शरीराची प्रतिकारक शक्ती कमी झाल्यास माणूस वरचेवर आजारी पडू लागतो. अशा वेळेस गुळवेल अत्यंत लाभदायक ठरते. गुळवेलच्या नित्य सेवनाने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
वारंवार होणारे सर्दी – पडसे, ताप आणि अशक्तपणा यामध्ये सुद्धा गुळवेल प्रभावी आहे.
गुळवेल सत्व दिवसातून तीन ते चार वेळा घ्यावे. अर्धा चमचा सत्व घेऊन नंतर दुध साखर घ्यावी कारण हे चवीला कडू असते.
गुळवेलचा काढा सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. हा काढा दिवसातून दोन तीन वेळा घेऊ शकतात.
दररोज सकाळ संध्याकाळ एक चमचा गुळवेल सत्व आणि गाईचे दुध नियमितपणे घेतल्यास तारुण्य दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते.
गुळवेल कडू चवीची असल्याने मधुमेहात सुद्धा फायदेशीर ठरते. गुळवेलचे नित्य सेवन केल्याने रक्तातील साखर कमी होऊन मधुमेही रुग्णांना होणाऱ्या मज्जादाह आणि अंधत्व या उपद्रवा पासून त्यांची सुटका करते.
गुळवेल मध्ये रक्ताभिसरण सुधारून हृदयाला बळकटी देण्याची शक्ती आहे. वृद्धांना आणि हृदयरोगाने पिडीत असणाऱ्या रुग्णांसाठी गुळवेल सत्व किंवा अमृतारीष्ट खूप फायदेशीर ठरते.
जुनाट मुरलेल्या तापात सुद्धा गुळवेल सत्वामुळे आराम मिळतो.
यकृताचे विकार किंवा कावीळ झाल्यास अर्धा चमचा गुळवेलसत्व आणि अर्धा चमचा हळद एक चमचा मधासोबत दिवसातून दोन तीन वेळा खायला द्यावे.
पंडुरोग किंवा रक्तक्षय झाला तर रुग्णाला गुळवेल सत्व किंवा अमृतारीष्ट द्यावे.
गुळवेलचे चूर्ण आणि दुध साखर स्त्री – पुरुषांच्या जननसंस्थेच्या अनेक विकारांमध्ये लाभदायक ठरते.
गुळवेलच्या नित्य सेवनाने मानसिक तणाव सुद्धा कमी होतो.
गुळवेल रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते.
डेंग्यूच्या तापात रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या पेशी वेगाने कमी होतात. अशा वेळेस गुळवेल दिल्यास पांढऱ्या रक्तपेशी लवकर सामान्य होतात. तसेच चिकनगुनिया, स्वाईन फ्लू आणि फ्लू मध्ये देखील गुळवेल खूप हितकारक आहे.
गुळवेलच्या कोवळ्या पानांची भाजी बनवतात. कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ही भाजी लाभदायक ठरते. तसेच ताप येऊन गेल्यानंतरही शरीराची ताकद वाढविण्यासाठी हि भाजी उपयुक्त आहे.
कुष्ठरोग आणि संधिवात या सारख्या रोगातही गुळवेलच्या सेवनाने आराम मिळतो.
वारंवार जुलाब होत असल्यास सकाळी उपाशीपोटी गुळवेलच्या वेलीचा रस प्यावा.
गुळवेल कॅन्सर सारख्या रोगात सुद्धा उपयोगी ठरते. गव्हांकुराच्या रसासोबत गुळवेलचा रस सकाळी उपाशीपोटी, आठवड्यातून तीनदा घ्यावा किंवा एक दिवसा आड घ्यावा.
Giloy in Marathi Meaning – Uses & Benefits
6 thoughts on “Gulvel Benefits in Marathi | Giloy Plant Meaning | गुळवेल वनस्पती माहिती”
Where do y get Gul Vel I want to try for 21 days while going for Walk in the morning as told in your VDO.
I have undergone Bypass surgery 2.5 years back
खुप छान उपयुक्त माहीती
Where do y get Gul Vel I want to try for 21 days while going for Walk in the morning as told in your VDO.
I have undergone Bypass surgery 2.5 years back
A very informative narration shot n sweet though taste of Gulvel is sour. Thanks
Very useful information. As Gulvel Satva is extremely bitter in taste, is it available in capsule form? If yes, pl. Send its online sources.
A very nice and useful information of this vanspati – Gilou
A very nice and very very useful information. Thank you.