Crab Farming Information in Marathi

खेकडा शेती

खेकडा शेती हा समुद्रकिनाऱ्याजवळील लोकांचा एक प्रमुख व्यवसायपण आहे. ‘मरीन प्रोडक्ट एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ऑथोरीटी (MPEDA)’ तर्फे ‘महाराष्ट्र क्राब फार्मिंग प्रोजेक्ट’ राबविलेजात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेडुतांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या गेल्या आहेत.

 • खेकडा शेती म्हणजे ‘क्रॅब फार्मिंग’ ह्यात Scylla Serrata ह्या जातीचे खेकडे घेतले जातात कारण त्यांना देशात तसेच परदेशात खूप मागणी असते.
 • तसेच हे वजनदार असतात. त्यामुळे जास्त पैसे मिळतात. देशात कोलंबी आणि मत्स्य शेती बरोबरच आता खेकडा शेती पण महत्व मिळवत आहे.
 • सर्व किनारपट्टीची राज्ये आंध्र, कोकण, कर्नाटक, गोवा, गुजरात, ओरिसा आणि प.बंगाल हि सर्व राज्ये ह्या शेतीत गुंतली आहेत.ह्या
 • त मुख्यत: दोन रंगांचे खेकडे असतात. तपकिरी आणि हिरवे. हिरवे खेकडे 21 ते 22 से.मी. आणि वजन 2.5 कि.ग्रा. असते. तपकिरी खेकडे 12.8 से.मी आणि वजन 1.3 कि.ग्रा. असते.
 • पिंजरे किंवा गोठे करण्यापेक्षा तळे शेती जास्त फायदेशीर असते. कारण एक चौरस मीटर मध्ये 9 ते 10 च खेकडे मावतात. तळे 0.025 ते 1 हेक्टार मध्ये 1.5 मी. खोल आणि .5 मी.चे लोंबणारे कुंपण असते.
 • आत सिमेंट पाईप किंवा पोकळ बांबू ठेवलेले असतात जेणेकरून खेकडे मारामारी करतांना लपू शकतील.
 • खेकड्यांना जंतुसंसर्ग होऊ नये ह्याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी पाणी बदलून चुनखडी टाकतांना तळे स्वच्छ कोरडे कराव लागते.
 • तळ्यात क्षारता 15 ते 30 ppt, pH 7.8, तापमान 26 ते 30 डिग्री आणि ऑक्सिजन 3 ppm पेक्षा जास्त लागतो. खेकडे 9 से.मी लांब आणि 575 ग्राम चे घ्यावे आणि त्यांना शिंपले, छोटे मासे बोईल चिकन चे तुकडे खायला द्यावे.
 • वेगवेगळे ठेवावे म्हणजे एकमेकांवर हल्ला करणार नाही. 20 /21 दिवसात्ते लट्ठ होतात.
 • कवच पुरेसे टणक झाले की त्यांना स्कूप नेट नेकिंवा हाताने काळजीपूर्वक नांग्या न मोडता काढून त्या ज्यूट च्या दोरीने बांधून थर्मोकोल बॉक्स मध्ये किंवा बांबूच्या टोपल्यात पुरेश्या आर्द्रतेबरोबर ठेवावे.
 • जिवंत खेकड्यांना जास्त भाव मिळतो. एका किलोला 300 ते 600 रुपये. एका हेक्टरमध्ये 240 ते 250 किलोचे खेकडेअसतात.
 • साधारण नफा रु. 80,000 ते रु. 90,000 पये मिळतो.

Crab Farming in Marathi Language