Narain Karthikeyan Marathi

Narain Karthikeyan Information in Marathi | नरेन कार्तिकेयन माहिती, Biography

Narain Karthikeyan Information in Marathi

Narain Karthikeyan Biography / नरेन कार्तिकेयन मराठी माहिती

  • तुम्ही कधी फॉर्मुला वन कार रेसिंग बघितली आहे का? फॉर्मुला वन रेसिन्ग अतिशय जोखमीचा आणि चित्तथराक समजला जाणारा खेळ आहे आणि तो आपल्याला अतिशय उत्साही सुद्धा करतो…पण, तुम्हाला माहिती आहे का कि भारतातून कुणी या खेळामध्ये सहभाग घेतलेला आहे? काय वाटते तुम्हाला? असेल का कुणी?
  • नक्कीच आहे, आणि या व्यक्तीचे नाव आहे “कुमार राम नारायण कार्तिकेयन”. होय नारायण हा भारतातील पहिला वाहिला फॉर्मुला वन कार चालक आहे. लहानपानापासून त्याला रेसिंग कार चे अतिशय वेड होते. भारतातील प्रथम फॉर्मुला कार रेसर होण्याचे स्वप्न तो जागेपणी बघत होता. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय केले हे आपण आता बघुयात!

फॉर्मुला वन मधील कामगिरी :

  • नारायणनी २००५ साली झालेल्या ऑस्टेलिन ग्रँड प्रिक्स मध्ये, जॉर्डन टीम सोबत फॉर्मुला वनमध्ये पदार्पण केले. आणि भारतातील प्रथम फॉर्मुला वन रेसिंग कार ड्राइवर होण्याचा मन पटकावला. तेव्हा त्याने १२वे स्थान मिळवले होते आणि रेस १५ व्य स्थानावर संपवली होती.
  • त्यानंतर २००५ साली झालेल्या युनाइटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स मध्ये त्याने त्याचे पहिले गुण कमावले. या रेस मध्ये एकूण ६ गाड्या धावल्या होत्या आणि यामध्ये कार्तिकेयानाने ४ था क्रमांक मिळवला होता.
  • त्यानंतर म्हणजे पुढच्याच वर्षी २००६ मध्ये झालेल्या हंगामात तो विलियम्स संघामध्ये सामील झाला आणि त्या संघाचा राखीव चाचणी चालक राहिले. आणि २०११ साली झालेल्या हंगामात तो हिस्पॅनिया संगाकडून खेळला.

फॉर्मुला वन च्या आधी :

  • कुमार राम नारायण कार्तिकेयन याचा जन्म १४ जानेवारी १९७७ साली कोईम्बतूर, तामिळनाडू येथे झाला. त्याचे वडील माजी राष्ट्रीय रॅली विजेता होते, तसेच त्यांनी दक्षिण भारतीय रॅली सात वेळा जिंकली होती. लहानपणीपासून फॉर्मुला वन रेसिंग कार मध्ये खेळणारा प्रथम चालक व्हायचे त्यांचे स्वप्न होते. आपल्या स्वप्न पूर्तीसाठी लागणारे सर्व प्रयत्न त्यांनी लहान वयातच सुरु केले होते.
  • फॉर्मुला वन चा ड्राइवर होण्याच्या महत्वाकांक्षेने नारायणनी श्रीपेरुंपुद्दूर येथे झालेली “फॉर्मुला मारुती” ही रस जिंकली होती.
  • रेसिन्ग बद्दलचे शास्त्रशुद्ध आणि संपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी १९९२ मध्ये फ्रान्स मधीं एल्फ विनिफिल्ड रेसिन्ग स्कूल मध्ये प्रवेश घेतला. फॉर्मुला रेनॉल्ट कारसाठी झालेल्या पायलट रेसिंगमध्ये सहभाग घेऊन त्यांनी उपांत्य क्रमांक मिळवला.
  • १९९३ मध्ये फॉर्मुला मारुती स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो भारतात परतले.
  • याच वर्षी नारायणनी ब्रिटन मधले फॉर्मुला वोक्सहाल कनिष्ठ स्पर्धेत भाग घेतला, ज्यामुळे युरोपिअन रसिईंग चा अनुभव त्यांना मिळाला.
  • पुढच्या वर्षी म्हणजेच १९९४ मध्ये त्यांनी ब्रिटन येथे फौंडेशन रेसिंग टीमचा वेक्टर ड्राइवर म्हणून काम करत फॉर्मुला फोर्ड झेटेक मालिकेत प्रथम क्रमांक मिळवला.
  • त्याने ब्रिटिश फॉर्मुला फोर्ड विंटर रेसिन्ग मध्येहि भाग घेतला आणि पदक मिळवले, युरोपातील कोणतेही विजेतेपद कमावणारा तो प्रथम भारतीय ठरला. १९९५ मध्ये फक्त ४ शर्यतींसाठी त्याने फॉर्मुला आशिया चॅम्पियनशिपमध्ये पदवी संपादन केली.
  • शाह आलम, मलेशिया येथे झालेल्या रेसिंग मध्ये आपल्या जलद वेगाने त्याने दुसरा क्रमांक पटकावला.
  • १९९६ मध्ये मात्र आशियायी फॉर्मुला मध्ये सहभाग घेऊन त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि याच बरोबर ते हे स्पर्धा जिकणारे प्रथम भारतीय ठरले.
  • १९९७ मध्ये त्यांनी ब्रिटिश फॉर्मुला ओपन चॅम्पियनशिप मध्ये नेमेसिस मोटारस्पोर्ट्स संघासोबत सहभाग घेतला.
  • १९९८ मध्ये कार्लीन मोटारस्पोर्ट्स संघासह ब्रिटिश फॉर्मुला थ्री चॅम्पिअनशिप मध्ये सहभाग घेतला आणि हंगामाच्या २ अंतिम शर्यतीत तृतीय स्थान आणि एकूणच १२ वे स्थान मिळवले.
  • १९९९ मध्ये त्यांनी २ वेळा विजय मिळवून ५ वेळा व्यासपीठावर काम केले.
  • २००१ पासून त्यांनी फॉर्मुला निप्पोन एफ ३००० स्पर्धेला सुरवात केली.
  • सिल्व्हरस्टोन येथे फॉर्मुला वन रेसिंग कार ची चाचणी घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला .
  • २००२ मध्ये ते टेलिफोनीका वर्ल्ड सिरीज मध्ये आला.

इतर कामगिरी :

  • २००७ साली न्यूयझीलँड येथे झालेल्या A1 -GP मध्ये पदार्पण केले आणि स्प्रिंट रेसमध्ये १० वे तर फिचर रेसमध्ये ७ वे स्थान पटकावले.
  • याच वर्षी डिसेंबर मध्ये चीन मध्ये झालेल्या A1 -GP रेसमध्ये कार्तिकेयन हे टीम इंडिया साठी खेळले आणि भारताला A1 -GP मध्ये प्रथम क्रमांक देखील मिळवून दिला. भारताचा हा इतिहासातील पहिला A1 -GP विजय होता.
  • तसेच २००८ साली झालेल्या ब्रँडस hatch या वैशिट्यपूर्ण शर्यतीत देखील त्यांनी भारतासाठी प्रथम क्रमांक पटकावला.
  • मार्च २००९ साली ते मॅन्स टीम मध्ये सहभागी झाले, तेव्हा त्यांनी ऑडी आर १० टर्बो हि कार चालवली. मे २००९ मध्ये झालेल्या मॅन्स या आपल्या पहिल्या शर्यतीत त्यांनी ६वा क्रमांक मिळवला.
  • त्यानंतर २०१३ साली ऑटो जिपी मालिकेत झेले रेसिंग आणि सुपर नोव्हा रेसिंग मध्ये सहभाग घेतला. झेले रेसिन्ग नंतर ते सुपर नोव्हा मध्ये खेळले आणि आणि रेअसिन्ग च्या २ऱ्या टप्प्यात ५ शर्यती जिंकल्या. मालिकेच्या शेवटी त्यांनी ४ था क्रमांक मिळवला तर मालिकेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूचा मान पटकावला.
  • २०१४ मध्ये टीम IMPUL बरोबर फॉर्मुला वन मध्ये नारायण परतला.
  • २०१५ च्या हंगामात ते टीम डाँडेलियन मध्ये गेले.
  • आणि २०१६ च्या हंगामासाठी ते टीम सनकोको लेमन्स मध्ये सहभागी झाले.
  • २०१९ मध्ये जपानमधील सुपर GT मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याने आपली सिंगल सीटर मधील कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला.

कौटुंबिक आयुष्य :

  • नरेन कार्तिकेयाने यांनी २००४ साली पर्वंना हिच्याशी अत्यंत साधेपणाने कौटुंबिक वातावरणात हिंदू पद्धतीने कोईम्बतूर या त्यांच्या जन्मगावी लग्न केले.
  • पर्वंना यांनी लंडन मधील रिचमंड विद्यापीठातून मॅनॅजमेण्ट ची पदवी घेतलेली आहे. कार्तिकेयन आणि पर्वंना यांची ओळख एका मित्राद्वारे २००१ मध्ये साली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि २ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २००४ मध्ये लग्न केले.

पद्मश्री नारायण कार्तिकेयन :

  • मोटारस्पोर्ट्स मध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल २०१० साली भारतीय सरकारने कार्तिकेयन यांना पद्मश्री या ४ थ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले. यावेळेस ते म्हणाले कि हे वर्ष खूप व्यस्त आहे, जगभरात २५ शर्यती आहेत खासकरून युरोप आणि अमेरिका मध्ये. मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो याच मला खूप आनंद आहे आणि निश्चितच मी माझे स्वप्न जगात आहे.
  • पद्मश्री, भारतातील प्रथम फॉर्मुला वने रेसिन्ग कार चालक असे अनेक सन्मान मिळवलेले नरेन कार्तिक आपल्याला बरेच काही शिकवतात…स्वप्न बघणं खूप सोपे असते पण स्वप्नांसाठी जिद्दीने लढणे सोपे नाही. जर तूम्ही तुमच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत असाल तर मात्र कुणीही ते पूर्ण होण्यापासून थांबवू शकत नाही.

Narain Karthikeyan Wikipedia in Marathi Language

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *