Olive Oil Marathi Name

Olive Oil Benefits in Marathi | Information, Fayde, Uses for Hair

Olive Oil Information in Marathi

ऑलिव्ह ऑइल चे फायदे

  • त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑइल अत्यंत परिणामकारक आहे. आंघोळ करून झाल्यानंतर शरीर थोडेसे ओले असतानाच एक चमचा ऑलिव्ह ऑइलने शरीराला मालिश करावी आणि १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. तुमच्या कोरड्या त्वचेत तुम्हाला फार फरक पडलेला दिसेल.
  • याशिवाय चेहऱ्यावरचे काळे डाग सुद्धा हळूहळू निघून जातील आणि त्वचा चमकदार दिसू लागेल. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा ऑलिव्ह ऑइलच्या मालीशने पूर्ववत होते.
  • चंदनच्या पावडर मध्ये मिसळून ऑलिव्ह ऑइल चेहऱ्यावर लेपप्रमाणे लावले तरी त्वचा गोरी दिसू लागते.
  • त्वचेला आलेला काळपटपणा सुद्धा ऑलिव्ह ऑइल मुळे दूर होतो. गुडघ्यावरील किंवा कोपरावरील काळपटपणा दूर करण्यासाठी ऑलिव्ह१ऑइल मध्ये साखर मिसळून त्याने स्क्रब करू शकता.
  • ऑलिव्ह ऑइलमध्ये विटामिन ई मोठ्या प्रमाणात असते जी त्वचेला नैसर्गिक आर्द्रता प्रदान करते तसेच इतरही फायदे देते.
  • त्वचा जास्त रुक्ष असेल तर ऑलिव्ह ऑइलने मालिश करून नंतर वाफ सुद्धा घेऊ शकता. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा आणि काळेपणा कमी होईल.
  • त्वचेवर सुरकुत्या पडल्या असल्यास लिंबुचा रस आणि ऑलिव्ह१ऑइल यांचे मिश्रण करून त्याने आठवड्यातून तीनदा मालिश केली तर एका महिन्यात आराम दिसू लागतो.
  • चंदन पावडर आणि ऑलिव्ह ऑइल यांचा लेप सुद्धा सुरकुत्यांपासून आपली सुटका करतो.
  • ऑलिव्ह ऑइलचा वापर केसांना लावण्यासाठी सुद्धा होतो. या तेलामुले केस मऊ आणि मुलायम होतात. तसेच कोंड्याच्या समस्येपासून सुद्धा आपली सुटका होते.
  • थंडी मध्ये किंवा जास्त मेकअप केल्यामुळे ओठ कोरडे दिसू लागतात अश्या वेळीस लीप बाम लावण्याऐवजी ऑलिव्ह ऑइलने ओठांना मालिश केली तर ओठ मृदू आणि चमकदार दिसतात. सकाळ संध्याकाळ ओठांना ऑलिव्ह ऑइल लावायला विसरू नका.
  • जर तुमची नखे कडक असतील तर त्यांच्यावर ऑलिव्ह ऑइल लावा किंवा गरम ऑलिव्ह ऑइलमध्ये बुडवून ठेवा, नखे थोडी मऊ होतील आणि लगेच आणि सहज कापली जातील.
  • पार्लरमध्ये जाऊन महागडे पेडीक्युअर करण्याऐवजी रोज रात्री झोपण्यापूर्वी पायांना ऑलिव्ह ऑइल लावा. खूप छान परिणाम जाणवेल.
  • जेवणात ऑलिव्ह ऑइल वापरल्याने हृदय बळकट बनते आणि हृदयरोग होण्याची संभावना कमी होते. या तेलाच्या सेवनाने ब्लड प्रेशर पण नियंत्रणात रहाते.
  • ऑलिव्ह ऑइलमुळे कोलेस्टेरॉल सुद्धा नियंत्रणात आणता येतो. यासाठी आठवड्यातून कमीत कमी तीनदा या तेलाचे सेवन करावे. पण लक्षात ठेवा कि, खायचे ऑलिव्ह१ऑइल आणि बाहेरील इलाज करण्यासाठी वापरात येणारे ऑलिव्ह१ऑइल वेगवेगळे असते.
  • ऑलिव्ह ऑइलच्या नित्य सेवनाने मधुमेह होण्याचा धोका टळतो किंवा ज्यांना मधुमेह झालेला असेल त्यांना मधुमेह कमी करता येतो.

Olives / Uses of Olive Oil in Marathi Language / Mahiti Benefits Wikipedia

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *