Skip to content
Home » Recipe » Pav Bhaji Recipe in Marathi | पाव भाजी

Pav Bhaji Recipe in Marathi | पाव भाजी

pav bhaji pakkala marathi

पाव भाजी RECIPE पाककृती 

साहित्य

  • बटाटे …………………………………………………..४ मध्यम

२     टोमॅटो …………………………………………………४ मध्यम

३     फूल गोभी (फ्लॉवर)………………………………….१/४ लहान

४     कांदे …………………………………………………..२ मध्यम

५     आले …………………………………………………..१ इंच

८     लसूण ………………………………………………….८ – १० पाकळ्या

९     हिरवी शिमला मिरची …………………………………..१ मध्यम

१०    हिरव्या मिरच्या ………………………………………….३-४

११    ताजी कोथिंबीर ……………………………………………..१/४ कप

१२    सोललेले मटार ……………………………………………..१/४  कप

१३    लिंब ……………………………………………………………२

१४    तेल ………………………………………………………………३ टेबल स्पून (चमचे)

१५    मीठ ……………………………………………………………….चवीनुसार

१६    पाव भाजी मसाला ………………………………………………..१ १/२ टेबल स्पून (चमचे)

१७    बटर (लोणी)……………………………………………………………३ टेबल स्पून (चमचे)

१८    पाव …………………………………………………………………८

पूर्व तयारी

  • प्रथम चरण

सर्व प्रथम बटाटे उकडून, थंड करून, सोलून घ्यावेत. फ्लॉवर धुवून किसून घ्यावा. कांदे सोलून, धुवून बारीक चिरून घ्यावेत. आले लसूण सोलून धुवून त्याची वाटून पेस्ट करावी.

  • द्वितीय चरण

शिमला मिरची धुवून त्यातील बिया काढून टाकून ती बारीक चिरून घ्यावी. त्याचप्रमाणे हिरव्या मिरचीला ही धुवून, देठ काढून बारीक चिरून घ्यावे.

  • तृतीय चरण

ताजी कोथिंबीर निवडून, धुवून  बारीक चिरून घ्यावी.मटार चे दाणे धुवून मिठाच्या पाण्यात मऊ उकडून घ्यावेत व नंतर पाण्यातून काढून हलके कुटून घ्यावेत. लिंबाच्या फोडी कराव्यात.

कृती

  • प्रथम चरण

एका पॅन मध्ये तेल गरम करावे व त्यात ३/४ एव्हढे कांदे घालावेत. १/४ कांदे बाजूला ठेवावेत.

गुलाबी रंगावर परतल्यावर त्यात हिरव्या मिरच्या व आले लसूण पेस्ट घालावी.मिनिट भर परतावे.

  • द्वितीय चरण

आता त्यात चिरलेल्या टॉमेटोंपैकी अर्धे घालावे व ३ ते ४ मिनिटे हलवत शिजू द्यावे. तेल सुटू लागले कि शिमला मिरची, व उकडलेले मटार, फ्लॉवर आणि बटाटे ही घालावे व उकळी आल्यावर १० मिनिटे मंद आंचेवर शिजू द्यावे. मध्ये मध्ये चमच्याच्या मागील बाजूने दाबत एकजीव करत राहावे. सर्व भाज्या एकजीव होईस्तो असे करावे.

  • तृतीय चरण

आता यात पाव भाजी मसाला, मीठ, उरलेले टोमेटो घालावे व हे मिश्रण २ मिनिटे मंद आंचेवर ठेवावे. मध्ये मध्ये ढवळत राहावे.

  • चतुर्थ चरण

आता एकूण बटर मधील अर्धे जाड तापलेल्या तव्यावर/ पॅनवर घालावे. प्रत्येक पावाचे २ काप करून ते या बटर वर परतावे. आलटून पाल्टून फिरवावे म्हणजे ते सोनेरी व कुरकुरीत होतील .

  • अंतिम चरण

आता ही तयार भाजी बारीक चिरलेली कोथिंबीर व उरलेले बटर याने सजवून गरमागरम वाढा.

भाजलेले पाव ,चिरलेला बारीक कांदा व लिंबाची फोड ही बरोबर द्या.

Recipe / रेसिपी  आवडली तर  जरूर  SHARE करा !

4 thoughts on “Pav Bhaji Recipe in Marathi | पाव भाजी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *