Home » Tips Information in Marathi » Dettol Soap Information in Marathi Language | डेटॉल साबण माहिती

Dettol Soap Information in Marathi Language | डेटॉल साबण माहिती

Dettol Soap Mahiti

Dettol Soap Information in Marathi

डेटॉल साबण माहिती

भारताच्या आणि जगाच्या कोरोना वायरसच्या परिस्थिती मध्ये आपण आपले हात आणि आपले शरीर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपण कोरोना सारख्या विषाणूंचा खात्मा करून स्वतःचे रक्षण करू शकतो. त्यासाठी आपण साबणाचा वापर करत असतो. भारतामध्ये विषाणूंपासून संरक्षण करणारे साबण म्हणून डेटॉल आणि लाइफबॉय हे दोन साबण अतिशय प्रसिद्ध आहेत. भारतीय बाजारपेठेमध्ये टॉयलेट साबणाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. डेटॉल आणि लाइफबॉय हे दोन्ही साबण या क्षेत्रामध्ये भारतीयांच्या मनात आणि घरात गेल्या कित्तेक वर्षांपासून आपली जागा टिकवून आहेत.

चला तर मग आज आपण या दोन्ही साबणांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात :

Information / माहिती :

 • डेटॉल… भारतामध्ये कदाचितच असे कुणी असेल ज्यांनी डेटॉल कंपनी चे नाव ऐकलेले नाही किंवा त्यांचे कोणतेही प्रॉडक्ट वापरलेले नाही.
 • औषधी गुणधर्म असणारा म्ह्णून हा साबण अतिशय प्रसिद्ध आहे. भारतातील प्रत्येक घरामध्ये कुणाला काही घाव अथवा जखम झाल्यास ती साफ करण्यासाठी आधी डेटॉल चा वापर केला जातो.
 • म्हणून आपल्या घरांमध्ये आणि मनामध्ये या साबणाचे एक वेगळेच स्थान आहे.
 • हा साबण 100 आजार उद्भवणार्‍या जंतूपासून बचाव करतो असा या कंपनीचा दावा आहे. सर्व वयातील पुरुष, स्त्रिया किंवा लहान मुले या सर्वांसाठीच हा एक उपयुक्त साबण आहे.

Description / वर्णन :

 • पकडण्यासाठी अत्यंत सोपा, केशरी रंगाचा हा साबण आहे आणि डेटॉल कंपनीची ओळख असणारा एक सुगंध यामध्ये आहे.
 • आंघोळ केल्या नंतर किंवा हाथ धुतल्यानंतर देखील काही काळ हा सुगंध आपल्या शरीरावर दरवळत असतो म्हणून तर गर्दीत देखील आपण लगेच हे ओळखू शकतो कि कुणीतरी आसपास डेटॉल का धुला आहे.
 • डेटॉल अशी अक्षरे एका तलवारीसारख्या भासणाऱ्या आकाराच्या सोबत या साबणावर कोरलेली असतात.
 • सर्व वाईट विषाणूंचा नाश असेच जणू काही हा लोगो आपल्याला सांगत असतो.

Advertising / जाहिरात :

 • डेटॉल साबणाच्या अनेक जाहिरात आज आपण टीव्ही वर बघत असतो. यामध्ये चिखलात खेळून आलेले लहान मुले असतील किंवा बाहेरून आताच घरी आलेले वडील असतील.
 • उन्हाळ्यात गर्मीमुळे आलेला घाम असेल किंवा वारंवार साबण वापरल्यामुळे त्यावर वाढलेले किडाणू असतील अशा सर्वच आकर्षक जाहिरातींमधून डेटॉल साबणाने आपले वेगळेपण दाखवून दिलेले आहे.
 • आपल्या कुटुंबाला आजारी पडणाऱ्या किडाणूंपासून बचाव म्हंटल्यावर आपण हा साबण वापरला नाही तरच नवल.
 • आकर्षक हिरव्या रंगामध्ये या उत्पादनाचे पॅकिंग असल्यामुळे या जाहिरातींमध्ये आपण हिरव्या रंगाच्या वापराचे निरीक्षण करू शकतो.
 • डेटॉल डेटॉल हो, मा का भरोसा डेटॉल, मेरा घर डेटॉल से धुला अशा आकर्षक जिंगल नि तर त्यांच्या जाहिरातींना सर्वांपर्यंत पोहचवला आहे.
 • त्यांच्या सर्व उत्पादनांसाठी ते विविध स्लोगन्स वापरत असतात.

Different products / विविध उत्पादने :

 • सर्वच साबण कंपनी प्रमाणे डेटॉल कंपनीचे देखील अनेक उत्पादने आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत, यामध्ये साबण, सॅनिटायझर , हँडवॉश, (सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे सॅनिटायझर , हँडवॉश या उत्पादनांची बाजारामधील मागणी अतिशय वाढलेली आहे आणि त्यासाठी आपणदेखील दुकानांमध्ये वारंवार चकरा मारलेल्या आहेत काय? ) डेटॉल अँटिसेप्टिक लिक्विड अशा उत्पादनांचा समावेश आहे.
 • तसेच फक्त साबणांमध्ये सुद्धा त्यातील घटक आणि त्वचेची उपयुक्तता यानुसार काही वेगवेगळे साबण उपलब्ध आहेत.
 • जसे खास उन्हाळ्यासाठी डेटॉल कूल, डेटॉल स्किन केअर , कोरफडीचे गुणधर्म असणारा डेटॉल एलोवेरा साबण, खास स्त्रियांसाठी सुंदर त्वचा मिळवण्यासाठी तुळशीचे गुणधर्म असणारा डेटॉल, सुंदर त्वचा आणि सुगंधासाठी डेटॉल जॅस्मिन बार, आणि आपल्या सर्वांचा परिचयाचा डेटॉल ओरिजिनल सोप इत्यादी.

Market value / बाजारातील मूल्य :

 • रेकीट बेनकिसेर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या अंतर्गत डेटॉल हा ब्रँड काम करत असतो, भारतातील स्वच्छतेच्या क्षेत्रातील एक नामांकित आणि विश्वसनीय ब्रँड असे या ब्रँडचे नावलौकिक आहे.
 • असे असले तरीदेखील आजपर्यंत लाइफबॉय या ब्रॅण्डच्या साबणाला डेटॉल चा साबण आजपर्यंत हरवू शकलेला नाही.

Information of Dettol Soap in Marathi / Dettol Soap Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *