Skip to content
Home » Tips Information in Marathi » Godambi Information in Marathi | गोडंबी माहिती

Godambi Information in Marathi | गोडंबी माहिती

Godambi Marathi Mahiti

Godambi Information in Marathi

Godambi / गोडंबी माहिती

Information and Uses of Godambi / गोडंबीची माहिती आणि उपयोग :

  • अग माझी गोडंबी.. तू किती गोड आहेस…असा एखाद्या आजीला आपल्या नातीला म्हणताना तुम्ही बघितले आहे का ?
  • मग ती गोडंबी म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे का ? जर नसेल माहित तर आज मी तुम्हाला गोडंबी बद्दल काही आश्चर्यकारक माहिती सांगणार आहे बरे का.. याचे गुणधर्म ऐकून तर तुम्ही एकदम चकित व्हाल.
  • आपल्या शरीरावर गोडंबीचे अनेक चांगले फायदे होतात. सुका मेवा या सर्वात पौष्टिक असणाऱ्या पदार्थांमध्ये याला महत्वाचे स्थान आहे. भारतात जवळजवळ सर्वच प्रांतात याचा आहारात उपयोग होतो.
  • हे एक अत्यंत आश्चर्यकारच बी आहे. याच्या जीवनाचा प्रवासदेखील अतिशय मस्त आहे. कधी कधी वाटते धान्य ते आपले पूर्वज ज्यांनी अशा पौष्टिक फळांचा आणि बियांचा शोध आपल्या आरोग्यासाठी लावला.

What is Godambi / गोडंबी म्हणजे काय ? :

  • भारतात सर्वत्रच बिब्बा नावाचा वृक्ष आढळतो, या झाडाला येणारे एक औषधी फळ म्हणजे बिब्ब्याचे फळ किंवा बिब्बा.बिब्बा हा भिवा, बिबवा या नावाने देखील प्रसिद्ध आहे अशा या बिब्ब्याचे बी म्हणजेच गोडंबी.
  • भट्टी लावून बिब्ब्याचे फळ भाजून यातून ही गोडंबी काढली जाते. सुरवातीला हे पांढऱ्या रंगाची बी असते आणि सुकवल्या नंतर ही काळपट रंगाची होते.
  • बिब्बा फळाचे अनेक औषधी उपयोग आहेत. जुन्या काळी तर प्रत्येक औषधामध्ये बिब्ब्याचे फळ असायलाच हवे असा अत्यंत आग्रह असायचा. याचे तेल देखील अत्यंत जालीम आहे.
  • तसेच याच्या तेलाचा कीटकनाशक म्हणून देखील उपयोग केला जातो. या झाडावर लाखेचे किडे अत्यंत छान वाढतात.
  • तसेच वॉटरप्रूफिंगच्या कामात याचा वापर होतो. या झाडाचे काडीपेटी बनवण्यासाठी उपयोग केला जातो. फळ्या आणि इतर वस्तूंसाठी देखील याचा उपयोग होतो.
  • परंतु हे झाड कप्तान त्यातून एक विषारी द्रव्य बाहेर येते जे माणसांसाठी हानिकारक असते. तसेच बिब्याच्या तेलाचा उपयोग वंगण म्हणून बैलगाडीत देखील केला जातो.
  • साधारणपणे कोकणात बिब्ब्याच्या फळाचा औषधी उपाय पण मोठ्या प्रमाणावर आहे. याचे औषधी तेल देखील बनवले जाते जे वापरल्यास अत्यंत जळजळ होते परंतु हे अतिशय उपयुक्त आहे. रंगरंगोटीच्या कामात देखील याचा मोठा उपयोग आहे.

How to remove Godambi / गोडंबी काढायची पद्धत :

  • गोडंबी काढण्याची पद्धत साधारणपणे काजू सारखीच असते.
  • काळ्या बिब्ब्यापासून गोडंबी अलग करण्याचे काम मुख्यत्वे आदिवासी भागात अधिक होते. वन्य भागात आणि जंगलात हि झाडे अधिक प्रमाणात आढळतात. बिब्ब्याची साल फोडून गोडंबी काढली जाते.
  • बिब्ब्याचे तेल अत्यंत जहाल असते तरीदेखील आदीवासी महिला अत्यंत जिकरीचे हे काम करतात. बिब्ब्याचे तेल त्वचेला इजा करू शकते त्वचेशी संपर्क आल्यास त्याजागी त्वचा काळवंडते आणि आग देखील होऊ शकते. साधारणपणे १० किलो बिब्बा फोडल्यावर १ किलो गोडंबी मिळते.
  • बिब्बा फोडण्याच्या कामातून रोजगार निर्मिती झाली आहे. यासाठी महिलांना प्रशिक्षण देखील देण्यात येते, बिब्ब्याच्या तेलाने त्वचेला हानी होऊ नये, जखमा होऊ नयेत म्हणून हॅन्डग्लोस चा वापर हल्ली केला जातो.
  • मध्यप्रदेश, ओडिसा आणि हरियाणा येथून मोठ्या प्रमाणात बिब्ब्याची महाराष्ट्रात आयात होते. अकोला जिल्ह्यात गोडंबीची मोठ्या प्रमाणात विक्री होते.
  • हिवाळ्यामध्ये गोडंबीला मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती बऱ्याचदा उद्भवते त्यामुळे अनेक व्यापारी वर्षभर गोडंबी साठवून देखील ठेवतात. बंद डब्यांचा किंवा ड्रमचा यासाठी वापर केला जातो.
  • हिवाळ्यातल्या मागणीमुळे गोडंबीची किंमत सव्वा ते दीड पटीने अधिक वाढते. गोडंबी हा बिब्ब्याचा गाभा आहे आणि अत्यंत महत्वाचा भाग आहे म्हणून याची किंमत देखील अधिक आहे.
  • कृषी विभागाच्या पुढाकाराने गोडंबीच्या उत्पादनात आणि विक्रीत मोठी मदत होते. तसेच सरकारने गोदामांची देखील सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. बिब्ब्यापासून गोडंबी अलग करण्याचे काम अत्यंत जोखमीचं असल्यामुळे यासाठी आता तंत्रज्ञान विकसित करायची गरज आहे.

