Swami Vivekananda Information in Marathi

स्वामी विवेकानंद माहिती

  • भारताला लाभलेल्या अनेक थोर संतांपैकी स्वामी विवेकानंद हे एक अविस्मरणीय संत होते. ते रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते व त्यांनी सुरु केलेल्या ‘रामकृष्ण मिशन’ चा प्रचार विवेकानंदांनी संपूर्ण जगात केला. बालपण
  • त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ मध्ये कलकत्यातील सीमलापल्ली गावात मकर संक्रांती दिवशी झाला. त्यांचे नाव नरेंद्र असे ठेवण्यात आले. संन्यास घेण्यापूर्वी त्यांचे नाव नरेंदनाथ विश्वनाथ दत्त असे होते. विश्वनाथ दत्त हे कलकत्याच्या उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील होते व आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या.
  • त्यांना समाजशास्त्र, इतिहास, कला व साहित्य या विषयांची आवड होती. तसेच रामायण, महाभारत, भगवद्गीता अश्या धार्मिक साहित्यांची सुद्धा आवड होती. त्यांनी गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले होते. तसेच त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, पोहणे, घोडेस्वारी, होडी व्हलवणे असे अनेक छंद सुद्धा होते. अंधश्रद्धा आणि भेदभाव या विषयावर लहानपणापासून त्यांचा आक्षेप होता. त्यांच्या मित्रांनी त्यांना ‘बिले’ हे टोपण नाव दिले होते तर गुरु त्यांना नोरेन असे बोलावीत.

शिक्षण

  • सात वर्षाच्या नरेंद्रला जेव्हा शाळेत घातले तेव्हा शाळेत ऐकलेल्या शिव्या तो घरी देऊ लागला. म्हणून त्यांच्या आईने त्यांना शाळेतून काढले व घरीच बंगाली आणि इंग्रजी भाषा शिकवू लागल्या. अशा प्रकारे नरेन्द्रनाथांच्या शिक्षणाची सुरुवात घरीच झाली. १८७१ साली ते ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्थापिलेल्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये दाखल झाले.
  • शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी जनरल असेम्ब्लीज़ इन्स्टिट्यूशन, जे आता स्कॉटिश चर्च कॉलेज य नावाने ओळखले जाते, येथे प्रवेश घेतला. येथे ते पाश्चात्य तर्कशास्त्र, पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि युरोपीय इतिहास शिकले. १८८१ मध्ये त्यांनी ललित कला ची परीक्षा उत्तीर्ण करून, १८८४ मध्ये बी.ए ची परीक्षा पास झाले.
  • त्यांनी अनेक विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला ज्यामध्ये काही डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इ होते. पाश्चात्य तत्वज्ञानासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही सखोल अभ्यास केला.

कार्य

  • नरेंद्रांनी ब्राम्हण समाजात प्रवेश केयानंतर त्यांचे विचार नरेंद्रना पटेनात, त्यांच्या मनाचा खूप गोंधळ उडाला. देवाच्या अस्तित्वाबद्दल त्यांना अनेक प्रश्न पडत. जेव्हा ब्राम्हण समाजाचे देवेंद्र त्यांना समाधान कारक उत्तर देऊ शकले नाहीत तेव्हा नरेंद्रना रामकृष्ण परमहंस यांच्या कडे पाठविण्यात आले. संत परमहंस यांनी त्यांच्या सर्व शंकांचे समाधान केले. १८८६ साली रामकृष्णांनी नरेंद्रच्या खांद्यावर हिंदुधर्माच्या प्रसाराचा भार टाकला व जगाचा निरोप घेतला.
  • १० मे १८९३ रोजी राजा अजितसिंग खेत्री यांनी नरेन्द्रांना “विवेकानंद” नावाने सन्मानित केले तसेच अमेरीकेच्या प्रवासासाठी पैसेही पुरविले. १८ सप्टेंबर १८९३ साली अमेरिकेच्या शिकागो शहरात, शिकागो-आर्ट इन्स्टिट्युट येथे सर्वधर्मीय परिषदेत भाषण दिले. भाषणाची सुरुवात “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनीनो” अशी करताच जमावाने टाळ्यांचा सलग दोन मिनिटे गजर केला. त्यांनी अमेरिकेतील मोठमोठ्या शहरात अनेक व्याख्याने दिली. हिंदूधर्म, तत्वज्ञान यांच्या प्रचारासाठी अभ्यासवर्ग सुरु केले. अनेक स्त्री-पुरुषांना शिष्य बनविले. अनेक ठिकाणी मठ स्थापन केले.
  • नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण जगात वेदांताचा प्रसार केला. तत्कालीन अमेरिकन वृत्तपत्रांनी “भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्वाचा संन्यासी” असे स्वामींचे वर्णन केले. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अनेक वेदांन्त सोसायट्यांची स्थापनाही केली.

Swami Vivekananda Quotes & Suvichar in Marathi

आयुष्याची अखेर

  • अमेरिकेत असतानाच स्वामी आजारी पडले. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. शुक्रवारी ४ जुलै १९०२ या दिवशी वयाच्या ३९व्या वर्षी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. बेलूर मधील गंगा तटावर चंदनाच्या चितेवर त्यांना अग्नी देण्यात आला. त्यांनी स्वःताचे आयुष्य ४० वर्ष असेल अशी भविष्यवाणी केली होती जी खरी ठरली. कन्याकुमारी पासून काही अंतरावर समुद्रामध्ये स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारले गेले.