Skip to content

Virat Kohli Information in Marathi, Essay, Biography, Mahiti Nibandh

Virat Kohli

Virat Kohli Information in Marathi

विराट कोहलीची माहिती

 • विराट कोहली (५ नोव्हेंबर, इ.स. १९८८:दिल्ली, भारत) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
 • तो उजव्या हाताने फलंदाजी तसेच काही वेळा उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. सध्या तो भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमधील कर्णधार तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये देखील तो कर्णधार आहे.
 • विराट कोहलीने २००८ साली मलेशियामधील १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले. ऑगस्ट २००८ मध्ये, १९ वर्षांचा असताना त्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.
 • २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. कोहली आपला पहिला कसोटी सामना २०११ मध्ये वेस्ट इंडीझ़़ विरुद्ध किंगस्टन येथे खेळला.
 • ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने “एकदिवसीय विशेषज्ञ” हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला. त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले.
 • त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले. त्यानंतर आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६ मध्ये पुन्हा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
 • विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर, १९८८ रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी आहे.
 • त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे. कोहली उत्तम नगर मध्ये लहानाचा मोठा झाला आणि विशाल भारती पब्लिक स्कूल मध्ये त्याचे शालेय शिक्षण सुरू झाले.
 • १९९८ साली, पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली, आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता.
 • अकादमीमध्ये कोहलीने राजकुमार शर्मा यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. त्यावेळी नॉयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडूनही तो सामने खेळला.
 • नववी असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला.

वैयक्तिक जीवन

 • डिसेंबर २०१५ पर्यंत, कोहलीचे बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्माशी संबंध होते. त्यांच्या संबंधांना प्रसारमाध्यमांनी खूप जास्त प्रसिद्धी दिली.
 • कोहली आपण अंधश्रद्धाळू असल्याचे मान्य करतो. क्रिकेटमधील अंधश्रद्धा म्हणून तो काळा मनगटी पट्टा (रिस्टबँड) बांधतो; आधी तो ज्या ग्लोव्ह्ज घालून जास्त धावा होतील त्याच वापरत असे. २०१२ पासून तो धार्मिक काळ्या धाग्याशिवाय तो उजव्या हातावर कडे सुद्धा घालतो.

व्यावसायिक गुंतवणूक

 • कोहलीच्या सांगण्यांनुसार, फुटबॉल हा त्याचा दुसरा आवडता खेळ आहे. २०१४ मध्ये विराट कोहली इंडियन सुपर लीगच्या क्लब एफसी गोवाचा सह-मालक झाला.
 • नोव्हेंबर २०१४ मध्ये, कोहली आणि अंजना रेड्डीचे युनिव्हर्सल स्पोर्टझबिझ यांनी मिळून ‘WROGN’ हा तरुणांसाठीचा फॅशन ब्रँडची सुरवात केली. २०१५ मध्ये ह्या ब्रँडने पुरूषांसाठी कॅज्युअल कपडे बनवण्यास सुरवात केली, आणि मायंत्रा तसेच शॉपर्स स्टॉप यांच्याशी हातमिळवणी केली.
 • २०१५ मध्ये कोहलीने देशभरात व्यायामशाळा आणि स्वास्थ केंद्र यांची साखळी सुरू करण्यासाठी ९० करोड (US$१९.९८ मिलियन) ची गुंतवणूक केली. “Chisel” नावाची व्यायामशाळाची साखळी विराट कोहलीच्या संयुक्त विद्यमाने मालकीची आहे.

विक्रम आणि कामगिरी

सर्वात जलद शतक

 • भारतीय फलंदाजांमधील सर्वात जलद शतक (५२ चेंडूंत)

महत्त्वाचे टप्पे

 • सर्वात जलद १००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय भारतीय.
 • सर्वात जलद ४००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाचा फलंदाज.
 • सर्वात जलद ५००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाचा फलंदाज.
 • सर्वात जलद ६००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाचा फलंदाज.
 • सर्वात जलद ७००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा फलंदाज.
 • सर्वात जलद १० एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाचा फलंदाज.
 • सर्वात जलद १५ एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाचा फलंदाज.
 • सर्वात जलद २० एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाचा फलंदाज.
 • सर्वात जलद २५ एकदिवसीय शतके करणारा फलंदाज.
 • सर्वात जलद १००० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० धावा पूर्ण करणारा फलंदाज.

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा

 • २०१० मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.
 • २०११ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा.
 • २०१२ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.
 • २०१३ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.
 • २०१४ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.
 • २०१२ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय.
 • एका आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा (९७३).

Virat Kohli Information in Marathi Language Wikipedia : Essay Biography

1 thought on “Virat Kohli Information in Marathi, Essay, Biography, Mahiti Nibandh”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *