• मेडीटेशन साठी सर्वात महत्वाचे आहे आरमात बसणे. म्हणून नेहमी अशी वेळ निवडा जेव्हा तुमच्या आजू – बाजूला जास्त गडबड नसेल, जेव्हा तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही आणि तुमच्या मेडीटेशन मध्ये व्यत्यय येणार नाही. त्यामुळे पहाटेची किंवा संध्याकाळची वेळ मेडीटेशन साठी खूप उत्तम मानली जाते. यावेळी वातावरण सुद्धा प्रसन्न असते त्यामुळे मेडीटेशन खूप चांगले होते.
  • चांगल्या वेळे सोबतच चांगले स्थान निवडणे सुद्धा गरजेचे आहे. जागा निवडताना सुद्धा अशी निवडा की जिथे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही किंवा तुमच्या मेडीटेशन मध्ये खंड पडणार नाही. अशी शांत जागा तुम्हाला घरी किंवा बागेत मिळू शकेल.
  • खूप जण मेडीटेशन करताना पद्मासन करून बसण्याचा सल्ला देतात परंतु हे खरे नाही. जर पद्मासन करणे कठीण जात असेल तर मेडीटेशन होऊ शकणार नाही म्हणून नेहमी ज्या आसनात आराम मिळेल अश्याच आसनात बसावे, पण पाठीचा कणा ताठ ठेवा आणि मान व खांदे सैल ठेवा. डोळे बंद करणे विसरू नका.
  • मेडीटेशन नेहमी काहीहि खाल्यानंतर करू नका. भरपूर खाल्यानंतर तर मेडीटेशन अजिबात करू नये. त्यामुळे मेडीटेशन ऐवजी झोप येण्याची शक्यता जास्त असते. पण याचा अर्थ असा नाही कि उपाशी पोटी मेडीटेशन करावे. भूक लागली असल्यास तुम्ही ध्यान केंद्रित करू शकणार नाही आणि पूर्ण वेळ तुमचे लक्ष खाण्याकडेच लागलेले असेल. खाऊन झाल्यावर कमीत कमी दोन तास मेडीटेशन करू नये आणि खाल्यानंतर पाच तासानंतर मेडीटेशन करून नये.
  • मेडिटेशन करण्यापूर्वी थोडा वेळ आधी वार्म अप नक्की करावे. वार्म अप केल्याने शरीरात उर्जा निर्माण होते अणि शरीर लवचिक बनते त्यामुळे तुम्ही सरळ आणि ताठ बसू शकतात.
  • मेडीटेशन ची सर्वात सोपी पद्धत म्हणजे दीर्घ श्वास घेणे. मेडीटेशन पूर्वी तुम्ही प्राणायाम सुद्धा करू शकता. त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते आणि मेडीटेशन साठी लागणारी मनाची शांती तुम्ही मिळवू शकता.
  • मेडीटेशन करताना चेहऱ्यावर थोडे हसू ठेवा. त्यामुळे तुमच्या मनावरील तणाव दूर होईल. तुम्हाला आनंदी असल्याची अनुभूती मिळेल आणि मेडीटेशन चांगले होईल.
  • ध्यान केंद्रित करताना मनातील सर्व चिंता, सर्व विचार दूर ठेवा. त्यासाठी तुम्ही श्वासाच्या लयीवर लक्ष केंद्रित करू शकता. मनात विचार येऊ लागताच पुन्हा श्वासाच्या लयीकडे लक्ष द्या. हळूहळू तुम्हाला लक्ष केंद्रित करण्याची सवय होऊन जाईल.
  • तुम्ही दुसऱ्यांसोबत सुद्धा मेडीटेशन करू शकता. खूप जणांबरोबर मेडीटेशन केल्यास तुम्हाला हुरूप येतो आणि तुम्ही चांगले मेडीटेशन करू शकता.
  • तुम्ही सौम्य वासाच्या मेणबत्त्या आणि मंद स्वरांचे संगीत सुद्धा लावू शकता. या दोघांच्या वापरामुळे मेडीटेशन साठी चांगली वातावरण निर्मिती होते आणि ध्यान केंद्रित करण्यास मदत होते.
  • मेडीटेशन संपल्यावर लगेचच पटकन डोळे उघडू नका किंवा लगेच उठून उभे राहू नका.