Home » Tips Information in Marathi » Guitar Information in Marathi, Musical Instrument Guitar Essay

Guitar Information in Marathi, Musical Instrument Guitar Essay

information about guitar in marathi

Guitar Information in Marathi

Musical Instruments Info – गिटार माहिती

 • गिटार हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रसिद्ध वाद्य आहे, पहिल्या क्रमांकाचे वाद्य पियानो आहे.
 • गिटार हा शब्द स्पॅनिश वाद्य ‘गिटारा’ पासून आला आहे. आधुनिक गिटारची रचना स्पॅनिश गिटारीस्ट अँटोनियो टोरेस ज्युराडोने केली आहे.
 • गिटार हे एक प्रकारचे तंतुवाद्य आहे. गिटारच्या मुख्य भागात एक सुबक आकाराचा मध्यभागी मोठा छेद असलेला पोकळ खोका असतो. त्याला एक लांब मान असते व त्यावर सहा किंवा त्याहून अधिक अठरापर्यंत तारा असतात.
 • मानेवर आडव्या तारा असतात ज्याला फ्रेट्स म्हणतात. फ्रेट्स वर तारांना दाबतात ज्यामुळे गिटारचा आवाज बदलतो आणि वेगवेगळे स्वर निर्माण करता येतात.
 • गिटार मुख्यतः वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडापासून बनविली जाते परंतु काही गिटार प्लास्टिकच्या सुद्धा असतात.
 • गिटारच्या तारा पूर्वी प्राण्यांच्या आतड्यापासून बनविल्या जात परंतु आता मात्र पोलादी किंवा नायलॉनच्या तारा वापरल्या जातात.
 • गिटार दोन प्रकारचे असतात, अकॉस्टीक आणि इलेक्ट्रिक. अकॉस्टीक गिटारमध्ये आवाज लाकडाच्या पोकळीमुळे मोठा होतो तर इलेक्ट्रिक गिटारमध्ये अॅम्पलीफायर आणि स्पीकरच्या सहाय्याने मोठा केला जातो.
 • अकॉस्टीक आणि इलेक्ट्रिक शिवाय मिक्स्ड, आर्च टॉप, स्टील, फ्लॅमेन्को, रेजोनेटर आणि डबल नेक्ड हे सुद्धा गिटारचे काही प्रकार आहेत.
 • गिटार स्पेनमध्ये सर्वप्रथम १४ व्या शतकात वाजविली गेली आणि सर्वात पहिले गिटार संगीत १५४६ मध्ये प्रकाशित झाले होते.
 • गिटार तीन – चार हजार वर्षापूर्वी पासून अस्तित्वात असली तरी एकोणिसाव्या शतकापर्यंत त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. प्राचीन काळात गिटारे, चिटारा, किथारा, सितार, गीटरा, गिटारा हे गिटारचे विविध प्रकार अस्तित्वात होते.
 • सर्वात पहिली इलेक्ट्रिक गिटार १९३१मध्ये बनविली गेली जी धातूपासून बनली होती. सर्वात पहिली लाकडाची इलेक्ट्रिक गिटार १९५०मध्ये बनविली गेली.
 • सर्वात प्राचीन गिटार प्राचीन रोम मधील चिटारा हे वाद्य आहे. ३५०० वर्षापूर्वी पर्शिया (इराण) मधील तंबूर हे वाद्य गिटारचे पूर्वरूप आहे.
 • गिटार मध्ये मुख्यतः चार, सहा किंवा बारा तारा असतात पण काही दुर्मिळ गिटारमध्ये सात, आठ, नऊ किंवा दहा ताराही असतात.
 • जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक गिटार १३.२६ मीटर लांब आहे आणि तिचे वजन १०२३ किलोग्रॅम आहे. ह्या गिटारचे निर्माण २००१मध्ये झाले होते.
 • जगातील सर्वात छोटी गिटार १० मायक्रॅान लांबीची आहे आणि हि वाजविण्यासाठी खास मायक्रोस्कोपीक साधने लागतात.
 • सर्वात महागडी गिटार एरिक क्लॅपटोनची “ब्लॅकी” हि गिटार आहे जी २००४मध्ये ९५९५०० डॉलर्सना विकली गेली.
 • गिब्सन, डीन, पीआरएस, इबानेज, जॅकसन, फेंडर, मार्टिन, ग्रेश हे काही गिटारचे प्रसिद्ध उत्पादक आहेत.

Information about Guitar in Marathi – Wikipedia Language

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *