MS Dhoni Information in Marathi

महिंद्रसंग धोनी मराठी माहिती

महिंद्रसंग धोनी – कॅप्टन कूल :

 • महिंद्रसंग धोनी उर्फ माही हा भारतीय क्रिकेट मधील सर्वात जास्त यशस्वी कॅप्टन ठरला होता. त्याचे मैदानावरचे थंड डावपेच प्रतिस्पर्धी टीमला हैराण करीत असे.
 • रांचीसारख्या शहरातून प्रचंड मेहनतीने बी सीसीआय च्या गळ्यातला ताईत बने पर्यंतचा त्याचा प्रवास म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती चे उदाहरण आहे. मैदानावर आक्रमक खेळणारा धोनी ह्याला थंड डोक्याचा कॅप्टन असे नाव का पडले हे जाणून घेऊया.

लाडका माही :

 • धोनी मूळचे रजपूत, उत्तराखंडचे आहेत पण बाबा MACON मध्ये नोकरीसाठी रांचीला स्थायिक झाले.
 • माहीचा जन्म रांचीला ७ जुलै १९८१ ला झाला. माहीला एक भाऊ नरेंद्रसिंग आणि एक बहीण जयंती गुप्ता. लहानपणा पासून माही सगळ्यांचा लाडका होता. धोनी कुटुंब मध्यमवर्गीय आणि संस्कारी. घरात वडिलांची कडक शिस्त होती. मुलांनी नीट अभ्यास करावा, पास व्हावे आणि नोकरी करावी अशी माफक अपेक्षा होती. पण आई च्या मते माही वेगळा मुलगा होता. त्याला खेळांची खूप आवड होती. त्याचा पण सचिन हा आदर्श होता. सचिन आणि अॅडम गिलख्रिस्त ह्यांच्या सारखे त्याला विश्व विख्यात व्हायचे होते.
 • DAV जवाहर विद्या मंदिर येथे त्याचे दहावी पर्यन्त शिक्षण झाले. शाळेत तो बॅडमिंटन आणि फूटबॉल खेळत होता. शाळेतर्फे जिल्हा स्तरावर फूटबॉल सामन्यात तो उत्कृष्ट गोलकीपर म्हणून कामगिरी करायचा. सिनेमाचे वेड नसले तरी त्याला अभिषेक बच्चन आणि लता मंगेशकर आवडतात.

क्रिकेटकडे वळला :

 • आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या बळावर त्याला इंडियन क्रिकेट टिम मध्ये स्थान मिळाले. २००३ मध्ये तो इंडिया A टिम बरोबर जिम्ब्वाबे आणि केनया च्या दोर्‍यावर गेला. धोनीने सर्व सामन्यात २२३ रन्स केल्या त्याची सरासरी ७०.४ पडली.
 • सौरव गांगुली आणि रवी शास्त्री ह्यांनी त्याचे गुण हेरले. फूटबॉल मुळे तो उत्कृष्ट गोलकीपर च उत्कृष्ट विकेटकीपर झाला. आणि दिनेश कार्तिक नंतर त्याचे संघात स्थान निश्चित झाले. BCCI ने त्याला B ग्रेड चे स्थान दिले. २००४/५ मध्ये त्याने बांगला देश आणि श्रीलंका ह्यांच्याबरोबर आपल्या खेळाचे खूप चांगले प्रदर्शन केले. ICC रॅंक मध्ये त्याला रिकी पोंटिंग च्या पुढे स्थान मिळाले.

अभिमान आणि सन्मान :

 • २००७ मध्ये त्याला लिमिटेड ओव्हर च्या टिमचा कॅप्टन केले गेले. टी २० मध्ये त्याने ICC वर्ल्ड कप जिंकून आणला. त्याला ग्रेटेस्ट फिनिशर ऑफ द गेम हा किताब मिळाला. नंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली.
 • २००७ ते २०१० तो लिमिटेड ओव्हर चा कॅप्टन होता. लगेचच त्याला राहुल द्रविड नंतर टेस्ट क्रिकेट चा कॅप्टन केला गेला आणि ही धुरा त्याने यशस्वी रित्या पूर्णा केली. त्याच्या कारकि‍र्दीमध्ये लागोपाठ 3 वर्ल्ड ट्रॉफी त्याने भारताला जिंकून दिल्या. त्या म्हणजे २००७ ICC वर्ल्ड कप, २०११ मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप आणि २०१३ मध्ये ICC चॅम्पियन ट्रॉफी. आपली कारकि‍र्दीत तीन वर्ल्ड कप मिळवणारा तो एकमात्र कॅप्टन ठरला. त्यामध्ये त्याचे डावपेच आणि थंड डोक्याने घेतलेले निर्णय कामी आले. त्याच्या कप्टनसी मध्ये ४० वर्षात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश दिला गेला. म्हणून लोक त्याला कॅप्टन कूल म्हणू लागले.
 • २०११ चा २३ वर्षांनंतर वर्ल्ड कप त्याने जिंकून दिला त्या वेळी सगळ्या भारताने जल्लोष करीत त्याला डोक्यावर घेतले. त्यात त्याने श्रीलंके विरुद्ध भारताची माळींगा मुळे पडझड झाली असताना ७९ बॉल मध्ये ९१ धावा करून नोट आऊट राहून शेवटचा षटकार मारून विजयश्री खेचून आणली. त्याला मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळाला. विकेटकीपिंग मध्ये त्याचा हात धरणारा कोणी नाही. त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे हायेस्ट स्टंपिंग मध्ये. आणि त्याचा आदर्श गिलख्रिस्त इतक्याच विकेट त्याने पण घेतल्या.

त्याचे विश्व :

 • धोनी खाजगी आयुष्यात अतिशय हौशी आणि आनंदी आहे. त्याचे त्याच्या बाळ मैत्रिणीशी साक्षी रावत हिच्याबरोबर प्रेमविवाह झाला आहे आणि त्यांना एक गोड मुलगी आहे. साक्षी NGO चालवते.
 • धोनीला बाइक च आणि गाड्यांचा खूप शौक आहे. त्याच्याकडे २३ बाइक आहेत ज्यात क्लासिक, सुपर बाइक एग्झोटीक अशा बाइक आहेत. कावासाकी निंजा आणि “Norton vintage confederate X १३२” ह्या जगत फक्त १५० बाइक आहेत ती पण आहे. त्याच्याकडे ८ च्या वर गाड्या आहेत.
 • २०१६ मध्ये त्याच्या जीवनावर आधारितM S DHONI The Untold Story हा सिनेमा काढला आहे.
 • त्याच्या सहकाऱ्यांचे त्याच्याबद्दल अतिशय चांगले मत आहे. तेंडुलकर आणि गांगुली ह्यांनी त्याच्या फलंदाजीची खूप स्तुति केली आहे. सुरेश रेना म्हणतो, धोनी रागवतो तो कूल नाही पण कॅमेरा नसेल तेंव्हा.
 • असा हा धोनी आता २०१९च्या वर्ल्ड कप मिळवून आणेल काय? नक्कीच आशा करूया.

मान सन्मान :

 • २००८/२००९ मध्ये ICC ODI प्लेयर ऑफ द इयर.
 • २००७ राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड.
 • २००९ पद्मश्री
 • २०११ इंडियन टेरिटोरियल आर्मी तर्फे. ले. कर्नल हा मान.
 • टाइम्स मागेझिन तर्फे वन ऑफ द मोस्ट इन्फ्लुएंशनल पिपल इन द वर्ल्ड चे मांनाकान.
 • आयपीएल मध्ये सर्वात जास्त बोली लागलेला खेळाडू.
 • फोरबसच्या श्रीमंत खेळाडू मध्ये नामांकन
 • चेन्नई सुपर किंग तर्फे आयपीएल खेळला आता पुणे रायजिंग तरफे कप्तान.
 • को-ओनर रांची हॉकी क्लब,चेंनियन एफ. सी. अभिषेक बच्चन आणि विटा दानी बरोबर भागीदारी.
 • माही रेसिंग टिम, नागार्जुन बरोबर सुपर स्पोर्ट्स टिम, २० एंडोर्स्मेंट ,२१Man Of the Match.
 • स्वत: चे फूटवेयर च ब्रॅंड आणि त्याचा राजदूत. इंडियन सीमेंट कंपनी व्ही. पी.
 • २०१४ मध्ये वन डे आणि टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ति.

Mahendra Singh Dhoni Biography in Marathi Language / Story Wikipedia

MS Dhoni Biodata Mahiti