Home » Essay in Marathi Language » Mi Pakshi Zalo Tar Essay in Marathi | Nibandh मी पक्षी झालो तर

Mi Pakshi Zalo Tar Essay in Marathi | Nibandh मी पक्षी झालो तर

Me Pakshi Zalo Tar

Mi Pakshi Jhalo Tar Essay in Marathi Langauge

मी पक्षी झालो तर

पंछी बनू उडती फिरू मस्त गगनमे, आज मी आझाद हुन दुनियाकी चमन मे…….

मी पक्षी झालो तर???? घरातल्या रेडिओवर हे गं जेव्हा जेव्हा लागत तेव्हा मे माझ्याच अशा कल्पनांचे मनोरे रचत असतो. पण खरंच मे पक्षी झालो तर??? काय होईल ? मीपण उंच उंच आकाशात भरारी घेईल, ना मला ट्राफिक ची चिंता करावी लागेल ना बस ट्रेन ची वाट बघावी लागेल, मे मला जेव्हा वाटेल तेव्हा जिथे वाटेल तेव्हा उडत उडत जाऊ शकतो.

मी असे ऐकले आहे कि पक्षी स्थलांतर करतात, आमच्या जवळच्या धरणावर दर हिवाळ्यात दूरच्या देशातून पक्षी उडत उडत येत असतात असे मे दर वर्षी ऐकत असतो. मग जर मीपण पक्षी झालो तर मलापण असेच स्थलांतर करावे लागेल, मग मला संपूर्ण जग बघता येईल तेपण अगदी फुकट. पक्षांना कुठे जायचे असेल तर त्यांना थोडी विमानाचे तिकीट काढावे लागेल त्यांना तर देवांनी जन्मतःच पंख दिले आहेत उडण्यासाठी. मग मी असा सगळं जग बघेल. समुद्र, उंच उंच डोंगर हे सगळे तेव्हा माझ्यापेक्षा खाली असतील, हे जग उंचावरून कसे दिसते ते मला बघता येईल. माझेपण पंख त्या सुंदर पक्षांसारखे रंगीत असतील मीपण एक आकर्षक पक्षी असेल. झाडाच्या सगळ्यात उंच अतिउंच शेंड्यावर मी जाऊन बसतो आणि मला तिथून पडायची भीती सुद्धा वाटणार नाही.

मग सगळे पक्षी माझे मित्र मैत्रिणी असतील, आम्ही सर्वजण मिळून धम्माल करू. रोज मस्त वेगवेगळ्या फळांचा आस्वाद आम्हाला घेता येईल. वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे फळ आम्हाला चाखता येतील. फळे खाऊन खाऊन झाले कि झऱ्याचे थंडगार पाणी पिऊ, कंटाळा आला कि झाडावरच आराम करायचा आणि उठले कि परत फळे खायची. मस्त मज्जा. माझं आयुष्य तर कित्ती सुंदर असेल तेव्हा, कधी उंच डोंगरावर, तर कधी शांत समुद्र किनाऱ्यावर आमचा मुक्काम असेल. तिथे मला वेगवेगळे शंख शिंपले गोळा करता येतील का? वेगवेगळ्या जागांची मला माहिती होईल, तिथले पक्षी प्राणी, जंगले सगळे मला माहित होईल. मी कित्तेकदा विचार करतो कि इंद्रधनुष्य कस असेल ? वरून ते कस दिसत असेल ??? मी पक्षी झालो तर मला संपूर्ण इंद्रधनुष्य दिसेल आणि मी ना त्याच्यावरच जाऊन बसेल.
सुट्टीमध्ये आजी आजोबांना भेटायला मामाच्या गावी जायला मला बसची गरज नाही कि ट्रेन ची गरज नाही. मी हवा तेव्हा इतकं उडून आईबाबांच्या आधी आजीआजोबांकडे जाऊ शकतो.

पावसात मी ढगांच्यावर जाऊन मुक्काम ठोकेल आणि जमिनीवर पडणाऱ्या पावसाचे निरीक्षण करेल तर उन्हाळ्यात मस्त पैकी एखाद्या शांत जंगलातल्या झाडाच्या फांदीवर माझे घरटे बांधेल आणि आराम करेल. मस्त मऊ मऊ कापसाची गादी माझ्या घरट्यात असेल. ना शाळेत जायची चिंता असेल ना परीक्षेची काळजी.मला तर रोज रोज अंघोळ करायचीपण गरज नाही, जेव्हा इच्छा होईल तळ्याच्या पाण्यात जाऊन मी मस्त पाणी खेळू शकतो. फक्त मस्त मनमुराद उडायचे, उंच उंच आकाशात, भटकंती करायची विविध देशात आणि मस्त मस्त फळ खायची बस्स. कित्ती स्वप्नवत आहे हे सगळं………..

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Composition Essay on मी पक्षी झालो तर

Marathi Nibandh – Mee Pakshi Zalo Tar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *