Skip to content
Home » Tips Information in Marathi » Computer Information in Marathi | संगणकाची माहिती

Computer Information in Marathi | संगणकाची माहिती

Computer Information in Marathi

संगणकाची माहिती

“गरज ही शोधाची जननी असते”. जेव्हा – जेव्हा चालू असलेल्या कामा मध्ये अडथळा निर्माण होतो किंवा असलेले काम अधिक जलद आणि अचूक व्हावे असे वाटले, तेव्हा माणसाच्या डोक्यात विचार चक्रे फिरू लागली आणि आकडेवारी अधिक सुलभ आणि जलद व्हावी म्हणून तऱ्हे – तऱ्हेचे मशीन शोधले गेले. या सर्वांचा परिपाक म्हणजे आजचा आपला संगणक.

उत्क्रांती :

  • फार पूर्वीपासून भारतामध्ये आर्य भट्ट आणि भास्कराचार्य हे गणिताच्या आधारे कोट्यावधी दूर असलेल्या ताऱ्यांचे अंतर आणि वजन शोधून काढीत होते. तसेच २००० वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया (बाबिलोनिया) इथे अबाकस या गणिती पद्धतीचा जन्म झाला.
  • बेरीज, वजाबाकी ताबडतोब करता यावी म्हणून एका लाकडी मांडणीत दोन आडव्या वायरला मणी लावले होते आणि त्यावरून उदाहरणे पटापट सोडविली जात. हे आजही अबाकस शिकलेल्या मुलांना माहित आहे.
  • नंतर १६२२ मध्ये ब्लासिक पास्कल याने वडि‍लांना कराची आकडेमोड करताना मदत व्हावी म्हणून डिजिटल कॉम्प्युटर तयार केला. त्यात आकडे डायलवर फिरत होते आणि १० ऍरे असलेली चाके होती.
  • ते आकडे घातल्या नंतर विशिष्ट क्रमाने फिरवल्यावर आपोआप बेरीज येत होती. हल्ली जे आपण कॅलक्यूलेटर वापरतो तसेच होते म्हणून त्याला पास्कलाईन असेही म्हणतात. हे हल्ली सुद्धा वॉटर मीटर आणि ओडोमीटर मध्ये वापरतात.
  • त्यानंतर १६४२ मध्ये विलियम ऑट्रेड याने स्लाईड रूल पट्टीचा शोध लावला, ज्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ आणि लॉगॅरिथम यांची आकडेमोड होऊ शकत होती.
  • १८९० मध्ये हर्मन होलेरीत आणि जेम्स पोवर यांनी यू.एस. सेन्सस साठी ‘इसिली ऍक्सेसिबल मेमरी’ चे पंच कार्ड तयार केले. कंपन्यांना त्याचा खूप उपयोग व्हायला लागला.
  • याच्या मध्ये आयबीएम, रेमिंग्टन, बरोज वेलकम इत्यादी कंपन्यांनी इलेक्ट्रोमेकॅनिकल मोशन पंच कार्ड तयार केले. त्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि वर्गीकरण, इत्यादी गोष्टी होत्या.

औद्योगिक क्रांतीचा परिणाम :

  • युरोपात औद्योगिक क्रांतीमुळे हातमागाच्या यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्त्रे तयार करण्यासाठी मानवी हातांपेक्षा मशीनने पॅटर्न डिझाइनचे काम करणारा कॉम्प्युटर शोधून काढला.
  • दुसर्‍या महायुद्धाच्या काळात १९४२ मध्ये जोन एकर्ट आणि जोन मौचली या मूर स्कूल ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पेन्न्सिल्वेनिया यांनी ENIAC म्हणजे इलेक्ट्रिकल न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कॅलक्युलेटर
    शोधला तो १० आकडी गुणाकार एका सेकंदाला ३०० या वेगाने करत होता.
  • परंतु या कॉम्प्युटरला १८०० स्क्वेअर फुटची मोठी रूम लागत होती आणि १ लाख ८० हजार वॅटची वीज लागत होती. ह्या कॉम्प्युटर मध्ये १८,००० व्हॅक्युम ट्यूब्ज वापरल्या गेल्या होत्या.
  • त्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग मूळ, घन मूळ असे सगळे ऑपरेशन्स पार पडत होते.

हल्लीच्या कॉम्प्युटरचा पूर्वज :

  • हल्लीच्या कॉम्प्युटरचा जनक म्हणून चार्ल्स बॅबेज याचे नाव घेतले जाते. १८३३ ते १८७१ पर्यंत त्याने खटपट करून ऍनालीटीकल इंजिन शोधले ज्याच्या मध्ये गुणाकार आणि भागाकार पण होऊ शकत होता.
  • त्या इंजिन मध्ये सी पी यु ला मिल म्हणत होते आणि मेमरी ला स्टोर म्हणत होते. हा ११ फुट लांब आणि ७ फुट उंच आणि १५ टन वजनाचा होता. त्याच्यामध्ये ८००० भाग होते.
  • आता कॉम्प्युटर मेकॅनिकल मशीन पासून इलेक्ट्रोमेकॅनिकल मशीन मध्ये रूपांतरित झाले. ट्यूब्ज नंतर आता कॉम्प्युटरच्या हॉर्डवेअर मध्ये शोध आणि त्याला अपग्रेड करणे सुरु झाले. ट्यूब्ज च्या जागी ट्रांझिस्टरचा वापर होऊ लागला.
  • १९५८ मध्ये टेक्सास मधील किल्बी ह्याने पहिली इंटीग्रेटेड सर्किट चीपचा उपयोग केला. खरे पाहता चीप हि सुद्धा ट्रांझिस्टरचा सेटच होता पण त्याला आता सोल्डर करण्याची जरूरी नव्हती.
  • हे अवाढव्य कॉम्प्युटर फक्त सरकारी, मिलिटरी आणि मोठ्या उद्योग धंद्यांनाच परवडत होते. IBM ही ते तयार करणारी एकमेव कंपनी होती. १९७० मध्ये मात्र APPLE ने पीसी म्हणजे पर्सनल कॉम्प्युटरची संकल्पना राबवली.
  • ह्या आधी कॉम्प्युटर फ़क्त प्रोग्रॅमर चालवित आणि त्यात चुंबकीय मेमरी होती आणि ते खुप महाग पण होते. पण १९७७ मध्ये APPLE अणि Radio Shack ह्यांनी होम कॉम्प्युटर सुरु केले.
  • गम्मत म्हणजे त्यात बेसिक प्रोग्रॅमची भाषा आणि रंगीत ग्राफिक्स होते व् हे सर्व विडिओ गेम खेळण्यासाठी बनवले होते. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा शिरकाव झाला अणि त्याच्या सुधारणेचा वारू चौखुर उधळू लागला.
  • जशी – जशी गरज वाढू लागली, तसा – तसा त्याचा आकार लहान – लहान होऊ लागला आणि मग त्यांना नावे पडू लागली. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन इत्यादी.

सॉफ्टवेअरचा उदय :

  • इंटीग्रेटेड सर्किट मुळे कॉम्प्युटरच्या करामती वाढल्या आणि तशी लोकांची हाव पण वाढत गेली. आधी जो कॉम्प्युटर फक्त आकडेमोडीसाठी लागत होता आता तो अल्लाउद्दीनचा दिवा म्हणून लोक अपेक्षा करू लागले.
  • ह्या मध्ये सॉफ्टवेअरच्या ऑपरेटिव्ह सिस्टम उदयास आल्या. वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग भाषा निर्माण झाल्या. चीपची मायक्रो चीप झाली. ह्या सगळ्यांची मूळ असेंब्ली लँग्वेज होती.
  • पुढचे पाऊल म्हणजे एम्बेडेड चीप. एव्हढ्याशा चीप मध्ये कपाटच काय खोली भरून ज्ञान साठवून ठेवता यायला लागले.
  • ०१०१ बायनरी सिस्टम मुळे काही पण घडू लागले. प्रोग्रामिंग भाषेच्या विकासामुळे कॉम्प्युटरचा संचार सर्वत्र झाला. कागदांवर माहिती साठविण्यापेक्षा पेन ड्राइव्ह, कॉम्प्युटर वर्ड फाईल मध्ये साठविणे सोपे पडू लागले.

कॉम्प्युटरचे जग :

  • फोन सोडून लोक मोबाइल वापरू लागले, त्यात पण कॉम्प्युटर आले. स्मार्ट फोन मध्ये बारीकशी चीप तुमच्या पर्सनल सेक्रेटरीची जागा घेऊ लागली.
  • कॉम्प्युटरमुळे ATM निर्माण होऊन बँके पुढच्या रांगा नष्ट झाल्या.
  • घरीबसल्या लोक पीसी वरून खरेदी, वाण सामान, बिले भरणे इत्यादी सर्व कामे करू लागले. पुढची पायरी म्हणजे माणसाची सर्व कामे करणारा सुपर कॉम्प्युटर!
  • त्याने अवकाशात भरारी घेऊन तो आता विश्वाचे गणित सोडवितो आहे. सोफिया नावाची रोबो तुम्हाला मुलाखत देत आहे.
  • असा हा अल्लाउद्दीनचा दिवा आणि त्यातला कॉम्प्युटर नावाचा राक्षस कुठे नेईल ते बघू.

Wikipedia Information about Computer in Marathi / Few Lines

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *