Skip to content
Home » Tips Information in Marathi » Monarch Butterfly Information in Marathi Language |Essay| मोनार्च बटरफ्लाय

Monarch Butterfly Information in Marathi Language |Essay| मोनार्च बटरफ्लाय

Monarch butterfly marathi

Monarch Butterfly Information in Marathi

मोनार्च बटरफ्लाय – एक राजा फुलपाखरू

नारिंगी रंगाचा कोट आणि त्यावर काळे पट्टे आणि रेशमी साडीसारखी किनारीला पांढऱ्या ठिपक्यांची रांगोळी असे चित्रविचित्र अंगरखा घातलील हे फुलपाखरू म्हणजे निसर्गाच्या कलाकारीची कमाल आहे. अनेक प्राणीप्रेमी आणि फुलपाखरांवर शोध करणाऱ्यांच्या हा आवडता प्राणी आहे.रस्त्याने जातांना हे फुलपाखरू आडवे आले तर तुम्हाला संकेत आहे की तुमच्या आयुष्यात कांहीतरी घडणार आहे. हे फुलपाखरू तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आनंद आणि भाग्याचे प्रतिक आहे. एव्हडेच नाही तर हे फुलपाखरू निसर्गाशी आणि पर्यावरणाशी संगती घेऊन परागीभवनातून हिरवाई वाढण्यास मदत करते. तसेच जास्तीचे गवत खाते आणि ह्याचा बरेच इतर प्राणी खाद्य म्हणून उपयोग करून पर्यावरणाचा समतोल राखतात.

मोनार्च फुलपाखरू हे प्राणी किंगडम मधील संधिपाद फायलम मधील इंसेक्टा क्लास ऑर्डर लेपिडोतेरा जीनस दानौस आणि डी. प्लेक्षिप्पस ह्या जातीत मोडते.ह्याचे मोनार्च हे नाव राजा विल्ल्यम -3 ह्याच्या स्मरणार्थ दिलेले आहे. आणि तसेच दानौस हि सर्व नवे ग्रीक दंतकथांवरून घेतलेली आहेत.मोनार्च फुलपाखराला निम्फाल्डी, मिल्कविड, कॉमन टायगर आणि वॉंनडरर अशी पण नावे आहेत.ह्यांचे पंख 8 ते 10 सें.मी लांब असतात.ह्यांचे विशेष म्हणजे वसंत ऋतूत हि फुलपाखरे अमेरिका आणि कॅनडामधून हजारो मैल, फ्लोरिडा आणि मेक्सिकोला स्थलांतर करतात.ह्यांना प्रथम 1758 मध्ये पहिले गेले. हे फुलपाखरू मुख्यत्वे दक्षिण अमेरिका, कॅनडा हवाई बेटे, क्युबा, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्पेन, पासिफिक आयलंड आणि उत्तर आफ्रिका येथे असतात. हि बासवूड, एल्म्स, सुमाक्स, लोकस्त, ओक, ओसाज ऑरेंज, मलबेरी, पिकॅन, विलो, कॉटनवूड, आणि मेस्क़ुति ह्या झाडांवर आढळतात.तसेच कधी गवताळ प्रदेशात शेतात, बंगल्यांतील बागेमध्ये अळ्याना खाण्यास मिळावे म्हणून आणि अंडी घालण्यास सोयीस्कर व्हावे म्हणून आढळतात.

ह्यांच्यापण जीवनचक्रात चार पायऱ्या असतात.हि फुलपाखरे फक्त 2 ते 6 आठवडे जगतात. अंडी, आळी, कोश आणि फुलपाखरू. मादीच्या वजनाप्रमाणे अंड्यांची संख्या बदलते.टी 290 ते 1180 इतकी असते. वर्षातून खूपवेळा पण अंडी देऊ शकते. नराकडून मादीच्या शरीरात स्पर्मातोफोअर सोडले जाते त्यातील स्पर्म अंडे फलित करतात. मादी मिल्कविदच्या कोवळ्या पानांवर एकेका पानावर एकेक अंडे सोडते.अंडे क्रीम किंवा फिकट हिरव्या रंगाचे असते आणि वर टोक असते. 3/4 दिवसात आळी बाहेर पडते. आलीच कोश होईपर्यंत पाच अवस्था असतात. त्यात आळीची लांबी व वजन वाढते आणि प्रत्येक अवस्थेत टी कात टाकते. मग अंगावर पांढरे, पिवळे आणि काळे पट्टे वाढू लागतात.आळी 0.5मी.मी पासून 2.5 सें.मी इतकी होते व वजन 2000 पट वाढते इतकी ती आळी खादाड असते. नंतर पाय दिसू लागतात.त्यानंतर ती पानाला “J” ह्या आकारात लटकते आणि कोश तयार करते. कोश निळसर असतात. कोशात तिचा फुलपाखरात रुपांतर होण्याची प्रक्रिया होते. कोश पारदर्शक असल्याने हे दिसू शकते. 8ते 15 दिवसात कोश परिप्क्क़्व होतात आणि फुलपाखरु बाहेर पडते. प्रथम ते पंख वळवते तोपर्यंत ते पानाला उलटे लटकते. आणि नंतर उडते. फुलपाखरू हिवाळ्यात 4 ते 5 दिवसात वयात येते. पण अंडी ते फुलपाखरू हा प्रवास 7 आठवडे चालतो. इतकी असंख्य अंडी घातली आणि आळ्या ना दर्प येत असला तरी भक्षक प्राणी आणि स्थलांतरात येणाऱ्या अडचणींमुळे फक्त 10% अंडी पूर्ण फुलपाखरात रुपांतरीत होतात.

ह्या फुलापाखारांबद्दल कांही मनोरंजक माहिती:-मोनार्चला अल्ट्रा व्हायोलेट रेंज पाहता येते.

त्यांची दृष्टी मोझाक असते.म्हणजे त्यांना वस्तू तुकड्या तुकड्यात दिसते.आणि स्पेशल रेटीनामुळे तो ते संकलित करून वस्तू पाहतो.

ह्याच्या पंखांवर विष असते त्यामुळे भक्षक कार्डियाक ग्लुकोसाईडने मरतात.

अमेरिकेतील अलाबामा, इडोहो, इलिओनिस, मिनीसोता, टेक्सास, व्हरमोंट, आणि वेस्ट व्हर्जिनिया या राज्यांनी त्याला राज्याचा कीटक म्हणून मान्यता दिलेली आहे.

कॅनडाने त्याला स्पेसीज ऑफ स्पेशल कन्सर्न असा किताब दिलेला आहे कारण त्यांची संख्या भयंकर कमी होऊ लागली आहे. आता ह्यांची खास पैदास करून मेलेल्या फुलपाखरांचे साठवण शिट करून शाळांमध्ये शिकविण्यास उपयोग करतात.

Information of Monarch Butterfly in Marathi / Monarch Butterfly Mahiti Wikipedia

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *