Skip to content

Leave Letter in Marathi, Sutti Vinanti Patra Lekhan | Leave Format PDF

Leave Letter Marathi

Leave Letter in Marathi

Patra Lekhan : Example 1 – Request for Leave to Seek Medical Treatment

प्रति,
मा. मुख्यभियंता,
महावितरण मंडळ,
औरंगाबाद.

अर्जदार – सौ. प्रियांका व. बापट
मुख्य लिपिक, महावितरण मंडळ,
औरंगाबाद.
दिनांक १९.०३.२०१९

विषय :- आजारपणाच्या उपचारासाठी १ महिना रजा मिळणे बाबत

आदरणीय सर,

आपणास ठाऊक आहे कि माझ्या आतड्याला इन्फेकशन झाले आहे, ज्यामुळे मी गेले काही महिने अतिशय त्रस्त आहे आणि त्यामुळे मला वारंवार रजा देखील घ्याव्या लागल्या. परंतु आता मला या आजाराचे निदान कळले आहे आणि त्यावरील उपचारासाठी मला दुसऱ्या गावाला जावे लागणार आहे जिथं हा उपचार उपलब्ध आहे तसेच संपूर्ण कालावधी मला तिथे राहावे लागणार आहे. तरी मी या अर्जाद्वारे उपचार करून घेण्यासाठी म्हणून मला ०१.०४.२०१९ ते ०१.०५.२०१९ अशी १ महिन्यांची रजा मिळावी अशी मी विनंती करते.

हा उपचार एक अत्यंत किचकट अशा प्रक्रियेतून केला जातो ज्यासाठी मला संपूर्ण १ महिना दवाखान्यामध्ये काढावा लागणार आहे आणि त्यामुळे मला कार्यालयात येणे शक्य नाही. म्हणून या रजेची आवश्यकता आहे.

हे एक इन्फेकशन आहे ज्यावर मी आता लवकरात लवकर उपचार नाही केले तर हे इन्फेकशन माझ्या संपूर्ण शरीरात पसरू शकतो आणि मग यावर उपचार करणे अशक्य होईल म्हणून मी तातडीने जात आहे. परंतु संपूर्ण आजार बरा झाला तर मला वारंवार रजा घ्यावी लागणार नाही आणि मी माझा संपूर्ण वेळ आपल्या कार्यालयीन कमला देऊ शकेल, आजार बरा झाल्यास माझे संपूर्ण लक्ष कामाकडे केंद्रित होईल. जेणेकरून आपल्या दैनंदिन कामकाजावर परिणाम देखील होणार नाही. सध्या मला सतत घ्याव्या लागलेल्या रजेमुळे अनेक कार्यालयीन कामे खोळंबली आहेत याची मला जाणीव आहे, तसेच आपल्या समस्या घेऊन येणाऱ्या अनेक नागरिकांच्या समस्यांचे निदान देखील रखडलेले आहे. त्याबद्दल मला अतिशय दुःख आहे.

मी रजेवर जाण्यापूर्वी रखडलेली जास्तीत जास्त कामे संपवून जाण्याचा प्रयत्न करेन. तसेच मी कार्यालयात नसताना माझ्या मुळे कोणतेही काम अडणार नाही याची संपूर्ण जवाबदारी माझी असेल हे मी जाणते आणि यासाठी मी माझी सहकारी जया दुसानिस हिला सर्व काम सोपवून जाईन व सर्व काम समजावून सांगेल. त्यामुळे मी कार्यालयात नसताना आपणास कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि काम सुव्यवस्थितपणे चालू असेल.

जयाला देखील कामाचा उत्तम अनुभव आहे आणि सर्वच गोष्टी मी तिला शिकवून जाईल. माझ्या संपूर्ण जवाबदाऱ्या मी परत येईपर्यंत तिच्याकडे असतील. तसेच काही महत्वाच्या कामांसाठी मोबाईलवरून वरून आपणास उपलब्ध असेल. तरी काहीही महत्वाचे काम असल्यास आपण निसंकोच पणे मला संपर्क करावा.

तसेच मला उपचारांसाठी लागणारा निधी भरण्यासाठी आपल्या आरोग्य विमा सुविधा वापरण्याची मला संमती द्यावी आणि ती सुविधा लवकरात लवकर मला उपलब्ध करून द्यावी हे विनंती. कारण असे कि हा उपचार सर्वसामान्य नाही आणि माझ्या आजारावर हा एकमेव उपचार आहे.या उपचारासाठी लागणारा निधी हा अधिक आहे आणि त्यामुळेच तो काहीसा महाग आहे जो कि मी नाही भरू शकत.म्हणून मी हा निधी मिळावा म्हणून विनंती करते आहे. त्यासाठी लागणारी सर्व औपचारिकता मी पूर्ण केलेली आहे आणि उपचारानंतर सगळ्या पावत्या नियमाप्रमाणे आपल्याकडे जमा करेल आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करेल.

तरी मी आपणास विनंती करते कि ०१.०४.२०१९ ते ०१.०५.२०१९ हे माझी एक महिन्यांची रजा मान्य करावी.
आपली सहकारी, प्रियांका व. बापट.

Example 2 – Letter for leave from school

दीपक प. कामखेडकर,
इयत्ता ८ वी (अ),
०४.०२.२०२०

प्रति,
मुख्याध्यापक,
संत ज्ञानेश्वर विद्यालय,
चनकवाडी

विषय :- १० दिवसांची रजा मिळणे बाबत

आदरणीय सर,

माझे नाव दीपक प. कामखेडकर असे आहे, आणि मी आपल्या शाळेमध्ये इयत्ता ८ वी (अ) मध्ये शिकत आहे, पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या चुलत भावाचे लग्न आहे आणि मला त्यासाठी आमच्या गावी जायचे आहे. तर, या अर्जाद्वारे मी आपल्याला विनंती करू इच्छितो कि माझी ०८.०२.२०२० ते १८. ०२.२०२० हे १० दिवसांसाची रजा मंजूर करावी. मी १९.०२.२०१९ रोजी परत शाळेमध्ये हजार होईन.

लग्न आमच्या गावी आहे आणि गावी जायला २२ तासाचा कालावधी लागतो, तसेच लग्न म्हंटले कि सर्व नातेवाईक जमतात आणि अनेक कार्यक्रमांची पर्वणीच तेथे असणार आहे. मी माझ्या भावाचं अत्यंत लाडका आहे आणि त्याने हट्टच केला आहे कि मी लवकर यावे म्हणून ही १० दिवसांची रजा हवी आहे. मला माहिती आहे कि पुढील १० दिवस माझा शाळेतील अभ्यासक्रम बुडणार आहे आणि आपल्याला या गोष्टीची काळजी असणारच, परंतु मी आल्याला वचन देतो को मी माझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करणार नाही, जाण्याच्या अगोदर मी माझा संपूर्ण गृहपाठ अगदी व्यवस्थितपणे संपवेन आणि अभ्यासाची पुस्तके देखील सोबत घेऊन जाईन.

आपल्या शाळेच्या कब्बडी संघाचा मी कर्णधार आहे याची देखील मला जाणीव आहे, त्यामुळे गावी गेल्यावर देखील मी माझ्या व्यायामाकडे लक्ष देल आणि जमेल तसा सराव करेन. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कब्बडी स्पर्धेचे विजेतेपद हे आपल्याच शाळेकडे असेल.

मला या गोष्टीची जाणीव आहे कि पुढच्याच आठवड्यामध्ये आपल्या शाळेमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले गेले आहे आणि ज्यामध्ये आमच्या वर्गाचा एक प्रयोग सादर होणार आहे, परंतु त्याच दिवशी दादाचे लग्न आहे. तरी यासाठी असणारी माझी जवाबदारी मी संपूर्ण केलेली आहे आणि आमच्या प्रयोगाला पाठिंबा दिला आहे. हे सर्व करून सुद्धा मी आपल्या शाळेत होणारे विज्ञान प्रदर्शन बघू शकणार नाही याचे मला दुःख आहे. आपल्या जिल्ह्यातील इतर शाळेतील मुलांना भेटायची आणि त्यांनी केलेले अनेक विज्ञानाचे प्रयोग बघण्याची एवढी चांगली संधी मी गमावणार आहे असेच मला वाटत आहे, तसेच त्यातुं मला अनेक उत्तम गोष्टींची माहिती मळली असती आणि ज्ञानात भर देखील पडली असती. असो, तरी देखील मी तुम्हाला दादाच्या लग्नासाठी १० दिवसांची रजा मंजूर करावी अशी विनंती करतो.
आपला आज्ञाधारक विद्यार्थी,
दीपक प. कामखेडकर.

Leave Letter Format

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *