Sant Eknath Information in Marathi

संत एकनाथ माहिती

 • ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम, रामदास ह्यांच्या मधल्या काळात एकनाथांचा जन्म झाला आणि धर्माची मरगळ झटकण्यास सुरुवात झाली.
 • १६ व्या शतकात विजयनगरचे एकमेव हिंदू साम्राज्य बुडाले होते. मुसलमान वाटेल तसे अत्याचार करीत होते.
 • कुठेही आशेचा किरण नव्हता तेंव्हा पैठण येथे दशग्रंथी ब्राह्मणाच्या घरी एकनाथांचा १५३३ मध्ये जन्म झाला त्यांचे वडील सुर्यनारायण आणि आई रुक्मिणी हे दोघंही नाथांच्या लहानपणीच वारले. नाथांचा सांभाळ आजोबा भानुदास ह्यांनी केला.

अफाट विद्वत्ता :

 • घरातच सगळे ज्ञान होते त्यामुळे त्यांनी त्यात आपली अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर भर घातली.
 • त्यावेळची अंदाधूंदी आणि धर्माची हेळसांड पाहून त्यांच्या जीवाची घालमेल झाली आणि आर्ततेने त्यांनी “बया दार उघड” हे भारूड देवीला जागविण्यासाठी लिहिले.
 • महाराष्ट्राचा पुरूषार्थ जागविला. त्यांनी खूप पुस्तके लिहिली. ज्ञानेश्वरी ठीकठाक केली. भारुडे. भागवत पुराण, स्वात्मसुख, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, शुकाष्टक आनंदलहरी गीता सार इत्यादी. त्यांचे भागवत आजही मनोभावे ऐकले जाते.

माणुसकी :

 • पण त्यांना माणुसकीही तितकीच होती. एकदा नदीत अंघोळ करताना त्यांना एक विंचू वहात येताना दिसला त्यांनी त्याला वाचविण्यासाठी पकडले लगेच तो विंचू त्यांना चावला त्यांनी त्याला सोडले तो विंचू गटांगळ्या खायला लागला. परत पकडले , परत चावला असे खूप वेळा झाले.
 • हे बघत असलेल्या एका माणसाने विचारले की तुम्ही का त्या विषारी प्राण्याला वाचवत आहात? तेंव्हा एकनाथ म्हणाले तो जर त्याचे गुणधर्म सोडत नाही तर मी माणुसकी कशी सोडू?
 • एकदा उन्हात तडफडत असलेल्या गाढवाच्या मुखात त्यांनी शुचीर्भूतपणे रामेश्वरसाठी आणलेली गंगा ओतली. त्यामुळे प्रसन्न होऊन रामेश्वरानी त्यांना दर्शन दिले.
 • त्यांचा शांतपणा इतका होता की एकदा ते अंघोळ करून परत येताना एक मुसलमान मनुष्य त्यांच्या अंगावर थुकला.
 • त्यांनी हसून परत अंघोळ केली आणि परत तो मनुष्य थुकला. असे १०८ वेळा झाले शेवटी तो माणूस एकनाथांच्या पाया पडला.
 • एकनाथांनी गुरु परंपरेचा पायंडा घातला. त्यांनी जनार्दन देशपांडे हे सुफी गुरु ते दत्तात्रेयांचे भक्त होते. त्यांना गुरु केले. आणि आपल्या अभंग मध्ये “एका जनार्दनी’ असे लिहून त्यांना स्थान दिले.
 • त्यांनी एकदा एकनाथांना १ नव्या पैशाची चूक शोधून काढायला सांगितले. एकनाथांनी रात्रभर बसून ती चूक शोधून काढली. तेंव्हा जनार्दन स्वामी म्हणाले असाच भगवंतासाठी तल्लीन हो तरच तुला देव कळेल.

असा हा विद्वान व्यासंगी आणि संसारी गृहस्थ १५३३ मध्ये स्वर्गवासी झाला.

Sant Eknath Information in Marathi Language Wikipedia : Biography