Home » Recipe » Pizza Recipe in Marathi | पिझ्झा पाककृती

Pizza Recipe in Marathi | पिझ्झा पाककृती

Pizza Recipe in Marathi , पिझ्झा

pizza pakkruti marathi

साहित्य :-

पिझ्झाचे पीठ बनविण्यासाठी:

 • ३ कप गव्हाचे पीठ
 • १ ते १.२५ कप पाणी
 • १,५ छोटे चमचे इनस्टंट यीस्ट
 • १/४ छोटा चमचा साखर
 • १/२ छोटा चमचा मीठ
 • २ मोठे चमचे ऑलिव्ह तेल

पिझ्झाच्या टोमेटो सॉससाठी :

 • ३ मोठे टोमेटो किंवा २ कप टोमेटोची चटणी
 • ५ लसणाच्या पाकळ्या – बारीक चिरलेल्या
 • १ छोटा चमचा बारीक चिरलेली तुळशीची ताजी पाने
 • १ छोटा चमचा सुका ओरेगानो
 • अर्धा छोटा चमचा काळी मिरी
 • २ छोटा चमचा ऑलिव्ह तेल
 • मीठ आणि काळी मिरी स्वादानुसार

पिझ्झाच्या सजावटीसाठी:

 • ६ ते ८ छोटे चमचा पिझ्झा सॉस
 • १ मध्यम कांदा – बारीक चौकोनी कापलेला
 • १ मध्यम सिमला मिरची – बारीक चौकोनी कापलेली
 • ७ कापलेले मशरूम्स – १ छोटा चमचा तेलात तळलेले
 • ७-८ ऑलिव्ह – कापलेले
 • किसलेले चीज आवश्यकतेनुसार
 • थोडेसे ऑलिव्ह तेल
 • गव्हाचे पीठ लाटण्यासाठी

How to make Pizza in Marathi ?

कृती

पिझ्झाचे पीठ बनविण्यासाठी:

 1. १ कप पाणी एका वाडग्यात घेऊन थोडेसे गरम करा. जास्त गरम करू नका, कोमट करा.
 2. नंतर त्यात १/४ छोटा चमचा साखर घाला आणि साखर विरघळेपर्यंत ढवळा.
 3. दीड छोटा चमचा इनस्टंट यीस्ट घाला.
 4. यीस्ट विरघळेपर्यंत ढवळा.
 5. १ कप गव्हाचे पीठ, २ मोठे चमचे ऑलिव्ह तेल आणि १/४ छोटा चमचा मीठ घाला आणि चांगले एकजीव करा.
 6. परत १ कप पीठ घाला आणि एकजीव करा.
 7. उरलेले एक कप पीठ टाका आणि चांगले एकजीव करा आणि नंतर मळा.
 8. पीठ लवचिक आणि मऊ होईपर्यंत मळले पाहिजे. गरज वाटल्यास अजून पाणी घालून मळा. कमीत कमी ८-९ मिनिटे तरी पीठ मळले पाहिजे.
 9. पिठाला थोडे ऑलिव्ह तेल लावून त्याच भांड्यात ठेवा.
 10. किचन टॉवेलने पीठ झाका आणि दोन तास आंबवण्यासाठी ठेवा.
 11. पीठ येईपर्यंत पिझ्झा सॉस तयार करा.

पिझ्झा सॉस तयार करणे:

 1. ३ टोमेटोची प्युरी मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरमध्ये तयार करा.
 2. छोट्या भांड्यात ऑलिव्ह तेल गरम करा.
 3. लसूण बारीक कापा आणि मंद आचेवर १०-१२ सेकंद परता.
 4. टोमेटोची प्युरी घाला आणि ४-५ मिनिटे मंद आचेवर परता.
 5. टोमेटो शिजल्यानंतर, चिरलेली कोथिंबीर, सुका ओरगेनो, मीठ आणि मिरपूड टाका.
 6. ढवळा आणि १-२ मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्या.
 7. गरज वाटल्यास मीठ आणि मिरी अजून घाला.
 8. थंड झाल्यावर पिझ्झा सॉस वाडग्यात काढून ठेवा.

पिझ्झा बनवण्याची कृती:

 1. पीठ आल्यानंतर, पीठाचे दोन समान भाग करा. हलक्या हाताने प्रत्येक भाग मळून घ्या आणि १५-२० मिनिटे अजून झाकून ठेवा. दोन भागांचे ८-१० इंचाचे पिझ्झा बनवा.
 2. पिझ्झा बनविण्यासाठी १० इंचाच्या तव्याला ऑलिव्ह तेल लावा. तव्यावर थोडे गव्हाचे पीठ शिंपडा. ओव्हनला २५० डिग्री तापमानाला गरम करा.
 3. मळलेल्या पिठाचा एक भाग घ्या आणि त्याला थोडे पीठ लावा.
 4. लाटण्याच्या सहाय्याने ८-९ इंचाची पोळी लाटून घ्या.
 5. पिझ्झाची पोळी सावधानतेने उचलून तयार तव्यावर ठेवा.
 6. त्यावर थोडे ऑलिव्ह ठेवा.
 7. ३-४ मोठे चमचे पिझ्झा सॉस घेऊन पिझ्झावर एकसमान पसरा.
 8. ३ मोठे चमचे किसलेले चीज पसरा.
 9. तुमच्या पसंतीच्या टोपिंग्जने सजवा.
 10. सुक्या मिरचीचा कुट आणि सुका ओरेगेनो पसरवा.
 11. परत ५ मोठे चमचे किसलेले चीज पसरवा.
 12. बेकिंग ट्रे मधल्या खणात ठेवा आणि वरचा आणि खालचा हिटिंग रॉड चालू ठेवा. १२-१५ मिनिटे, चीज वितळेपर्यंत भाजू द्या. जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर अजून जास्त वेळ भाजू द्या. मायक्रोवेव्ह मध्ये, कन्वेक्शन मोडमध्ये भाजण्यासाठी, ओव्हन ज्या तापमानाला प्रथम गरम केला होता त्याच तापमानाला, म्हणजे – २०० डिग्री सेल्सियस तापमानाला ठेवावे.
 13. सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजल्यानंतर पिझ्झाचे तुकडे करून गरमागरम खायला द्या.

Recipe / रेसिपी  आवडली तर  जरूर  SHARE करा !

Leave a Reply

Your email address will not be published.