Skip to content

Bhashan Kase Karave Tips | भाषण कला

Bhashan Kase Karave

How to Give a Speech Information in Marathi Language

भाषण कसे करावे

कधी तुमच्यासोबत असे झाले आहे का, कि एखाद्या व्यक्तीच्या भाषणाने तुम्ही एकदम भारावून गेले आहात? त्याच्या विचारांनी प्रभावित झाले आहात? त्यांचे भाषण तुम्हाला सतत ऐकावे वाटते? त्यांचा शब्द आणि शब्द कानांनी टिपण्यात तुम्ही उत्सुक असता? त्यांनी बोलावे आणि तुम्ही ऐकावे बस!

भाषण कसे असावे, श्रोत्यांना खिळवून ठेवणारे असावे, मुद्देसुद असावे, आपले विचार त्यातून स्पष्ट पणे समोरच्याला भिडावे!

सगळे खरे आहे, असेच असावे भाषण, समोरच्याला खिळवून ठेवणारे, श्रोत्यांना प्रभावित करणारे भाषण…पण ते करावे कसे ???

भाषण म्हणजे काय ?

 • सर्वात आधी आपण जाणून घेऊयात कि भाषण म्हणजे नेमके काय?? आता आपण बऱ्याचदा भाषण देऊ नकोस असा वाक्यप्रचार वापरतो. ज्याचा अर्थ उगीच बडबड करू नको असा होतो, गमतीचा भाग वेगळा पण जरा विचार करा भाषण म्हणजे नेमके काय?
 • शब्दशः अर्थ असा आहे कि संभाषण. जे दोन लोकांमधले असू शकते किंवा अनेक. भाषण म्हटले कि आपल्या डोळ्यांपुढे एखादा नेता मोठ्या गर्दीला काहीतरी संबोधत आहे असे काहीतरी चित्र उभे राहते पण भाषण म्हणजे हेच असे काही नाही. खरे तर भाषण ही एक कला आहे, एक कौशल्य आहे जे प्रत्येकाने आत्मसात करायला हवे. उत्तम भाषण कला एखाद्या सामान्य माणसाला मोठी प्रतिभा प्राप्त करून देऊ शकते.
 • थोडक्यात भाषण म्हणजे आपले विचार समोर असणाऱ्या एक किंवा अनेक लोकांपर्यंत स्पष्टपणे पोहचवणे, बस. इतके सोपे आहे भाषण।
 • चला तर मग बघुयात भाषण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी।

आत्मविश्वास :

 • भाषण करण्यासाठी सर्वात महत्वाचे काही असेल तर ते आहे स्वतःवर असणारा विश्वास. मी हे करू शकतो आणि मला हे जमणार आहे असा आत्मविश्वास. खरे तर आपण भाषण या विषयाचा उगीच बाऊ केलेला आहे.
 • लोक काय म्हणतील, माझे चुकले तर लोक मला हसतील, कसे होईल माझे अशा विचारांनी आपण भाषण करण्याचा विचारसुद्धा करत नाहीत आणि दुसरीकडे आपले सहकारी मित्र त्यांच्या भाषणाने सर्वांचे मन जिकंत असतात.
 • एकदा आपण करू शकतो आणि आपल्याला भाषण जमणार आहे असा विश्वास आपण आपल्या मनात निर्माण करू शकलो कि झाले. पण त्यासाठी आपल्याला काही गोष्टी प्रकर्षाने कराव्या लागतील.
 • सर्वात आधी तर तुम्ही समोर असणाऱ्या प्रेक्षकांची काळजी आणि विचारच सोडून द्या. प्रेक्षकांबद्दल आपुलकीची भावना, कि हे माझेच आहेत आणि माझे चुकले तरी ते मला हसणार नाहीत.
 • तसेच तुमच्या बॉडी लँग्वेज मधून तुमचा आत्मविश्वास सर्वांपर्यन्त पोहचवा.

वाचन :

 • वाचन हि उत्तम भाषण करण्याची गुरुकिल्ली आहे. वाचनाने आपली माहिती वाढते, जगात घडणाऱ्या घडामोडी कळतात, आपले शब्द भांडार वाढते, शब्दांवर पकड मजबूत होते. त्यामुळे उत्तम भाषण करणाऱ्या सर्वांचा हा एक सारखा गुण बघायला मिळतो. वाचन हे आत्मविश्वास वाढविण्याची एक पायरी आहे.
 • तुम्ही जे वाचता ते तुमच्या स्मरणात राहते आणि भाषण करताना ते तुम्हाला आठवते आणि आपण जे बोलतोय याला काही संदर्भ आहे हे आपल्याला माहित असते, मग आपसूकच आपला आत्मविश्वास आपल्या शब्दातून जाणवतो.
 • आता आपण मोकळ्या वेळेत नियमित वाचन करायला हवे किंबहुना वाचनासाठी वेळ काढायला हवा. नियमित वृत्तपत्र वाचनाने आपल्याला आपल्या आसपास घडणाऱ्या आणि जगभरातील घडामोडी माहिती होतात.
 • विविध विषयांवरची पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञानात वाढ होते. म्हणूनच चांगले आणि आत्मविश्वास पूर्ण भाषण करण्यासाठी नियमित वाचन करावे।

भाषणाची पूर्व तयारी :

 • भाषण एक उत्स्फुर्त कला जरी असली तरीही त्यासाठी काही पूर्वतयारी आवश्यक असते. जेव्हा तुम्हाला माहिती नसेल कि आपल्याला भाषण करावयाचे आहे आणि अगदी अंतिम क्षणी तुम्हाला भाषणाला बोलावले जाते तेव्हा तुमचा कॉमन सेन्स तुम्हाला तारुन नेऊ शकतो.
 • परंतु तुम्हाला जर माहिती असेल कि तुम्हाला भाषण करायचे आहे तेव्हा तुम्ही त्या विषयाची पूर्व तयारी आणि पूर्ण अभ्यास करूनच भाषणाला उभे राहायला हवे.
 • एखाद्या विषयाचे अभ्यासपूर्वक भाषण हे नक्कीच लोकांना आवडते. भाषणातून लोकांना काही नवीन गोष्टी ऐकायला आवडतात, तर ते करायचा तुम्ही प्रयत्न करावा.
 • भाषणाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची अध्यक्षाची नावे जर तुम्हाला आधीच माहिती करून घेता आली तर उत्तम. तसेच भाषण हे नेहमी गंभीर असावे असे मुळीच काही नाही थोडा गमतीचा भाग तुमच्या भाषणाला कलाटणी देऊ शकतो.
 • उत्तम वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता होणे अत्यंत आवश्यक असते. तुम्ही तुम्हाला उत्तम वाटणाऱ्या श्रोत्यांचे भाषण ऐकायला जा, इंटरनेट वर त्यांची भाषणे बघा त्यांनी मांडलेल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या, कोणत्या मुद्द्यानी लोक जास्त प्रभावित झाले यांची नोंद घ्या आणि अम्मल करायचा प्रयत्न करा.

Bhashnachi Suruvat – भाषणाची सुरवात कशी कवी ?? :

 • भाषणाची तयारी मनामध्ये करत असताना अनेकांना पडणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे…भाषणाची सुरवात कशी करावी ? “वेल बेगीनिंग इज हाल्फ डन” अशी इंग्रजी मध्ये एक म्हण आहे, ज्याचा अर्थ असा आहे कि चांगली सुरवात म्हणजे काम अर्धे झाल्यासारखे असते. तसेच भाषणाचे आहे, तुमचे भाषण उत्तम होते, मुद्दे छान होते पण जर सुरवातच खराब होती तर असे भाषण श्रोत्यांच्या मनात घर करत नाही.
 • जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यक्रमात भाषण करत असाल तेव्हा व्यासपीठावरील मान्यवरांच्या नावाने भाषणाला सुरवात करणे कधीही चांगले, जसे कि व्यासपीठावर उपथित असलेले, कार्यक्रमाचे अध्यक्ष, जर कुणी तुमच्या विनंतीला मान देऊन खास उपस्थित असेल तर त्यांचा उल्लेख करायला विसरू नका. यानंतर भाषण सुरु करताना जत तुम्ही त्या प्रसंगाशी संबधीत एखादी कविता किंवा गाणं म्हटले तर खूपच उत्तम.
 • तसेच जर तुम्ही एखाद्या महापुरुषाच्या जयंतीसाठी भाषण करत असाल तर त्यांना अभिवादन करून किंवा त्यांच्या एखाद्या वाक्याने सुरवात करावी. जसे टिळकांच्या जयंतीपर भाषणाला “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” असे म्हणणाऱ्या टिळकांचा जन्म चिखली या गावी झाला।

Bhashnachi Shevat – भाषणाचा शेवट कसा करावा ? :

 • भाषणाची सुरवात जशी महत्वाची असते तसेच शेवटदेखील तितकाच महत्वाचा असतो. कारण भाषणात योग्य ठिकाणी थांबणे अतिशय गरजेचे असते नाहीतर आपले श्रोते कंटाळून जाऊ शकतात. तुमचे भाषण मुद्देसुद असावे आणि योग्य वेळेला तुम्हाला थांबता आले पाहिजे.
 • भाषणाच्या सुरवातीप्रमाणेच तुम्ही शेवट देखील एखाद्या कवितेने करू शकता, पण माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला असे वाटते एखादा हिंदी शेर तुमच्या भाषणाचा उत्तम शेवट करू शकतो. अर्थातच तो शेर विषयाला धरून असायला हवा आणि काहीतरी संदेश देणारा हवा.

How to Give a Speech Information in Marathi / Wikipedia Essay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *