Name Supriya Sule | सुप्रिया सुळे ( Full name: Supriya Sadanand Sule) – Daughter of leading Maharashtra Politician Sharad Pawar

Birthday / Birth date / Age 30th June 1969. As of 2019, she is around 50 years old.

Marital Status / Marriage / Wife Married to Sadanand Sule since 1991. She also has a daughter named Revati Sule & a son Vijay Sule.

Current Political Party Nationalist Congress Party (NCP)

Address

Mumbai : Silver Oak Eastate, House No. 2, Breach Candy Mumbai – 400 026,Maharashtra

Delhi : 6, Janpath Road, New Delhi – 110001

Biography / Wiki

Birthdate, Childhood and Education : जन्म आणि शिश्रण सुप्रिया सुळेंचा जन्म ३० जून १९६९ रोजी पुण्यात झाला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार त्यांचे वडील तर आणि सौ. प्रतिभाताई पवार या त्यांच्या आई. सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या एकुलत्या एक कन्या,शरद पवारांनी आपल्या वागण्यातून कुटुंबनियोजनाचा त्याकाळात आदर्श घालून दिला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रार्थमिक शिक्षण मुंबईतचं घेतलं.

त्यानंतर मुंबईतल्या जय हिंद कॉलेजमधून विज्ञानशाखेची पदवी घेतली. त्यांनी मायक्रोबायलॉजीमध्ये बीएससी केलंय. पुढे त्यांनी कॉलिफोर्नियामध्ये जल प्रदूषणावरही अभ्यास केला.

Political Journey : सुप्रियाचा राजकीय प्रवास महाराष्ट्राचे सर्वात प्रभालशाली राजकीय नेते म्हणजे शरद पवार, शरद पवार यांना वगळून राज्यात कुठलीही राजकीय खेळल्या जाऊ शकत नाही. अशा प्रभावशाली राजकारण्याच्या घरी जन्माला आलेल्या, सुप्रिया सुळेंना राजकारणाचे बाळकडू घरुनच मिळाले. सुप्रिया सुळे यांनी अनेक राजकीय

खेळी जवळून बघितल्या. त्यातूनच सुप्रिया सुळेंचं राजकीय शिक्षण झालं. पण सुरवातीला सुप्रिया सुळे राजकारणापसून लांब राहल्या. त्यांनी सामाजिक कामांमध्ये जास्त सहभाग घेतला. त्यामुळे सुप्रिया सुळे राजकारणात येतील अशी साधी चर्चाही नसतांना, २००६मध्ये त्यांना राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. आणि त्यानंतर शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण अशीही चर्चा सुरू झाला. कारण तोपर्यंत फक्त अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे धुरा जाणार अशी चर्चा होती. पण सुप्रिया सुळेंच्या राजकीय प्रवेशानं

नवी चर्चा सुरू झाली. सुप्रिया सुळेंनी आपल्या खासदारकीच्या काळात राज्यातल्या राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली. त्या अनेक सामाजिक आणि राजकीय व्यासपीठांवर दिसू लागल्या. त्यानंतर २००९ मध्ये सुप्रिया सुळे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. २००९च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे शरद पवारांच्या बारामती मतदारसंघातून निवडणुकीला उभा राहल्या आणि त्यांनी मोठा विजय मिळवला. या विजयानंतर सुप्रिया सुळेंनी खऱ्या अर्थानं राजकीय प्रवासाला सुरूवात केली. राजकारणासाठी त्यांनी समाजकारणाचा रस्ता स्वीकारला. महिला सक्षमिकरण हा त्यांचा जीव्हाळ्याचा विषय आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना आर्थिक स्वालंबन देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या महिला बचत गटाचं जाळ राज्यभर विणलं. यशस्वीनी महिला गटाच्या त्या अध्यक्षाही आहेत. त्यासोबतच स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधातही त्यांनीजनजागरण मोहिम हाती घेतली. ‘जागर’  हा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला.

‘जागर’ चा हा संदेश पदयात्रेच्या माध्यमातून गाव- शहरांपर्यंत पोचवण्यासाठी पदयात्रा व प्रभातफेर्‍यांचे आयोजन करण्यात आलं. २५ ऑगस्ट २०११ या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा ते महात्मा फुले वाडा, पुणे अशा ६० कि.मी. ची पदयात्रा काढण्यात आली. राज्याच्या विविध जिल्ह्यातील, विविध जाती-धर्मांच्या, गरीब-श्रीमंत ५०० हून अधिक मुलीं तीन दिवस एकत्र होत्या. जागरचा संदेश देत फिरल्या. तसंच कुपोषणाबाबतही सुप्रिया सुळेंनी या काळात भरीव काम केलं. असे सामाजिक विषय हाताळत त्या लोकापर्यंत पोहचत होत्या. पण दरम्यानच्या काळात त्या संसदेतही लक्षणिय कामगिरी पार पाडत होत्या.

Parliament Work : संसदीय समित्यांवर काम

२००९-२०१४ या काळात त्यांची लोकसभेतली उपस्थिती ८६ टक्के होती. त्याकाळात त्यांनी ७२९ प्रश्नही विचारले. त्यांनी आतापर्यंत ५ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यांत सक्तीचे मतदान, लोकसंख्या नियंत्रण, मुलींचे शिक्षण यांचा समावेश आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, पोलिओ निर्मूलन यासारख्या ३७ महत्वाच्या चर्चेत त्यांनी बाजूही मांडली आहे. संसदेत आणि मतदारसंघात भरीव कामगिरी करणाऱ्या सुप्रिया सुळेंनी २०१४च्या निवडणुकीतहीबारामतीमधून विजय मिळवला. मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस उद्धवस्त झाला. पण सुप्रिया सुळेंनी आपली जागा शाबूत ठेवला.

ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि तंत्रज्ञान तसेच ग्रंथालय या संसदेच्या समित्यांमध्ये सुप्रिया सुळे सक्रीय आहेत.

 Important Posts : इतर महत्वाती पदं

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान – कार्यकारी अध्यक्ष

नेहरू सेंटर मुंबई – विश्वस्त

विद्या प्रतिष्ठान बारामती – विश्वस्त

पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट – विश्वस्त

Scams and Controversies : वादसुप्रिया सुळेंच्या राजकीय प्रवास काही आरोपही झालेत. त्यामध्ये आयपीएलचा वाद गाजला. त्यांचे पती सदानंद सुळे यांचे सोनी एंटरटेंटमेंट चॅनलमध्ये त्यांचे १० टक्के शेअर्स असल्याचा वाद गाजला. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी आपल्या कुटुंबावरचे आरोप धुडकावून लावले.

Family : कुटुंबसदानंद सुळे यांच्याशी सुप्रियाचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव रेवती तर मुलाचे नाव विजय आहे. अजित पवार हे त्यांचे चुलत भाऊ आहेत.