Skip to content
Home » Politicians » Udayanraje Bhosale Biography, Wiki, Wife, Family Tree, House, Cars

Udayanraje Bhosale Biography, Wiki, Wife, Family Tree, House, Cars

udayan raje bhosale maharaj
Name Udayan Raje Bhosale (उदयन राजे भोसले)

Also known as UdyanRaje Bhosale

Age / How old / Birthday / Date of Birth / DOB 24th February 1966. As of 2024, he is around 58 years old.

Marital Status / Marriage / Wife Married to Damyanti Raje Bhosale

Current Political Party Nationalist Congress Party (NCP)

Address

Contact Address :

1, Shukarawarpeth Jalmandir Palace,
Satara,
Maharashtra.

Biography / Wiki

Birthday / Childhood and Education जन्म आणि शिक्षण

इंग्रजांनी भारताततल्या राजांना आपलं मांडलीक बनवलं. आणि देशावर सत्ता सुरू केली. राजांनी बंड करू नये म्हणून त्यांनी राजांचे अधिकार कायम ठेवले.त्यांच्या राजेपणाला धक्का लागू दिला नाही. पुढे वल्लभाई पटेल यांनी राजेशाही खालसा केली. पण त्यांना पगार सुरू केला. तर इंदिरा गांधींनी त्यांचे पगारही थांबवले. राजेशाही संपुष्टात आली. पण लोकांच्या मनातलं राजघराण्यांबाबतचा आदर आणि आकर्षण काही संपलं नाही. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि  शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत उदयनराजे भोसले. छत्रपतींच्या साताऱ्याच्या गादीचे वंशज आहेत उदयनराजे भोसले.

२४ फेब्रुवारी १९६६ ला उदयनराजे भोसले यांचा जन्म झाला. त्यांचं प्रार्थमिक शिक्षण देहरादूनला झालं. त्यांचं शिक्षण सुरु असतांनाच वडील प्रतापसिंह भोसले यांचं निधन झालं आणि उदयनराजे यांनी पुढचं शिक्षण पाचगणिला पूर्ण केलं. उदयनराजे यांनी

पुण्यातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली.तर इंग्लंडमधन एमबीए केलं, आणि १९९० मध्ये उदयनराजे साताऱ्याला परतले.

Political Journey सुरवात राजकीय प्रवासाची

राजघराण्यात जन्माला आल्यावर त्या व्यक्तीनं राजकारणाचा रस्ता धरावा ही जणू रितचं झाली होती. राजघराण्यांचं ‘राजे’पण गेलं होतं. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्चस्वासाठी लोकशाहीचा म्हणजेच निवडणुकीच्या राजकारणाचा रस्ता, राजघराण्यांनी स्वीकारला.

१९९० मध्ये उच्चाशिक्षण घेऊन परतल्यानंतर, उदयनराजे भोसलेंनीही तोच मार्ग स्वीकारला. आणि निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली.

१९९१ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडूण आले. उदयनराजे भोसलेंनी भाजपचा रस्ता धरला आणि भाजपच्या तिकीटावर ते निवडूण आले. एवढेच नव्हे तर त्यांना राज्यमंत्रीपदही मिळालं. १९९८-९९ मध्ये उदयनराजे भोसले राज्याचे महसूल राज्यमंत्री होते. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंशी उदयनराजेंची खास जवळीक होती. पण जेम्स लेन प्रकरणी भाजपनं योग्य भूमिका घेतली नाही. असा आरोप करत

उदयनरजे भाजपमधून बाहेर पडल आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली.

राष्ट्रवादीच्या तिकीटावर ते दोन वेळा लोकसभेवर निवडूण गेलेत.

थोडक्यात राजकीय प्रवास

  • 1998-99 – विधानसभेवर निवड, राज्याचे महसूल राज्यमंत्री
  • 2009 – लोकसभेवर निवड
  • 2009 – विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीचे सदस्य, पर्यावरण समितीचे सदस्य
  • 2010 – रसायण आणि खते समितीचे सदस्य
  • 2014 – पुन्हा लोकसभेवर निवड

Family / कुटुंब

दमयंतीराजे भोसले या उदयनराजे भोसले यांच्या पत्नी आहेत. उदयनराजे यांच्या प्रचारात त्या कायम आघाडीवर असतात. उदयनराजे यांना एक मुलगा आणि मुलगी आहे.

Hobbies / छंद

उदयनराजे भोसले यांचे छंदही राजासारखेच आहेत. त्यांना फॉर्म्युला वनची आवड आहे. वेगाने गाडी चालवणे त्यांना आवडत. आणि सातारा ते पुणे अंतर पस्तीत मिनीटांत पार करू शकतो असा त्यांचा दावाही आहे. शिवाय त्यांना बॉक्सींगचीही आवड आहे.

7 thoughts on “Udayanraje Bhosale Biography, Wiki, Wife, Family Tree, House, Cars”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *