gateway of india Mumbai mahiti essays

Gateway of India Information in Marathi | गेटवे ऑफ इंडिया, मुंबई(माहिती)

Gateway of India Information in Marathi

गेटवे ऑफ इंडिया माहिती

मुंबईच्या कुलाबा क्षेत्रामध्ये समुद्राजवळ भारतात प्रवेश करण्यासाठी एक सुंदर कमानदार इमारत उभी आहे. तिचे नाव गेट वे ऑफ इंडिया. समुद्राच्या खळाळत्या पाण्याला तोंड देत १९२४ पासून ही इमारत मुंबई आणि भारताची भूषण आणि पर्यटकांचे आकर्षण बनलेले आहे. या इमारतीने १९२४ मध्ये किंग जॉर्ज आणि राणी मेरी यांचे स्वागत केले. याच इमारतीने २८/२/१९४८ ला ब्रिटीश साम्राज्याची शेवटची तुकडी येथून रवाना होताना पाहिली. याच इमारती समोर २५ ऑगस्ट २००३ ला टॅक्सी मध्ये बॉम्ब फुटून मनुष्य हानी झाली आणि याच इमारतीने २६/११ चा मुंबईवर झालेला हल्ला पाहिला.

इतिहास :

  • किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या स्वागतासाठी अपोलो बंदर येथे जॉर्ज विटेट याने ३१ मार्च १९११ ला सुरु केले. हि कमान बेसाल्टची असून २६ मीटर व्यासाची आहे. याच अपोलो बंदर या स्थानावरून व्हॉइसरॉय जनरल भारतात येत होते. या कमानीचा डोम ४८ फुट व्यासाचा आहे. तो बनवण्यासाठी ग्वालियर मधून बेसाल्टचे दगड आणले होते. कमानीच्या बाजूला ५०० माणसे बसतील एवढ्या खोल्या आहेत. त्यावेळची संपूर्ण बांधण्याची किंमत २ दश लक्ष रुपये होती.
  • या गेटवेच्या समोर हॉटेल ताज आहे, बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि विवेकानंद यांचे पुतळे आहेत. येथे पाच जेट्टी आहेत. एक ऍटोमिक रिसर्च सेंटरला दिली आहे. दुसरी आणि तिसरी गेटवे पासून एलिफन्टा(घारापुरी) लेण्यांना जाणाऱ्या फेरी बोटींना दिली आहे. चौथी बंद आहे, आणि पाचवी रॉयल बॉम्बे यॉट क्लबला दिलेली आहे. इथून एलिफन्टा केव्हजला फेरी बोटने जाता येते. समुद्रात वसलेल्या या बेटावर सुंदर लेणी आहेत. तेथे पोहोचायला गेटवे पासून ४५ मिनिटे लागतात.
  • गेटवेला खूप मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. पावसाळ्यात इथे उसळणारा समुद्र बघताना मजा वाटते. पण भिंतीच्या जवळचे पाणी अत्यंत खोल असल्यामुळे दर पावसाळ्यात येथे पर्यटक बुडतात. कुतुब मिनार काय किंवा गेटवे काय, आपल्या देशाचे वास्तु शिल्पाचे उत्तम स्मारके आहेत.

Gateway of India History in Marathi Language / Wikipedia

Essay on Gateway of India Mahiti

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *