Skip to content
Home » Tips Information in Marathi » Pratapgad Fort Information in Marathi, प्रतापगड Killa Essay

Pratapgad Fort Information in Marathi, प्रतापगड Killa Essay

Pratapgad Fort Information in Marathi

प्रतापगड माहिती

 • महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे प्रतापगड. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देणारा हा किल्ला फारच रमणीय आहे.
 • नीरा आणि कोयनेच्या नदीच्या परिसरात मराठ्यांनी जी सत्ता मिळविली होती तीच्या रक्षणासाठी एक मजबूत किल्ला बांधणे गरजेचे होते. म्हणूनच १६५७ साली प्रतापगडाची निर्मिती झाली.

रचना

 • सातारा जिल्ह्यातील जावळी या तालुक्यात, महाबळेश्वर पासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर एक डोंगर आहे. त्या डोंगरावरील डोपऱ्या नावाच्या टेंभ्यावर हा प्रतापगड किल्ला दिमाखात उभा आहे. दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखाली वाहनतळ आहे.
 • तेथून गडाच्या पश्चिमामुखी दरवाज्यातून उजव्या तटबंदीवर जाता येते. या दरवाज्याची रचना अशी करण्यात आली आहे की त्यावर तोफांचा थेट मारा करता येऊ नये किंवा हत्ती व ओंडक्याच्या सहाय्याने देखील तोडता येऊ नये.
 • येथील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा दरवाजा शिवकालीन प्रथेनुसार सूर्योदयापूर्वी उघडतात व सूर्यास्तानंतर बंद करतात. तटबंदीवर जागोजागी जंग्या म्हणजे शत्रूंवर धनुष्यबाणने हल्ला करण्यासाठी ठेवलेली छिद्रे आहेत. हि रचना अशी करण्यात आली आहे की गडावरील सैनिक सुरक्षित राहतील परंतु शत्रू मात्र बाणांच्या माऱ्यात असतील. प्रतापगडच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला एक गुहा आहे. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला चिलखती बांधणीला बुरुज आहे.

प्रेक्षणीय स्थळे

 • किल्ल्यात भवानी मातेचे मन्दिर आहे. ही मूर्ती नेपाळच्या गंडकी नदीतून खास शाळीग्राम शिळा मागवून कोरली गेलेली आहे. या मुर्तीशेजारीच स्फटिकाचे शिवलिंग आणि हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. मंदिरासमोरून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला समर्थ रामदास स्वामींनी स्थापिलेली हनुमानाची मूर्ती आहे.
 • बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वार नंतर केदारेश्वर महादेवाचे मोठे शिवलिंग असलेले मंदिर आहे. केदारेश्वर मंदिराच्या मागीच्या बाजूला राजमाता जिजाबाई यांचा भग्न झालेला वाडा आहे. येथेच बागेमध्ये शिवाजीचा अश्वारूढ पुतळा आहे. शिवाजी राजांच्या वाड्याच्या जागी हा पुतळा उभारण्यात आला आहे.
 • किल्ल्याला घोरपडीचे चित्र असलेला दिंडी दरवाजाही आहे. तेथून पुढे गेल्यावर रेडका बुरूज, यशवंत बुरूज व सूर्य बुरूज हे पाठोपाठ आहेत. अफजलखानाचा वध केल्यानंतर संभाजी कावजी नावाच्या मावळ्याने त्याचे शिर येथील एका बुरुजात पुरले असेही म्हटले जाते. बुरुजांच्या मध्ये नासके तळे व गोडे तळे ही दोन तळी आहेत. शिवाय वेताळाचे मंदिरही आहे.
 • भवानीमंदिरात आपण सभामंडप व नगारखाना पाहू शकतो. मंदिरासामोर दगडी दीपमाळ आहे आणि मंदिराच्या परिसरात काही तोफाही ठेवल्या आहेत. मंदिराच्या पाठून गेल्यास नैऋत्य तलाव व चोर दरवाजा आहे. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला दिशेलाही दोन तळी आहेत. मंदिरापासून काही अंतर चढल्यावर बालेकिल्ल्याचा छोटा दरवाजा लागतो. मुख्य किल्ला सुमारे ३२० मी. लांब व ११० मी. रुंद आहे तर बालेकिल्ला डोंगराच्या माथ्यावर बांधलेला असून येथेच दरबाराची भरत असे.
 • प्रतापगड अवकाशातून पाहिल्यास फुलपाखराच्या आकाराप्रमाणे भासतो. तो सुमारे १४०० फूट लांबीचा आणि ४०० फूट रुंदीचा आहे. या गडाची तटबंदी अतिशय उत्तम आहे. गडाच्या वायव्येकडील कडे जवळपास ८०० फुट अधिक उंच आहेत जिथून कोयनेचे अतिशय मनोरम्य असे खोरे दिसते. गडाच्या खाली डाव्या दिशेला एक पायवाट आहे जी दर्गा शरीफ म्हणजेच अफजलखानच्या कबरी कडे जाते.

इतिहास

 • १६५९ साली शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे विजापूरचे आदिलशाह चिंतीत झाले. त्यांच्या चिंतेचे निवारण करण्यासाठी अफजल खानने शिवाजीमहाराजांच्या हत्येचा विडा उचलला. अफजलखान खान स्वारी करायला येत आहे हे समजताच राजे प्रतापगडावर आले.
 • अफजलखान प्रतापगडला वेढा घालून बसला, डावपेच खेळू लागला. महाराजांनी त्याला आपण घाबरले असल्याचे भासवून भेटीचा दिवस ठरविला. शामियाना उभारला. अफजलखानने मिठी मारण्याच्या बहाण्याने शिवाजीराजांना मारण्याचा प्रयत्न केला परंतु राजांच्या चिलखतामुळे ते बचावले. शिवाजी राजांनी वेळ न दवडता अफजलखानाचा वध केला.
 • सय्यद बंडा महाराजांवर धावून आला परंतु जिवाजी महालांच्या प्रसंगसावधानतेने राजे बचावले. तेव्हापासूनच ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ अशी म्हण प्रचलात आली व महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाने आणि हुशारीने प्रतापगड प्रसिद्ध झाला.

3 thoughts on “Pratapgad Fort Information in Marathi, प्रतापगड Killa Essay”

Leave a Reply

Your email address will not be published.