Benefits of Godambi / गोडंबीचे उपयोग:

  • गोडंबी हा एक सुकामेव्याचा प्रकार आहे. सुकामेव्यात याचे स्थान बदामाच्या बरोबरीने आहे. मुख्यत्वे हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या अनेक पौष्टिक लाडू मध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर गेला जातो.
  • म्हणूनच हिवाळ्यात याला भरपूर मागणी असते. लाडूसाठी तसेच नुसते खाण्यासाठी यांचा मोठा वापर होतो. तसेच काही भाज्यांमध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी, काही पेयांमध्ये पौष्टिकता वाढवण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. गोडंबी मध्ये बदामाच्या बरोबरीने पोषणमुळे असतात.
  • खारीक, सुके खोबरे, काजू, बदाम यांच्या मिश्रणाने बनवल्या जाणाऱ्या लाडूमध्ये देखील गोडंबीचे काप किंवा पावडर मिसळली जाते. अनेक गोड पदार्थांमध्ये सुकामेवा म्हणून गोडंबीला आहारात स्थान आहे. याच्या वड्या देखील अतिशय चविष्ट असतात.
  • गोडंबी हि उष्णतावर्धक समजली जाते त्यामुळे याचे अति सेवन टाळावे. पुरुषांमध्ये वीर्य वर्धनाचे काम गोडंबी अतिशय उत्तम प्रकारे करते.मेंदूमधील आणि शरीरातील ताकद वाढवण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बिब्ब्याचा नियमित वापर करावा.
  • उष्णतावर्धक असल्यामुळे शक्यतो याचा उपयोग थंडीमध्ये करावा किंवा थंड वातावरणात करावा. शक्यतो रात्री किंवा उपाशीपोटी करावा. ज्या प्रमाणे आपण थंडीमध्ये बदाम भिजवून उपाशीपोटी त्याचे सेवन करतो त्याच प्रमाणे गोडंबीचे देखील आहे.
  • रोज पहाटे ३ ते ५ गोडंबी व्यवस्थित चावून खाऊन त्यासोबत गाईच्या दुधाचे सेवन करावे. यामुळे शरीरातील कमजोरी, अशक्तपणा दूर होतो..
  • हृदयरोग, रक्तदाब, श्वसन, कर्करोग आणि मेंदू संबंधित आजारांवर गोडंबी गुणकारी ठरू शकते असे एका अभ्यासातून समोर आले आहे. म्हणूनच गोडंबीचे नियमित सेवन करावे.

Recipes of Godambi / गोडंबी सेवनाचे पथ्य

  • प्रत्येक पदार्थाच्या सेवनाचे काही नियम असतात, कारण काही पदार्थांचे गुणधर्म एकमेकांपेक्षा विभिन्न असतात आणि त्यांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला अपाय होऊ शकतो.
  • तसेच गोडंबीचे देखील आहे म्हणून गोडंबीचे सेवनाचे उपाय करण्यापूर्वी काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. म्हणजे सेवन सुरु करण्याच्या ८ दिवस आधी पासून अति तिखट, आंबट, तुरट, मसालेदार पदार्थांचे सेवन करणे टाळावे. लघवीचा अति त्रास असणाऱ्यांनी शक्यतो हा उपाय करणे टाळावे.
  • तसेच हा उपाय करताना पापड, लोणचे, दही, आंबवलेले पदार्थ, पाव अशा पदार्थांचे सेवन टाळावे. गोडंबीच्या अति सेवनाने उष्णता वाढू शकते, अशातच जर पुरळ किंवा फोड उठले तर कोथिंबिरीच्या पानाच्या रसाचे सेवन करावे.
  • हे झाले घरगुती उपचार परंतु जर त्रास अधिक असेल तर तज्ज्ञांचा सल्ला देणे आवश्यक आहे.

Godambi Benefits in Marathi Language / Essay Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *