Skip to content

Aster Flower Information in Marathi | Aster Flower Essay | अस्टर फूल

Aster Flower Mahiti

Aster Flower Information in Marathi

अस्टर फुलांची माहिती

Introduction / परिचय :

  • देवाला वाहायची फुले असोत, हार असो किंवा घराच्या व्हरांड्यामध्ये ठेवलेल्या कुंड्यांमधील रंगीबिरंगी अस्टरची फुले हे नक्कीच आपल्याला आकर्षित करत असतात.
  • साधारण आपल्या भारतीय शेवंती सारख्या भासणाऱ्या या फुलाला अनेक पाकळ्या असतात. एका वेळेस या झाडाला अनेक फुले येत असतात. संपूर्ण कुंडी या फुलांनी गच्च भरून जाते.
  • जेव्हा या झाडाला ‘बहर’ येत असतो तेव्हा मन मंत्रमुग्ध होऊन जात असते. घरगुती सुशोभनामध्ये या झाडाचे विशेष महत्व आहे. देवपूजेमध्ये हार असोत किंवा दिवाळी साठी काढलेली रांगोळी सर्वच ठिकाणी या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

Description / वर्णन :

  • अस्टरला, मायकलमास डेझी किंवा फ्रॉस्ट फ्लावर्स स्टारवॉर्ट्स अशीही नावे आहेत.
  • अनेक पाकळ्या असणारे हे साधारण लहान आकाराचे असे फुलं आहे. या फुलाला अनेक पाकळ्या असतात आणि त्यांच्या मधोमध काही बीज असतात जे काळ्या किंवा पिवळ्या रंगाचे असू शकतात.
  • या फुलाचे झाड हे साधारण कमी उंचीचे असते, सरासरी उंची १ ते ४ फूट पर्यन्त असू शकते. याची पाने गडद हिरव्या रंगाची असतात थोडी दातेरी किंवा टोकदार देखील असू शकतात.
  • या झाडाला एका वेळेस अनेक फुलांचा बहर येत असतो. अनेक विविध रांगांमध्ये हे फुलं असते जसे पांढरा, गुलाबी, पिवळा आणि विषेश म्हणजे निळा, जांभळा, लव्हेंडर रंग हे या झाडाच्या फुलाचे वैशिष्ठ आहे. यामध्ये झाडाच्या वेगवेगळ्या जातीनुसार त्यांच्या पाकळ्यांची दाटी ही सुद्धा निरनिराळी असू शकते. विरळ किंवा दाट असू शकते.
  • हे फुलं झाडावर १५ ते २० दिवसांपर्यंत ताजे राहू शकते तर झाडावरून तोडल्या नंतर देखील काही काळ ताजे राहू शकते. फुलं येताना ते एका दांडीवर येत असते, साधरणपणे एका दांडीवर फुलं आणि कळी असे दोन्ही असते. बाजारामध्ये ही फुले नगावर किंवा किलो वर उपलब्ध असतात.
  • १९१८ मध्ये हंगेरीमध्ये झालेल्या एका क्रातीमध्ये या फुलाचा वापर झाला होता म्हणून त्याला ऍस्टर रेव्होल्यूशन म्हणून ओळखले जाते.

Agriculture and Cultivation / शेती आणि लागवड :

  • अस्टर हे एक बारमाही झाड आहे मात्र फुलांची संख्या ही बहरावर अवलंबून असते, जेव्हा बहर येत असतो तेव्हा हे झाड फुलांनी अगदी गच्च भरून जात असते आणि तेव्हा ते अतिशय आकर्षक दिसत असते. बाजारपेठेमध्ये या फुलाला विशेष मागणी असते.
  • पुष्पगुच्छांमध्ये देखील याची उपयुक्तता असते कारण याची दांडी लांब असते. अस्टर थंड आणि दमट अशा दोन्ही वातावरणामध्ये लागवड केले जाऊ शकते, परंतु यांना थंड वातावरण जास्त आवडते. यासाठी लागणारी माती ही साधारण ओली असावी परंतु पाण्याचा निचरा होणे देखील गरजेचे असते, नाही तर रोपे कुजण्याची शक्यता असते.
  • जगामध्ये देखील हे एक अत्यंत लोकप्रिय असे फुलं आहे आणि संपूर्ण जगामध्ये याची लागवड केली जाते.अल्पाइन अस्टर, बीच-वाळू अस्टर, मॅग्नस अस्टर, सी अस्टर अशा साधारणपणे १८० च्या जवळपास जाती अस्टरच्या उपलब्ध आहेत.
  • शेतामध्ये किंवा घरातील बागेत, जमिनीमध्ये किंवा कुंडीमध्ये आपण या झाडाची लागवड करू शकतो.

Information of Aster Flower in Marathi / Aster Flower Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *