविस फ्लाईट प्रोपुल्जन लॅब. नासा ला अमेरिकेच्या लष्करी संस्था पण मिळाल्या, त्या म्हणजे- आर्मी बॅलीस्तिक मिसाईल एजन्सी आणि युनायटेड स्टेट नेव्हल रिसर्च लॅब.

नासा चे चिन्ह आयसेन्होव्हार ह्यांनी ठरविले. पृथ्वी भोवती उपग्रह फिरताना दिसतो. नासा चे घोषवाक्य आहे, “for benefit of all.” नासा चा झेंडा सील सारखाच आहे. नासाच्या तीन उपकंपन्या आहेत. त्या म्हणजे – जॉन्सन स्पेस सेंटर, नासा गोद्दार्द स्पेस फ्लाईट सेंटर, आणि नासा आर्म्स रिसर्च सेंटर. नासाचा मुख्य अधिकारी प्रेसिडेंट सिनेटच्या मंजुरी ने निवडतो. पहिला संचालक डॉक्टर ती. केथ ग्लेनन होता.

हेतू, उद्धेश्य व मुख्य प्रकल्प :

रशियाशी स्पर्धा करण्याच्या हेतूने आणि अंतराळातून युद्धाचा धोका होऊ नये म्हणून जॉन केनेडी यांनी १९६० मध्ये रॉकेट काप्सूल मधून एक आणि नंतर दोन माणसे पाठविण्याची योजना केली. त्यांचे हे धेय्य नंतर १९६९ ला चंद्रावर दोन माणसे उतरवून पूर्ण केले. आणि ‘स्पेस रेस’ मध्ये अमेरिका रशियाच्या एक पाउल पुढे गेली. जुलै १९६९ ला चंद्रावर अपोलो यानातून नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ आल्ड्रिन चंद्रावर उतरले, चालले आणि त्यांनी अमेरिकेचा झेंडा रोवला. त्यावेळी तिसरा अंतराळवीर मायकेल कोलिन्स चंद्राला यानातून फेर्या मारत होता. ते दोघे मग यानात आले आणि पृथ्वीवर सुखरूप उतरले.

त्यानंतर चंद्रावर १९६९ ते १९७२, बारा अंतराळवीर जाऊन आले. अमेरिकेने लो अर्थ ओर्बित (LEO) मधून रॉकेट पाठवून रशियाला मागे टाकले.

नंतर १९७५ मध्ये नासा ने आर्मी आणि नेव्ही च्या मदतीने सुपरसोनिक वेगाचे नॉर्थ अमेरिकन x १५ र्रोकेट तयार केले. त्याचा वेग ताशी ८०५ किमी. होता आणि ते ४५००० फुटावरून उडत होते. आर्मी आणि नेव्ही चे बारा पायलट निवडले आणि त्यांनी त्यातून फर्या मारल्या. ह्यामुळे अती वेगाचा मानवावर काय परिणाम होतो ते अभ्यासता आले तसेच ओर्बित मध्ये स्पेस स्टेशन उभारण्याच्या वेळी त्यांना हे डिझाईन उपयोगी पडले.

नंतर प्रोजेक्ट मर्क्युरी हा प्रोजेक्ट घेतला आणि त्यात फ्रीडम ७, फ्रेन्डशिप ७ आणि फेथ ७ ह्या यानांमधून अंतराळवीरांनी फेर्या मारल्या. ह्यापासून प्रेरणा घेऊन प्रोजेक्ट जेमिनी लौंच करण्यात आला. अंतराळात माणूस कसा हालचाल करू शकतो आणि त्याच्या शरीरावर काय परिणाम होतात हे पाहण्यासाठी १९६२ नंतर गस ग्रीसन आणि जॉन यंग यांनी अंतराळात चालणे, देवघेव करणे इत्यादी प्रात्याक्षिके केली. अधांतरी वजनविरहित अवस्थेत फोटो घेणे काही नमुने गोळा करणे इत्यादी कामे नऊ मोहिमा काढून केली. नंतर अंतराळातच काही प्रयोग करण्याचे ठरवून स्काय लॅब ची कल्पना पुढे आली. १९६५ ते १९७९ हि मोहीम राबविली गेली.

अवकाशात गेलेल्या रॉकेटसना काही अडचण आली किंवा काही संकट आले तर मदतीला तसेच जे नमुने गोळा केलेले असतात त्यांची परीक्षा करणे, संशोधनांत मदत करणे इत्यादी कामे केली जातात. मायक्रोग्राव्हीटी आणि सोलर सिस्टीम ची माहिती करून घेणे हि कामे केली जातात. स्काय लॅब मध्ये माणसे महिनोन महिने राहतात. खाली दिल्याप्रमाणे चार स्कायलॅब मध्ये माणसे राहिली.
स्कायलॅब २ : २८ दिवस
स्कायलॅब ३ : ६० दिवस
स्कायलॅब ४ : ८४ दिवस
स्कायलॅब १ सॅटर्न v (Saturn V) चे भाग वापरून बनविली कारण त्याचे उड्डाण थांबविण्यात आले होते. हि प्रयोगशाळा २३५ नौटीकल मैलावर कक्षेत विषुववृत्ताला ५० अंश कलती करून फिरत होती.

त्याबरोबरच नेहमी उड्डाण करता येईल आणि पुन्हा वापरता येईल असे स्पेस शटल तयार केले. पहिला होता कोलंबिया १२एप्रिल १९८१ ला लौंच झाले. त्याबरोबा दोन फ्युएल टॅंक पण होते. त्यानंतर ह्या स्पेस शटल मध्ये स्पेस लॅब पण होती. हि मोहीम ५ ते १७ दिवसांची झाली आणि त्यात २ ते ८ क्रू मेंबर होते. ह्यातच कल्पना चावला हि मिशन स्पेशालीस्ट आणि रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून १९९७ ला गेली होती. त्यानंतर परत २००३ मध्ये गेली असताना कोलंबिया दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.

दुर्घटना व नुकसान :

सॅली राईड हि पहिली स्पेस शटल मध्ये जाणारी महिला होती. ह्या स्पेस शटल ने हबल टेलेस्कोप अवकाशात लौंच केला आणि दुरुस्त पण केला. हे अंतराळवीर अवकाशात ‘स्पेस कॅप्सूल’ मधून एका अवकाशयाना तून दुसरी अवाक्ष यानात जातात. पण स्पेस शटल मध्ये २ दुर्घटना झाल्या, त्यात १८ अस्त्रोनॉटसचा मृत्यू झाला आणि दोन स्पेस शटल जाळले. १ चॅलेंजर १९८६ मध्ये उड्डाणाच्या वेळीच जाळले आणि ७ ही जणांचा मृत्यू झाला. त्यात १ नागरी व्यक्ती होती. एका शाळेची टीचर. दुसरी घटन कोलाम्बियावर घडली. २००३ मध्ये. मोहीम संपवून येतांना पृथ्वी च्या कक्षेत स्फोट होऊन सर्वांना मरण आले. नासा ने एकंदर ह्या मोहिमांमध्ये १४ अंतराळवीर गमावले. फक्त अटलांटीस हे शटल सुखरूप केनेडी स्पेस स्टेशन वर उतरले.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन :

सगळ्या देशांचे शटल अंतराळात होते तेंव्हा अमेरिका आणि रशिया ह्या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी एकत्र येऊन इतरहि देशांची मदत घेऊन एकाच मोठे स्टेशन बांधायचं ठरविले. अमेरिका, रशिया जपान युरोपियन स्पेस एजन्सी, कॅनडियन स्पेस एजन्सी ह्यांनी ट्रिटी वर सह्या करून इंटर नॅशनल स्पेस स्टेशन बांधले. त्यात नासा चे फ्रीडम रशियाचे मीर ह्यांनी एकत्र काम सुरु केले. त्यांना रशियन फेडरलस्पेस एजन्सी, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी,युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडियन स्पेस एजन्सी ह्यांनी मदत केली. ते लो अर्थ ओर्बीट {LEO} मध्ये जोडले गेले. हे काम १९९८ ते आजपर्यंत चालू आहे. येथे ३ ते ६ कृ मेंबर असतात. ते सहा महिने पण राहू शकतात. कधी कधी स्टेशन मध्ये १३ पण माणसे असतात. विविध देशातील अवकाशयान येथे येऊन थांबू शकतात. हे स्टेशन आपण अवकाशात नुसत्या डोळ्यांनी पण पाहू शकतो. ह्या स्टेशन मध्ये दोन महिलांनी स्पेस वॉक केला. त्या म्हणजे अॅनी मक्लेन आणि ख्रिस्तिना कोच. हे स्टेशन २०२४ किंवा २०२८ पर्यंत राहील.

नासा ने कमर्शियल स्पेसक्राफ्टना पण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ची सर्विस करण्याचे कंत्राट दिले आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी कमर्शियल स्पेस कंपनी स्पेस x आणि ऑर्बायातल सायन्स कार्पोरेशन ह्यांना कंत्राट दिले आहे. स्पेस x फाल्कन रॉकेट आणि ड्रॅगन स्पेसक्राफ्त वापरतात आणि ऑरबायटल सायन्स अन्तारेस रॉकेट आणि सिग्नास स्पेस क्राफ्ट वापरतात. नासा ने कमर्शियल क्र्यू देवेलापमेंट प्रोग्राम सुरु केला. त्यामुळे प्रायवेट स्पेस तूर ला त्याचा उपयोग होईल. तसेच स्टेशन वर माणसांची कमी भासणार नाही. हे स्टेशनवर १८० दिवस राहू शकतील.

हाती घेतलेल्या मोहिमा :

आतापर्यंत नासा ने ज्या मोहिमा केल्यात त्या खालीलप्रमाणे :

• सर्वात पहिल्यांदा साटेलाईट एक्सप्लोरर १९५८ मध्ये.
• मरिनर १९६० ७०, शुक्र, मंगल आणि बुध यांचा शोध घेण्यास केली.
• वायकिंग १ मंगळावर १९७६ ला गेले.
• रोव्हर मंगळावर १९९६ ला पाथ फाईंडर चालवला.
• पायोनियर १० गुरु पर्यंत १९९३ ला गेला.
• गलिलिओ १९९३ ला गुरु पर्यंत गेला.
• व्होयेजर-२ १९८६ ला शुक्रवार गेला आणि १९८९ ला नेपच्यून ला गेला.
• पायोनियर१० शनी वर १९८३ ला गेला.
• क्युरिओसिति मंगळवार २०१२ला उतरला.

नासा चे पुढचे लक्ष्य आहे अर्तेमीस प्रोग्राम. त्यायोगे चंद्राच्य दक्षिण ध्रुवावर माणूस पाठवून तेथून मंगळावर शोध मोहीम करायची. नासा मंगळ आणि गुरु ह्यावर संशोधन करण्यास उत्सुक आहे. त्याने मंगळावर जाण्यासाठी २०१७ पासून NEXT STEP TECHNOLOGIES FOR EXPLORESHAN PARTNERSHIP (Next STEP) च्या योगे चंद्रा वरून मंगळाकडे जाण्याचे योजले आहे.

नासा ने ज्युनो हे गुरुसाठी आणि न्यू होरायाजन प्लुटो साठी २०२० ते २०२४ ला पाठवायचे ठरवले आहे.

२१व्या शतकातील नासा :

नासा सध्या नियर ओर्बित ऑब्जेक्ट वर कार्य करीत आहे. पृथ्वीच्या जवळ असलेल्या अस्तेरोइद (asteroid) चे परीक्षण आणि प्रयोग करणे. सध्या एका मोठ्या अस्तेरोइद चा पृथ्वीवर काय परिणाम होणार ती, आदळेल का ह्याचा अभ्यास चालू आहे.

नासा ने एक चानेल पण सुरु केले आहे ‘Roku’ नावाचे आणि त्यात त्यांच्या चालू घडामोडी live screening करीत आहेत. आणि लवकरच सूर्याच्या पण जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहेत इंटर सोलर सिस्टम द्वारे.

नासा ची उद्दिष्टे :

• मानवी कार्य सूर्यमालेपलीकडे नेणे आणि कायम ठेवणे.
• पृथ्वी आणि विश्व ह्यांचा संबंध शोधणे.
• नवीन स्पेस टेक्नोलॉजी चालू करणे.
• स्पेस रिसर्च

नासा च्या प्रयत्नांना यश आले तर आपण स्टार ट्रेक सारखे विश्व प्रत्यक्ष अनुभवू हे नक्की.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

NASA Essay in Marathi Language Wikipedia

NASA Information in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *