Home » Tips Information in Marathi » Lux Soap Information in Marathi | लक्स साबण माहिती

Lux Soap Information in Marathi | लक्स साबण माहिती

Lux Soap Mahiti

Lux Soap Information in Marathi

लक्स साबण माहिती

“मेहेकती त्वचा का राज….. लक्स…”

सर्वात सुंदर आणि बॉलीवूड मधील जवळपास सर्वच सिनेतारकानी “लक्स” साबण या उत्पादनासाठी जाहिरात केलेली आहे. आज भारतात कदाचितच कुणी असे असेल ज्याने एकदा सुद्धा या साबणाचा वापर केलेला नाही.

लक्स हे ब्रँड नावच एवढे मोठे आहे कि प्रत्येकालाच त्याच्या बद्दल एक प्रकारचे आकर्षण असते आणि आपणही सुंदर दिसावे या इच्छेने भारतातील कित्तीतरी लोक हा साबण वापरत असतात.

वर्णन :

  • हिंदुस्थान युनी लिव्हर (HUL) या कंपनी चे लक्स हे उत्पादन आहे. विविध घटकांवर आधारित असे यांचे साबणाचे अनेक प्रकार आज बाजारामध्ये बघावयास मिळतात. सुंदर असे गुलाबाचे फुल आणि त्याखाली LUX अशी
  • अक्षरे कोरलेली असा या उत्पादनाचा लोगो आणि मेहकती त्वचा का राज अशी यांची टॅग लाईन आहे. आकर्षक रंग, साबणावर केलेले कोरीव काम, सहज पकड मिळेल असा याचा आकार हे सर्व आपल्या रोजच्याच अंघोळीला एक वेगळाच अनुभव देऊन जाते.

जाहिरात :

  • दीपिका पदुकोण, आलिया भट, करीना कपूर, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, शर्मिला टागोर अशा सर्वच काळातील अगदी प्रसिद्ध आणि नावाजलेल्या सुंदर अभिनेत्रींनी या उत्पादनाची जाहिरात केलेली आहे.
  • फक्त अभिनेत्रीच नव्हे तर शाहरुख खान, अभिषेक बच्चन यासारख्या अभिनेत्यांनी देखील या उत्पादनांच्या जाहिरात केलेली आहे. बॉलीवूड मधील जवळपास सर्वच वयाच्या अभिनेत्रींनद्वारे हे दाखवण्यात आले आहे कि सर्वच वयातील स्त्रियांसाठी हा उत्तम साबण आहे.
  • सर्वात ग्लॅमरस साबण असा आपण या साबणाला म्हणू शकतो. गुलाब पाकळ्यांनी स्नान केल्याची अनुभूती दर्शवणाऱ्या अनेक जाहिराती आपण बघत असतो. तरुण तेजस्वी त्वचा दाखवणाऱ्या सुंदऱ्यांकडून आपल्याला देखील हा साबण करावा असे नाही वाटले तरच नवल.

विविध उत्पादने :

  • लक्स वेल्वेट टच, लक्स हैपोटॉनिक रोझ, लक्स क्रीमि पर्फेक्शन सोप, लक्स इंटरनॅशनल सोप, लक्स फ्रेश स्प्लॅश, लक्स चार्मिंग मोग्नोलिआ, लक्स सॅफरॉन ग्लो अशा एक ना अनेक प्रकारांमध्ये लक्स चे साबण बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आपल्या स्किनच्या प्रकारानुसार आणि हव्या असणाऱ्या परिणामानुसार आपण आपल्याला उपयुक्त अशा साबणाची निवड करू शकतो.
  • विविध फुलांचे सुगंध, स्किन चे प्रकार, मिंट अशा निरनिराळ्या प्रकारांमध्ये या साबणाचे वर्गीकरण केले गेले आहे. साबणामधील साहित्यावरून त्याचे प्रकार ठरवले गेले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना अनेक प्रकारे त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यात मदत होईल आणि प्रत्येकाला हव्या असणाऱ्या गुणांचा साबण हा लक्स च्या उत्पादनांमध्येच मिळेल.

बाजारातील मूल्य :

  • २०१९ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार लक्स हा भारतीय बाजारपेठेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला साबण आहे. बाजारातील याचा वाटा हा १२.५% एवढा असून सुद्धा लाइफ बॉय आणि संतूर नंतर याचा क्रमांक येतो.
  • परंतु असे असले तरी देखील भारतीयांच्या मनामध्ये असलेली या साबणाबद्दलची उत्सुकता किंवा आकर्षण अजिबातच कमी झालेले नाहीये. राष्ट्रीय स्तरावर लक्स साबणाचा वाटा हा ६०% इतका अधिक आहे. भारतातील जवळपास सर्वच प्रदेशामध्ये हा साबण प्रसिद्ध आहे.

Information of Lux Soaps in Marathi / Lux Saban Mahiti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *