मेदू वडा RECIPE / पाककृती

मेदू वडा हा दक्षिणात्य पारंपारिक पदार्थ असून तो दक्षिण भारतात जेवणात आणि नाश्त्यासह केव्हाही खाल्ला जातो.

उडीदाच्या डाळीपासून बनवलेला हा पदार्थ कुरकुरीत व अतिशय खमंग व चविष्ट असा पदार्थ आहे. याचा आकार अमेरिकेत मिळणाऱ्या डोनट सारखा  असतो व तो बाहेरून कुरकुरीत असलं तरी आतून नरम असतो. मेदू वडे सांबार व नारळाच्या चटणी बरोबर खाल्ले जातात.

खाली दिलेल्या साहित्यातून १० ते १२ वडे तयार होतील.

साहित्य

 1. उडीद डाळ …………………………………… १ कप
 2. हिंग ……………………………………………१/८ चमचा (चिमुट)
 3. धणे ………………………………………. २ चानाचे चमचे
 4. बारीक चिरलेली कोथिंबीर ……………..२ टेबलस्पून
 5. बारीक चिरलेली हिरवी मिएची ……… १ टेबलस्पून
 6. मीठ ……………………………………… १ चहाचा चमचा
 7. तेल ……………………………………..  तळण्याकरता

कृती 

 • उडदाची डाळ धुवावी व ३ ते ४ कप पाण्यात ४ ते ६ तास भिजवावी.
 • ६ तासांनी डाळ पाण्यातून उपसून मिक्सर मध्ये लागेल तसं पाणी वापरून बारीक वाटून घ्यावी. वाटून झाल्यावरही २,३ मिनिटे मिक्सर चालू ठेवावा म्हणजे डाळीचे पीठ फेटले जाईल व डाळ हलकी होईल. मग हे पीठ एका पसरट भांड्यात काढावी.
 • या पिठात मिरची, कोथिंबीर,हिंग, मीठ,धणे हे सर्व साहित्य घालून पीठ २,३ मिनिटे चांगले हलके होईल असे फेटावे. इतके कि पिठाचा लपका पाण्यात टाकताच तो पाण्यात ना बुडता तरंगेल.
 • पीठ पुरेसे मऊ व हलके असायला हवे.लागल्यास पाणी घालावे पण पीठ पातळ होता कामा नये. पीठ तळहातावर घेतल्यास ते त्याच आकारात राहिले पाहिजे. पीठ अशा रीतीने तयार केल्यावर लगेच वडे तळावे नाहीतर पीठ खाली बसेल व वडे हलके होणार नाहीत.
 • लगेच वडे करायचे नसल्यास पीठ फ्रीज मध्ये ठेवावे.
 • वडे तळण्यासाठी एका कढईत तेल तापत ठेवावे.
 • तेल फार तापलेले नसावे. पिठाचा एक थेंब तेलात टाकावा. बुडबुडे येऊन पिठाचा थेंब वर येईल. म्हणजे तेल पुरेसे तापले आहे. जास्त तापलेल्या तेलात थेंब लगेच करपू लागेल. वडे जास्त तेलात तळल्यास ते बाहेरून काराप्तील पण आतून कच्चे राहतील. म्हणून तेल माफक तापलेले असावे व मध्यम आंचेवर वडे तळावेत.
 • वडा करताना तळहात ओले करून पिठाचा मोठा गोळा हातावर घेऊन थापावे, त्यात मध्ये भोक करावे मग दुसऱ्या ओल्या हाताने हा वडा तापलेल्या तेलात ढकलावा.
 • वडे दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर व्यवस्थित तळून घ्यावा.
 • तळल्यावर वडे पेपर नॅप्किन वर तेल निथळू द्यावे.
 • पारंपारिक रित्या दक्षिण भारतात हे मेदू वडे सांबार व खोबऱ्याच्या चटणी बरोबर खातात.

Recipe / रेसिपी  आवडली तर  जरूर  SHARE करा !