Skip to content

Abhyas Kasa Karava | How to Study | Study Tips in Marathi

how to study in marathi language wikipedia abhyas

Abhyas Kasa Karava

अभ्यासाठी पुरेसा वेळ द्या :

आपण सर्वात आधी अभ्यासासाठी पुरेसा वेळ देणे फार महत्वाचे आहे. अभ्यास करणे शेवटच्या क्षणा पर्यंत सोडायचे नाही. आपल्यापैकी काहीजण वर्षभर वेळ वाया घालवतात आणि शेवटच्या क्षणाला अभ्यास करायला चालू करतात. अभ्यास हा पुरेसा वेळ देवून आणि नियमित केला तर परीक्षेला काही अडचण येत नाही. अभ्यासासाठी एक ठराविक वेळ निश्चित करा. तुमच्या दिवसाच्या वेळेचे नियोजन करा. त्यातील तुम्ही अभ्यासासाठी किती वेळ देऊ शकता ह्याचे वेळापत्रक बनवा. तुमचा जो विषय अवघड किवा सोपा असेल त्या प्रमाणे त्याला वेळ द्या.

अभ्यासाच्या जागेचे नियोजन :

सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही अभ्यासाला कुठे, कधी व किती वेळ बसणार आहात ते ठरवा. आपण अभ्यासाला बसण्याची जागा शांततेची असावी, तिथे कसल्याही प्रकारचा गोधळ नसावा. तुम्ही अभ्यासाला बसाल तिथे पुरेसा उजेड असावा. तुम्ही अभ्यास करायला ज्या टेबल व खुर्चीचा वापर करणार असाल ती हलणारी किवा आवाज करणारी नसावी. जर का तुम्ही तुमचा अभ्यास संगणकावर करणार असाल तर त्यात कसल्याही प्रकारचे खेळ (गेम) नसावेत ज्यामुळे तुमचे लक्ष विचलित होणार नाही. काही जणांना शांततेत झोप येते. म्हणून त्यांना जसा शक्य असेल त्याप्रकारे अभ्यास करावा. कोणाला गर्दीत अभ्यासाची सवय असते तर कोणाला ग्रुप मध्ये अभ्यासाची सवय असते. कोणाला गाणे ऐकत अभ्यास करायची सवय असते. तसेच जर आपल्याला आणखी काही वेगळ्या पद्धतीने अभ्यास होत असेल तर आपण तसा प्रयत्न करून पाहू शकतो.

अभ्यास लक्षात ठेवण्याच्या पद्धती :

बऱ्याच वेळा अभ्यास करताना अर्ध्याहून जास्त मुलांना घोकून पाठ करायची सवय असते. पण आपल्याला आपला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी घोकंपट्टी करण्याची गरज नाही. लहान मुलांना समजवायचे किवा शिकवायाचे झाले तर आपण त्यांना गोष्टींचे विडीओ दाखवून पण समजवू शकतो. त्यामुळे त्यांना ते लक्षात ठेवण्यास व समजण्यास सोपे जाते. तसेच आठवी, नववीच्या मुलांना इतिहास, भूगोल, नागरीक शास्त्र असे विषय लक्षात ठेवण्यास अवघड जाते. त्यांना आपण ते कथांमधून किवा उदाहरण देऊन किवा प्रत्यक्षात ते त्यांना दाखवू शकतो. अशा पद्धतीने त्यांना ते लक्षात ठेवण्यास सोपे जाते.

मुलांना शिकवण्याच्या अनेक पद्धती आहेत. काही मुलांना वाचून किंवा ऐकून एखादी गोष्ट लक्षात राहते तर काही मुलांना लिहून केलेला अभ्यास लक्षात रहातो. काही मुलांना बघितलेल्या गोष्टी चांगल्या लक्षात रहातात तर काहींना अनुभवलेल्या घटना लक्षात रहातात. प्रत्येक मुलांनी व त्यांच्या पालकांनी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे की विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धत कोणती आहे आणि त्याप्रमाणे अभ्यास करावा.

एकत्र मिळून केलेला अभ्यास :

अभ्यास करायची ही पण एक विशिष्ट पद्धत आहे. बऱ्याचदा आपण एकट्याने केलेला अभ्यास आणि एकत्र बसून केलेला अभ्यास ह्यात फरक जाणवतो. बऱ्याचदा एखादी गोष्ट दुसऱ्या मित्राला किंवा मैत्रिणीला समजाऊन सांगता सांगता आपल्या सुद्धा ती गोष्ट चांगली लक्षात राहून जाते. कधी कधी आपले पाठांतर झाले आहे कि नाही हे आपण आपल्या मित्राकडून पाहू शकतो. एकत्र बसून आभ्यास केल्यावर आपल्याला वेळेचे भान राहत नाही व अभ्यासाचा कंटाळा सुद्धा येत नाही. जर मित्र किंवा मैत्रीण जवळपास नसतील तर तुम्ही घरातील कोणत्याही व्यक्तीची मदत घेऊ शकता, अगदी आजी-आजोबा सुद्धा. तुम्हाला फक्त एवढीच कल्पना करायची आहे की तुम्ही शिक्षक आहात आणि तुमच्या समोर एक विद्यार्थी बसला आहे आणि तुम्हाला त्याला शिकवायचे आहे. त्यांना एखादा विषय शिकवता – शिकवता तो विषय तुमच्या अतिशय उत्तम प्रकारे लक्षात येऊ शकतो.

उजळणी :

पाठ केलेल्या अभ्यासाची उजळणी करणेही तितकेच महत्वाचे आहे, जितका अभ्यास पाठ करणे. बरेच विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात आणि परीक्षेच्या वेळेस उजळणी करतात. पण अचानक त्यांच्या लक्षात येते की आपण पूर्वी केलेला अभ्यास आपल्याला फारसा लक्षात नाही. मग त्यांना भीती वाटू लागते आणि या भीतीमुळे जे लक्षात असते तेही विसरून जातात. म्हणूनच उजळणी करण्याची एक योग्य पद्धत आहे जी सर्व विद्यार्थ्यांनी समजून घेतली पाहिजे. एखादा धडा पाठ केल्यानंतर त्याची पहिली उजळणी ही २४ तासांच्या आत केली गेली पाहिजे. त्यामुळे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो. त्यानंतर त्याची दुसरी उजळणी एका आठवड्याच्या आत आणि तिसरी उजळणी एका महिन्याच्या आत केली पाहिजे. उजळणीची ही पद्धत वापरल्यास तुम्ही पाठ केलेला अभ्यास वर्षभर उत्तमरीत्या लक्षात राहू शकतो. उजळणी शक्यतो पहाटेच्या वेळेस किंवा रात्री झोपण्यापूर्वी करावी.

जुन्या प्रश्नपत्रिकेचा वापर :

अभ्यास करताना आपल्याला जुन्या प्रश्नपत्रीकेचा उपयोग होतो. बऱ्याचदा भरपूर फायदा देखील होतो. कुठल्याही परीक्षेची तयारी करताना मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा पूर्णपणे अभ्यास केल्यास तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल.

अभ्यास करताना घेतलेली विश्रांती :

आपण जर का धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला तर आपण चोवीस तास धावू शकत नाही. तसेच परीक्षेचा अभ्यास करताना किवा अभ्यास झाल्यावर थोडा वेळ विश्रांती घेतली पाहिजे. अभ्यास झाल्यावर आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे ते करावे त्याने आपल्याला पुढचा अभ्यास करण्यासाठी आपले मन प्रसन्न होते.अभ्यास करताना सलग एक तासापेक्षा जास्त वेळ बसू नये. प्रत्येक एक तासानंतर १५ मिनिटांची विश्रांती नक्की घ्यावी.

1 thought on “Abhyas Kasa Karava | How to Study | Study Tips in Marathi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *