Sambhaji Maharaj History in Marathi

छत्रपती संभाजीराजे भोसले माहिती

 • शिवाजी महाराज जर महाराष्ट्राचा वाघ असेल तर संभाजी राजे छावा आहेत. औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजांबद्दल बऱ्याच लोकांना फारशी माहिती नाही किंवा बरीचसे गैरसमजही पसरवले गेलेले आहेत.

बालपण

 • संभाजी भोसले हे शिवाजी महाराज व त्यांची पहिली पत्नी सईबाई यांचे पहिले पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला.
 • अवघ्या दोन वर्षांचे असताना त्यांची आई सईबाई यांचे निधन झाले त्यानंतर त्यांची आजी जिजाबाईंकडेच ते लहानाचे मोठे झाले. सुरवातीच्या काळात त्यांच्या सावत्र आई सोयराबाई यांनी त्यांच्यावर खूप माया केली. शिवाजीराजांसारखे थोर युगपुरुष पिता म्हणून लाभल्यामुळे युद्ध मोहिमांचे आणि राजकारणातील डावपेचांचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले.
 • १६६६ मध्ये त्यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांची मुलगी येसुबाईंशी झाला. या विवाहामुळे कोंकण पट्टा मराठा साम्राज्यात सामील झाला. संभाजीराजे अतिशय शूरवीर आणि महापराक्रमी होते.

Sambhaji Maharaj Height

 वैयक्तिक आयुष्य आणि कार्य

 • राजकुमार संभाजी महाराजांवर लहानपणापासून झालेल्या संस्कारांमुळे ते राजकारणातील बारकावे आणि रणांगणावरील युद्धनीती यामध्ये तरबेज झाले होते.
 •  शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकानंतर थोड्याच दिवसात जिजाबाईंचे देहावसान झाले. त्यानंतर त्यांच्याकडे मायेने लक्ष देणारे कोणी नव्हते. तसेच सोयराबाईच्या राजारामला गादीवर बसविण्याच्या इच्छेमुळे त्यांनी संभाजींविरुद्ध कट कारस्थाने करू लागल्या.
 • सोयराबाईंमुळे इतर महत्वाचे अधिकारी, शिवाजी महाराज व संभाजी यांच्यात तेढ निर्माण झाले. त्यामुळे संभाजींनी शिवाजी महाराजांचे राज्य सोडले आणि औरंगजेबाचा सरदार दिलेर खान यांच्या सैन्यात सेनापती म्हणून सामील झाले. त्याच्या या उद्धटपणाचा शिवाजींना अतिशय संताप आला होता. संभाजींराजांना राजारामच्या विवाहाचे आमंत्रणही दिले गेले नव्हते. राजाराम हा सोयराबाई यांचा मुलगा होता ज्याला त्या मराठा साम्राज्याचा उत्तराधिकारी करू इच्छित होत्या.
 •   दिलेरखानने संभाजीराजांसोबत भूपाळगडच्या किल्ल्यावर हल्ला केला व विजय मिळवला. संभाजीराजांची सैनिकांना सुरक्षित जाऊ देण्याची मागणी नाकारून दिलेरखानने सुमारे सातशे सैनिकांचा एक हात तोडण्याचा हुकुम दिला. तसेच इतर जनतेवर अमानुष अत्याचार केला. हे पाहून संभाजी राजांना आपली चूक कळली व ते परत मराठा साम्राज्यात सामील झाले.
 •  संभाजी राजांनी आपल्या अतुल्य शौर्य आणि लष्करी तेजाने आपले सामर्थ्य सिद्ध केले. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी त्यांनी रामनगर येथील पहिली लढाई जिंकली.  त्यांनी नाऊ वर्षाच्या कालावधीत एकशेचाळीस लढाया लढल्या व त्यातील एकही लढाई हरले नाहीत. वयाच्या चवदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला. त्यांना सोळा भाषा अवगत होत्या. त्यांनी आपल्या पराक्रमाने मराठा साम्राज्याचा विस्तार केला. शिवाजी महाराज जरी नौसेनेचे जनक असले तरी संभाजी महाराजांनी पाच जहाज बांधणीचे कारखाने उभारून मोलाचे योगदान दिले. 

Sambhaji Maharaj Death / अखेरची क्षण

 • संभाजी राजांचा मृत्यु मात्र अतिशय बिकट परिस्थितीत झाला. संभाजी राजे कोकणातील संगमेश्वरला बैठकीसाठी जात असताना त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के याने मुकर्रबखान याच्यासोबतीने त्यांच्यावर हल्ला केला.
 • खूप प्रयत्न करूनही मराठा सैनिक तो हल्ला परतवु शकले नाहीत. संभाजी राजे यांना बंदी करून जेव्हा औरंगजेबाच्या समोर नेण्यात आले, तेव्हा औरंगजेबाने त्यांना शरण येण्यास सांगितले. औरंगजेबाने किल्ले व सगळा खजीना मुघलांना देण्याची मागणी केली व जे मुघल अधिकारी मराठ्यांना मदत करतात त्यांची नावे सांगितली तर संभाजीना मुक्त करण्याचे आश्वासन दिले. संभाजीं राजांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला.
 • औरंगजेब अतिशय रागावला आणि त्याने संभाजी राजे आणि त्यांच्या सोबत असलेले कवी कलश यांना मरण येईपर्यंत छळ करण्याचा हुकुम दिला. संभाजी राजांची अतिशय मानहारक पद्धतीने धिंड काढण्यात आली. त्यांचे डोळे काढले, जीभ कापली, नखे बाहेर काढली. अश्या अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा सहन करत शेवटी ११ मार्च १६८९ रोजी संभाजी राजांचा मृत्यु झाला. परंतु शेवट पर्यंत संभाजी राजांनी औरंगजेब पुढे मन झुकवली नाही. असे म्हणतात की त्यांच्या मृत्युनंतर औरंगजेबने ही त्यांच्या पराक्रमाची स्तुती करून त्यांच्यासाठी ‘ये तो सचमुच शेर का छावा है’ असे उद्गार काढले.
 • संभाजी राजांच्या मृत्युनंतर मराठी साम्राज्याच्या घसरणीला सुरुवात झाली. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनंतर कोणालाही मराठी साम्राज्याची प्रचंड धुरा कोणालाही सांभाळता आली नाही.

Sambhaji Maharaj Information in Marathi Wikipedia Language