Skip to content

Biogas Information in Marathi | गोबर गॅस प्लान्टची माहिती

gobar gas biogas plant project

Biogas Information in Marathi

Gobar Gas in Marathi Language – बायो गॅस माहिती

बायो गॅस हे कचरा, गुरांचे शेण आणि भाजीपाल्याचे उरलेले भाग ह्यांच्या कुजण्याने तयार होणारा वायू आहे. टाकाऊ वस्तूंपासून लाभ देणारा हा उपाय वीज निर्मितीच्या तुटवड्यावर तसेच इंधनावर एक आश्चर्य जनक शोध आहे. प्रचंड असलेली आणि आणखी वाढत जाणारी लोकसंख्या आणि तिची इंधनाची गरज ह्यांचा ताळमेळ फक्त ह्या शोधाने भागू शकतो. आज जगात यांत्रिकी करणाने कार्बन डाय ऑकसाईड चे भयंकर प्रमाणात उत्सर्जन होत आहे. ह्या मुळे काही दिवसांनी मानवाला श्वास घेणे मुश्कील होणार आहे. दुसरीकडे सगळ्या जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे इतक्या प्रचंड लोकसंख्ये कडून होणारा कचरा ह्याची विल्हेवाट ही आहे. एकट्या मुंबई मध्ये दिवसाला ७००० ते १०००० टन कचरा निर्माण होतो. ह्या दोन्ही समस्यांवर एकच उपाय सापडला तो म्हणजे बायो गॅस.

सूत्रानुसार असे कळते की नैसर्गिक वायू जो मृत जनावरे आणि शतकांपासून कुजलेला कचरा ह्यापासून तयार होतो त्याचा साठा फक्त वीस वर्षांपर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे अख्खी मानवजात पर्यायी इंधन पुरवठ्याच्या शोधात लागली. त्यामुळे प्रथम घरगुती स्वरुपात आणि आता व्यापारी तत्वावर बायो गॅसची निर्मिती होऊ लागली.

बायो गॅस हा ६०% मिथेन [CH4] २९% कार्बन-डाय-ऑकसाईड [CO2] व थोडा हायड्रोजन सल्फाइड ह्यांनी बनलेला असतो. ह्यातील ज्वलनशील वायू म्हणजे मिथेन. जैविक कचरा जेंव्हा कुजतो तेंव्हा त्या प्रक्रिये मध्ये हा वायू बाहेर पडतो. ह्याचा उपयोग घरगुती वापरासाठी करता येतो आणि त्यामुळे अति दूर अति ग्रामीण भागातील इंधन आणि इलेक्ट्रिसिटीच्या समस्या सोडवणे शक्य होऊ लागले.

बायो गॅस आणि गोबर गॅस प्लान्टची माहिती :

बायो गॅस तयार करण्याच्या तीन पायऱ्या आहेत. कचरा गोळा करणे, तो बंद सिलिंडर किंवा डोम मध्ये अनेरोबिक[anaerobic]श्वसनासाठी ठेवणे. आलेला वायू साफ करणे आणि वापरणे. ह्याला क्लोज सिस्टम किंवा जैविक विघटन शील कचऱ्याचे फर्मेंटेशन [fermentation] असे म्हणतात.

कच्चा माल :

ह्यासाठी लागणारा कचरा म्हणजे गाईंचे शेण, मल मूत्र, भाज्यांचा कचरा, पालापाचोळा, उरलेले अन्न, गवत, मेलेले जनावर, दवाखान्यातील कचरा आणि पाणी इत्यादी. ह्या जैविक कचऱ्याला विघटना साठी प्राणवायु ची गरज असते. त्याचे विघटन झाल्यावर अनेरोबिक श्वासाने मिथेन तयार होतो. एका गायीच्या शेणापासून ३ kw/hour इतकी वीज निर्मिती होते. ह्यापेक्षा मोठा प्रकल्प असेल तर खालील प्रमाणे तयारी लागेल.

जागा : १०० चौरस मीटर
कामगार :
वीज :३ फेज AC
पाणी : १.२ kl

या प्रकल्पाचा एकूण खर्च १६ लाखापर्यंत येतो आणि ह्यापासून १ टन/दिवस इतका गॅस मिळतो. ह्यासाठी एक मोठा सिमेंटचा डोम आणि त्याला पाईप लावले जातात. त्यास landfill असे नाव आहे. ह्यात अनेरोबिक पद्धतीने कचऱ्याचे विघटन होते. आलेला गॅस स्वच्छ केला जातो. त्याचे चार टप्पे आहेत.

ते म्हणजे (1). Water washing. (2). pressure swing. (3) Selexol absorption. (4) Amine gas treatment.

ह्यामध्ये मिथेन वायू सोडून इतर वायू शोषले जातात. आणि स्वच्छ मिथेन वापरतात. जी मळी शिल्लक राहते ती उत्तम खत म्हणून वापरतात. आता नवीन पद्धती मध्ये [NANOCLEAN]बायो गॅस तयार करण्यासाठी लोखंडाचे अति सूक्ष्म कण वापरतात त्याने तिप्पट वायूची निर्मिती होऊ शकते. हा वायू प्रचंड दाबा खालून नेऊन नैसर्गिक वायू तयार करतात. ह्याच प्रक्रियेने LPG पण तयार करतात. विशेषत: वाहनांसाठी या वायूचा चांगला उपयोग होतो.

घरगुती किंवा छोट्या प्रमाणात पण हा वायू तयार करता येतो. त्यासाठी मोठा डोम न घेता छोटी पिंपे, वाहून नेता येण्यासारखे ड्रम पण वापरतात. पूर्ण सामानाचा खर्च रु.२५०००/- ते रु.५००००/-इतका येतो.

इंधनाचा तुटवडा लक्षात घेऊन आणि कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून सरकार बायो गॅस प्रकल्पाला अनुदान देत आहे. नोवेंबर १९८२ पासून ही योजना सुरु झाली. सरकार एकूण खर्चाच्या २० ते ४० टक्के अनुदान देत आहे. त्यानंतर टेरिफ मध्ये अग्रक्रम दिला जातो. प्रशिक्षण दिले जाते. सरकारी अधिकारी सतत निरीक्षण आणि मदतीसाठी येतात. ह्याला लागणारी वीज ग्रिड मधून सरळ घेता येते. संशोधन आणि विकास ह्याची माहिती दिली जाते. ह्या प्रकल्पातून मिळणाऱ्या फायद्यावर कुठलाही कर लागत नाही.

भारतामध्ये लुधियाना मध्ये १ MW चा प्रकल्प कार्यरत आहे. तामिळनाडू मध्ये १.५ ते २.५ MW चा पोल्ट्री मध्ये प्रकल्प कार्यरत आहे आतापर्यंत ११ बायो गॅस प्रकल्प उभे केलेले आहेत. छत्तीसगड, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश आणि राजस्थान ह्या राज्यांना प्रकल्प दिलेले आहेत. तेथे CNG चे पण प्लान्ट उभे केले आहेत. नवीन उद्योजकांना हे प्रकल्प उभे करण्यास सरकार मदत करीत आहे. बायो गॅस बॉटलिंग यूनिट हे वर्षाला ३५ लाख रुपयाचे इंधन आणि खत वाचवू शकेल.

ह्या प्रकल्पांमुळे आणि घरगुती प्रकल्पांमुळे आपल्याला हवेच्या प्रदूषणावर, इंधनाच्या कमतरतेवर आणि ओल्या कचऱ्याच्या समस्येवर मात करता येईल. तसेच LPG, CNG आणि डीझेल यांना पर्याय मिळेल आणि आपले परकीय चलन वाचेल. आपल्याला Global Warming ची झळ पोहोचणार नाही.

Biogas Project in Marathi Language – Wikipedia Mahiti, Essay

1 thought on “Biogas Information in Marathi | गोबर गॅस प्लान्टची माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *