Home » Tips Information in Marathi » Sania Mirza Information in Marathi | Saniya Mirza Biography Essay

Sania Mirza Information in Marathi | Saniya Mirza Biography Essay

sania mirza in marathi essay nibandh

Sania Mirza Information in Marathi

सानिया मिर्झा मराठी माहिती

 • आजकाल स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा मागे नाहीत हे सिद्ध करणाऱ्या अनेक स्त्रीया आपण आपल्या आजूबाजूला बघतच असतो. पण काही स्त्रीयांनी तर अगदी अंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपली कामगिरी दाखवली आहे आणि अश्याच काही महिलांपैकी एक आहे सानिया मिर्झा. अगदी लहान वयात आपल्या उत्कृष्ट खेळामुळे सानिया मिर्जा जगप्रसिद्ध टेनिसपटू झाली आहे.
 • सानियाचा जन्म १५ नोव्हेंबर, १९८६ मध्ये मुंबईत झाला. तिचे वडील इमरान मिर्झा क्रीडा बातमीदार होते आणि आई नसीमा मुंबईतील एका कंपनीत काम करत होती. नंतर ते हैदराबाद येथे राहायला गेले. त्यांच्या घरचे वातावरण पारंपारिक शिया मुस्लिम स्वरूपाचे होते.
 • सानियाचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद येथील के. एन. ए. एस. आर. स्कूलमध्ये झाले आणि नंतर हैदराबादच्या सेंट मेरी कॉलेज मधून पदवी मिळवली. ११ डिसेंबर, २००८ मध्ये एम जी आर शैक्षणिक आणि संशोधन संस्था विद्यापीठाने तिला डॉक्टरची उपाधि प्रदान केली.

टेनिसची सुरुवात :

 • वयाच्या सहाव्या वर्षी सानिया मिर्झाने टेनिस खेळायला सुरवात केली आणि तिचे पहिले कोच होते तिचे वडील. बारा वर्षाच्या सानियाच्या वडिलांकडे पुरेसे पैसे नव्हते कि ते सानियाला व्यावसायिक प्रशिक्षण देऊ शकतील. परंतु त्यांनी जीवेके आणि एडीडास या मोठ्या कंपन्यांकडून सानियासाठी स्पॉन्सरशिप मिळवली. महेश भूपतीचे वडील सी. के. भूपती यांच्या देखरेखीखाली सानियाची ट्रेनिंग सुरु झाली. रॉजर फेडरर आणि स्टेफी ग्राफ हे तिचे आदर्श होते. हैदराबादच्या निजाम क्लब मधून सुरवात करून ती नंतर अमेरिकेला एस. ट्रेनिंग अकॅडमी मध्ये गेली. तिथे तीने रॉजर अॅनडरसनकडून टेनिसचे प्रशिक्षण घ्यायला सुरवात केली.
 • १९९९ मध्ये, वयाच्या अवघ्या चवदाव्या वर्षी सानियाने आई. टी. एफ. ज्युनिअर टूर्नामेंट मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. २००२ मध्ये, टेनिस खेळाडू लिएंडर पेसने सानियाचा खेळ बघितला आणि सानिया बरोबर डबल्स खेळण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सानिया फक्त सोळा वर्षाची होती आणि सतराव्या वर्षी सानियाने विम्बल्डन ज्युनिअर डबल्स चैंपियनशिप जिंकली.
 • २००३ मध्ये, विम्बल्डन मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करून खेळात आल्यानंतर तिने विम्बल्डन डबल्स जिंकली होती. तिचा उत्कृष्ट खेळ प्रदर्शन पाहून २००५ मध्ये तिला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २००५ मध्ये तीचे अंतरराष्ट्रीय रँकिंग ४२ पर्यंत पोहोचले, जिथे कोणताही भारतीय टेनिस खेळाडू जाऊ शकला नव्हता.
 • २००६ मध्ये, आशियाई स्पर्धांमध्ये तिने लिएंडर पेससोबत मिक्स डबल्स मध्ये सुवर्ण पदक आणि लेडीज सिंगल्स मध्ये रजत पदक मिळवले. २००९ मध्ये ग्रँड स्लॅम जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. २००६ मध्ये तिला पद्मश्री पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला.

विवाह :

 • २००९ मध्ये, सानियाचा साखरपुडा तिचा लहानपणी पासूनचा मित्र सोहराब मिर्जा याच्यासोबत झाला परंतु काही कारणामुळे नंतर हा साखरपुडा तुटला. थोड्या दिवसानंतर ती पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक सोबत आसू लागली आणि १२ एप्रिल, २०१० मध्ये त्यांचा विवाह झाला. यामुळे तिला जनतेच्या तीव्र निषेधाला तोंड द्यावे लागले परंतु ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. तिचा विवाह हैदराबाद येथील ताज कृष्णा या हॉटेल मध्ये झाला आणि सध्या ते दोघेही भारत किंवा पाकिस्तानात न राहता दुबईमध्ये रहातात. २०१८ मध्ये सानिया आणि शोएबचे पहिले मुल जन्माला आले.

विविध वाद :

 • टेनिसमध्ये एवढे नाव कमवून सुद्धा सानिया नेहमीच चांगल्या कारणांसाठीच प्रसिद्धीत राहिली असे नाही. तिला अनेक वादग्रस्त गोष्टींना सामोरे जावे लागले. मुस्लीम कुटुंबात जन्म झाल्यामुळे, २००५ मध्ये, एका मुस्लीम समुदायाने तिच्या खेळावर बंदी घालण्यासाठी एक फतवा जाहीर केला. तिच्यावर अनेक दोष लावले गेले. नंतर ‘जमात – ए – इस्लामी हिंद’ या संगठनेने कबूल केले कि त्यांचा तिच्या खेळण्यास आक्षेप नसून तिच्या कमी कपड्यात खेळण्यास आक्षेप आहे. त्यांचे म्हणणे होते कि तिने जास्त कपडे घालून खेळावे.
 • २०१४ मध्ये तिला तेलंगना राज्याची राजदूत म्हणून निवडले गेले पण यावरही खूप वाद झाले. सानियाला या गोष्टीचे फार वाईट वाटले कि, इतकी वर्षे भारतासाठी खेळून सुद्धा तिला तिच्या देशात अशी वागणूक मिळावी.
 • परंतु काहीही झाले तरीही सानियाच्या चाहत्यांना तिने निराश केले नाही. बऱ्या – वाईट प्रसंगांना तोंड देत तिने आपल्या खेळाची कामगिरी चालूच ठेवली. २००५ मध्ये टाइम्स मासिका द्वारे प्रसिद्ध केलेल्या ’५० हिरोज ऑफ अशिया’ या यादीत तिचे नाव होते हि सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. इकॉनॉमिकस टाइम्स या मासिकाने सुद्धा २०१० मध्ये ’भारताला गर्व वाटेल अश्या ३३ स्त्रीया’ हि यादी प्रसिद्ध केली होती ज्यात सानियाचे नाव सुद्धा होते. २०१० मध्ये गुगलने केलेल्या सर्वेनुसार सानिया हि सर्वात जास्त सर्च केली जाणारी भारतीय महिला खेळाडू आहे.
 • २०१३ मध्ये, सानिया दक्षिण आशियाची संयुक्त राष्ट्र सदिच्छा राजदूत होणारी पहिली महिला ठरली. ती पहिली भारतीय टेनिसपटू आहे जी वर्षाला एक दशलक्ष डॉलर्सची कमाई करते. सानियाने ज्युनिअर खेळाडू असताना १० सिंगल्स आणि १३ डबल्स किताब जिंकले आहेत. राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित केलेली ती दुसरी टेनिस खेळाडू आहे. जात-पात, लिंग भेद यापलीकडे जाऊन यशाचे अत्युच्च शिखर गाठणारी सानिया खरोखरच या सन्मानासाठी पात्र आहे.

Sania Mirza Information in Marathi Language Wiki : Nibandh

2 thoughts on “Sania Mirza Information in Marathi | Saniya Mirza Biography Essay”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *