Skip to content

Mi Phulpakhru Zalo Tar Essay in Marathi | Nibandh मी फुलपाखरू झालो तर

ButterFly Phulpakhru Marathi

Mi Phulpakhru Zalo Tar Essay in Marathi Langauge

मी फुलपाखरू झालो तर

“मऊ मऊ माझ्या पंखांची, नक्षी सुंदर रंगांची
धुक्यात फिरता इकडे तिकडे दवबिंदुंनी न्हालो
फूलपाखरु झालो …मी फूलपाखरु झालो”

खरंच कित्ती छान दिसते ना फुलपाखरू ?? कित्ती वेगवेगळे रंग असतात त्यांच्या पंखावर. लाल, पिवळा, निळा, गुलाबी, हिरवा अगदी सगळे रंग असतात त्यांच्या पंखांवर. किती सुंदर नक्षी तयार होते या रंगांची, अगदी बघत बसावे वाटते त्यांच्याकडे तासंतास. कित्ती मस्त असेल ना फुलपाखराचे आयुष्य? मस्त रंगेबिरंगी एकदम…मलापण व्हायचंय फुलपाखरू.. खरंच मी फुलपाखरू झालो तर??

कित्ती मज्जा येईल मी फुलपाखरू झालो तर ?? छान छान वेगवेगळ्या रंगांचे पंख असतील माझे, सगळे लोक मला अगदी कुतूहलाने आणि आनंदाने बघत असतील. मला हातात घ्यावे असेच वाटेल सगळ्यांना इतका छान असेल तेव्हा मी. पण ना माझ्या पंखांमध्ये मला सगळे रंग हवेत, अगदी काळा सुद्धा.

किती छान आयुष्य असेल ते, एखाद्या बागेत माझे घर असेल, तिथे सगळे लहान मुले खेळायला येतील आणि मला पकडण्यासाठी माझा पाठलाग करतील, पण मी त्यांच्या हाती लागणारच नाही, ते माझ्या जवळ आले कि मी उडून जाईल. या फुलावरून त्या फुलावर, खूपच मज्जा येईल मला तर तेव्हा. दिवसभर नुसते खेळात राहायचे आणि भूक लागली कि फळांमधला गोड गोड रस प्यायचा हेच माझे काम. आणि माझ्यासारखे रंगीत पंख असलेले माझे मित्र मैत्रीण असतील, आम्ही पूर्णवेळ पकडापकडी खेळत राहू. मी तर मस्त हळुवारपणे उडत राहील दिवसभर, ना शाळेत जायचे ना गृहपाठाची काळजी. मस्त या फुलावरून त्या फुलावर बागडत राहायचे. रात्र झाली कि मस्तपैकी गवतांच्या आणि पानांच्या मऊ मऊ गादीवर झोपायचं, शांत गाढ.

मस्त बेधुंद स्वछंद आयुष्य ना सकाळी लवकर उठायची चिंता असेल ना लवकर यावरून शाळेत जायची. शाळेत जाताना खूप खड्डे असतात रोड वर आणि खूप गर्दीपण असते, मी फुलपाखरू झाल्यावर तर मला खड्यांची आणि गर्दीची चिंताच असणार नाही. मला जिथे जायचे असेल मी मस्त पैकी उडून जाईल. कुठेही जाण्यासाठी मला परवानगीची गरज नाही. मी कितीही उंच उडू शकतो कुठेही जाऊ शकतो. मला नेहमी असे वाटते कि त्या डोंगरावर असणाऱ्या धबधब्याचा उगम कुठे असे ? मी फुलपाखरू झालो तर कदाचित मी तो उगम बघू शकेल. आणि मी आणि माझे सगळे मित्र तिथे पिकनिक ला जाऊ, तिथे असणाऱ्या फुलांचा रस कसा लागत असेल? इथल्या बागेतल्या फुलांसारखा कि काही वेगळा हे पण मला बघायचे आहे.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Composition Essay on मी फुलपाखरू झालो तर

Marathi Nibandh – Mee Phulpakhru Zalo Tar

2 thoughts on “Mi Phulpakhru Zalo Tar Essay in Marathi | Nibandh मी फुलपाखरू झालो तर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *