चिकन बिर्याणी RECIPE पाककृती
साहित्य
१. २०० ग्राम / बासमती तांदूळ
२. (चहाचा) चमचा मीठ
३. टेबल स्पून ( २ चमचे) तेल
४. छोटे कांदे (बारीक चिरून)
५. मध्यम कांदे (बारीक चिरून)
६ लसणीच्या पाकळ्या (बारीक चिरून)
७. २(चहाचे) चमचे किसलेले आले
८. चीकन ब्रेस्ट फिले किंवा २ चिकन ब्रेस्ट…लांबट कापून घेणे( चिकन फिले हे चिकन ब्रेस्ट च्या आतील बाजूस असलेले मांस….काही सुपर स्टोर्स मध्ये उपलब्ध असते.)
९. १ (चहाचा) चमचा लाल तिखट
१०. १ (चहाचा) चमचा जिरेपूड
११. २ (चहाचे) चमचे धने पूड
१२. अर्धा चमचा दालचिनी पूड
१३. अर्धा चमचा हळद
१४. चिमुट भरून जायफळ पूड
१५. ३/४ कप साधे दही
१६. २ (चहाचे) चमचे पिठी साखर
१७. ४,५ मुठी बेदाणे
कृती
- स्वच्छ पाणी येईपर्यंत तांदूळ धुवून घ्यावेत व थोड्या पाण्यात मीठ घालून ३० मिनिटे भिजू द्यावेत.
- त्यानंतर तांदळातील पाणी निथळून त्यांना एका पातेल्यात पाण्यात बुडवून ठेवावे. पाणी तांदळाच्या वर २ से.मी./ ३/४ इंच तरी असावे.
- आता हे तांदूळ घातलेले पातेले तापत ठेवावे. पाण्याला उकळी आली कि मंद आंचेवर झाकून भात १० मिनिटे शिजू द्यावा. भातात भोके दिसू लागतील सर्व पाणी शोषले जाईल.
- आता फ्राईंग पॅन मध्ये तेल तापवा त्यात चिरलेले छोटे कांदे, मोठे कांदे ,लसूण आणि आले घालून सोनेरी रंगावर परता. यातील चमचाभर मिश्रण सजावटी करता बाजूला काढून ठेवा.
- आता चिकन घालून ते ४ मिनिटे परता.
- आता सर्व मसाले घालून १ मिनिट परता. आता त्यात दही मिसळून १-२ मिनिटे मंद आचेवर ठेवावे. आता त्यात साखर, बेदाणे व अर्धवट शिजलेला भात मिसळा. आता हे पॅन स्वच्छ टी टॉवेल ने झाकून त्यावर घट्ट झाकण लावावे. (यामुळे वाफ आतच राहिल)
- अशा रीतीने १० मिनिटे मंद आंचेवर शिजू द्यावे.
- आंच बंद करून ५ मिनिटे तसेच राहू द्यावे.
- बाजूला काढून ठेवलेल्या कांद्याच्या मिश्रणाने सजवून बिर्याणी सर्व्ह करा (वाढा).
Nice recipe
चहाचा चमचा म्हणजे साधारण केवढा
10grm
छान प्रश्न आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता!!…
Nice recipe…
Plz serve boiling che time sanga for bachelors